Shubham mohurle

Tragedy

1.0  

Shubham mohurle

Tragedy

लेख-रडवेला मन ३

लेख-रडवेला मन ३

3 mins
16.3K


'दिवस असा का उगवावा ?'

दिवस आनंदात आणि शेवटी सायंकाळ अशी खराब व्हावी; समजतच नाही. अटीतटीत चूक कशी आणि कुठे व्हावी हीच समजू नये, का म्हणून व कशासाठी???....

सकाळी प्रात्यक्षिक आहे म्हणून आनंदाने निघावं; सर्व पोहचता, अभ्यासिकेत बसता सर्व गोष्टी आनंदात जावं, मनापासून अभ्यास आणि त्यातच हरवलेले मन; मग का असं की सांजवेळ संध्याकाळ अशी खराब होऊन धावून यावी. का? आणि कशासाठी?...

मनातून धावतांना, मनातील खिल्या उडवतांना असं आनंदात चार-चौघात बसतांना बोलतांना आपण घेतलेल्या आणि झालेल्या आनंदाचं फळ निश्चितच गोड असावं अशी मनोमन सर्वांची इच्छा असते; परंतु माहीत नाही माझ्या आनंदात कुठेतरी दुःखाच, लोकांच्या बोलण्याचं मनाला बोचतं अन एका क्षणार्धात आनंद नाहीस होवून कुठेतरी तो मिळवलेल्या दिवसाचा आनंद काय होता हेच उभारीवता समजेनासे होते; अस वाटते ते क्षणार्धात फक्त आपणांस चुहुक दाखवून, देऊन तो कुठेतरी हिरावण्याचा प्रयत्न सर्वांचा एकता सांभाळणारा करतोय अस वाटतं, पण असही वाटते की जे होतंय ते आपल्या भाग्यासाठी तरीही त्यात खोट वाटतेचं. असं का????...

आनंदाच्या विरहातून जातांना बघा ना कस होतं; दुपारपर्यंत आनंद उपोभोगल्यानंतर भा.त.द. चा प्रवेशपत्र काढायला गेल्यावर तिथं एकवेळेस दाखवते आपण परीक्षेस पात्र आहात आणि दुसरीवेळ दाखवते की आपलं नाव पात्र नाही; जिथे पात्र दाखवते तिथं गुणसंख्या बरोबर नाही आणि जिथे अपात्र तिथे गुणसंख्या बरोबर असताही अपात्रतेचा निकष, त्यातही एकाच व्यक्तीचे नाव, फोटो,स्वाक्षरी, रोल नं., दहावी-बारावी, शाळा-बोर्ड सर्व एकच पण फार्म दोन जातात,,आणि त्यातही ज्याला आपण पात्र होत नाही तो फार्म अपात्र म्हणजे नियती अशी जिवनाशी का खेळते आणि मी नाही तर अशी कितीतरी मुलेमुली असतील ज्यांचे अशाकितीतरी गोष्टींनी मन सुन्न होत असेल. त्यातही इतर सुचवतात की जायचा आणि पेपर द्यायचा व अनुभव घायचा, जरी पेपर काढले तरी आपणाला माहीत आहे की, कागदपत्रे पडताळणी जेव्हा करणार तेव्हा आपणाला बाहेर लोटणारच,, त्या इतरांनी दिलेल्या सूचनांचा कुठेतरी कौतुक आणि आधार वाटतो, मात्र आपण आपल्या माणसांसाठी घरी काहीतरी चांगल्या मनाने करून जावे तरीही म्हणतात ना;" जेव्हापर्यंत त्यांच्या ह्रदयाजवळील व्यक्ती जवळ नसते तेव्हापर्यंत आपण त्यांचे होऊन जातो,त्यांना आपण म्हणजे खूप काही असं जवळचे वाटतो; आपणाकडून कामे निपटवतात; मात्र एक तथ्य कुठे ना कुठे असतोच म्हणून मग त्यांच्या ह्रदयाजवळील व्यक्ती जवळ आली की मग मात्र तुम्ही कितीही चांगले करा ; कितीही कौतुकास्पद वागा तरीही तुमचा तिरस्कार ते करणारच;" माहीत नाही असं का? आणि त्यातही कुणाच्याही रागाचं लादन शेवटी तुमच्यावरचं ठाकलं जातं....

ह्या अश्या गोष्टींमुळे आनंदलेल्या मनाला इतरांकडून तरी आधाराचं पाऊल भेटतं मात्र आपलेसे मानणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्या प्रिय व्यक्ती मुळे आपली किंमत मात्र शून्य होवून जात हे कधी कळलेच नाही. नियतीलाही असचं व्हावेसे व घडावेसे वाटते.....

लोकांना वाटतं काय हे फालतू आहे; याला आपल्या प्रिय व्यक्तीमुळे टोकले तरी त्याला काहीच नाही वाटत मात्र प्रत्येकाला मन असतं हो ; दुसऱ्यांकडे राहण सोपं नसतं; शेवटी आईलाच आपले मन कळते. काळजी ज्यांनाच असते ज्यांच्या आपण अंगाखांद्यावर खेळलेले असतो, आपणाला जरी शरीरावर जखम झाली असेल ना तरी आईला व काळजीवाहू वडीलधाऱ्यांना मनाला जखमा बसतात. माझी आजी माझ्या शरीर जखमा मनाला झेलते अन नेहमी माझ्या भविष्याच्या काळजीत गुंफते; खरचं असं वाटते की देवानं असं दिलं की खचखळग्यांच हे जीवन, मनात मन गुंतलेलं...

सर्व आठवतांना घरच्यांचा विचार आणि काळजी त्यातच असेतोवर वापरणाऱ्यांचे बोलणे आठवते आणि मन सुन्न होते. रडगाणे मनात गातांना रडवेला मन होते. मनातून अंतर्यानात रडते, मन रडते ,

"हे सुन्न वादळाचे$$$$$$

मन हे भिनलेले ओओओ.....

ओल्या चिंब हे नयनी,

पाऊस सरी आले....।। .....(२)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy