रडवेला मन
रडवेला मन
"वक्र आयुष्याचे; हे चक्र आयुष्याचे, घालतांना घ्यावे; जिक्र आयुष्याचे,
ठेवुनिया अबाधित, विश्वाचे हे बोल, जनमतापुढे मंत्री झाले फोल...."
या सर्व घटनांचा पाठपुरावा करताना कुठेतरी माझ्या चंद्रपुरची स्थिती लक्षात येते. आज आम्ही हसरे बाळ देखण्या नजरेने हसतोय. कारण २००८-०९ च्या चंद्रपुर क्रांतीमुळे ! चिमूरक्रांती ख्यातनाम आहे परंतु चंद्रपुरक्रांतीसुद्धा एक पर्यावरणाला पूरक अशी साध्य बाब आहे.
काय झालं की, आम्ही १ सप्टेंबरला ताडोबा या राष्ट्रीय उद्यानातील मुलं मामला या जंगल परिसरात गेलो होतो. त्यात असं घडलं की अविस्मरणीय! ज्याने आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्या परिसरात आम्ही होतो त्या परिसराचा इतिहास, भगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांवर जी वेळ आली तो इतिहास....
चला तर मग जाणून घेऊया, चंद्रपुरमधील ताडोबा अभ्यारण्याच्या भागात मामला हा खुप मोठा जंगली परिसर आहे. तिथे दगडी कोळश्याचे साठे असल्याने अदानी या नावाजलेल्या कंपनीने सर्वे करुन लाखो झाडांची कत्तल करुन आपली मोकळी कोळश्याची खाण त्या ठिकाणी उभारणार होते. पण २००८-०९ ला सरकारचा पाठिंबा असतानासुद्धा ही खदान झाली नाही. तसा हा परिसर म्हणजे वन्य प्राण्यांचा वावरण्याचा असतो. इथे अनेक प्राणी वास्तव्यास आहेत त्यात तेव्हा २००८-०९ ला २-३ वाघ होते. आता जवळ जवळ ८-९ च्या आसपास आहेत. म्हणजेच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आणि ज्या ठिकाणी होतो तिथे तर आम्हाला ताडोबाचा भास म्हणून २ रानकुत्रे (कोल्हे) दिसले. तोच म्हणजे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर.
२००८-०९ साली इको. प्रो. संस्थापक अध्यक्ष बंडूजी धोतरे तसेच जनता महा. शिक्षक दुधपचारे सर व सहकारी मिळून जे आंदोलन व उपोषण उभे केले त्यास जनतेचा पाठिंबा खुप मोठा होता. पहिल्यांदाच जनता ही इतक्या मोठ्या संख्येने पर्यावरणासाठी रस्त्यावर आली. आंदोलक जे होते ते स्वतः घरी झोपताना काळजीवजा म्हणून घर पूर्ण कुलुपाने आणि फिताशिने कुणी जरी आलं तरी माहित होणार अशा परीने सोय करुन ठेवली होती. मोबाईल नंबर तसे एकमेकांसोबत लॉक करुन ठेवले होते. जो पर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत हे सर्वजण व चंद्रपुरकर लढले. अनेक उपक्रम राबवत मुंडन आंदोलन असो या उपोषण अशा एक ना अनेक मार्गाने हे आंदोलन चालले. सतत एकूण १४ दिवस आंदोलन चालले आणि मंत्री तसेच सरकारी अधिकारी येऊन येऊन गेले पण मात्र निर्णय काहीच नाही, आश्वासन होतं मात्र लेखी नाही. नंतर भेट द्यायला राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आले पाहणी करुन व आन्दोलकांची आणि चंद्रपुरकारांची समस्या जाणली, पर्यावरणाचा आढावा घेतला, आश्वासन दिलं की चंद्रपुरकरांना माझ्यावरील राजकीय दबाव झुगारुन न्याय मिळवून देईन. मात्र लेखी नव्हतं आंदोलन चालूच होतं आणि सरकारला नमते घ्यावं लागलं. अदानीच्या सर्व फाइल कँँसल कराव्या लागल्या आणि पर्यावरणाची जाण असणारे पर्यावरण मंत्री यांनी अदानी खाण प्रकल्प मागे घेत आहे असं सांगून लेखी दिलं. शेवटी तो भाग ताडोबात विलीन झाला आणि लोक आनंदी झाले पर्यावरणाच्या ह्रास कुठेतरी थांबला ह्याचं समाधान झालं. मात्र त्यातच पर्यावरण मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बेदखल केलं.
त्याच काळात विजयासोबत रक्षाबंधन आलं. वेळ न दवडता त्या ठिकाणी अगदी सिमेवरच झाड ज्यापासून जंगल समूळ नष्ट होणार होतं तिथेच इको. प्रो. तर्फे वृक्षाबंधन हा वनविभाग ताडोबा अधिकारी व चंद्रपुरातील महाविद्यालयाला आमंत्रित करून कार्यक्रम राबवून या जंगलाची आख्यायिका व लोकांना या जंगलाचं आपल्या आयुष्यातील महत्व विषद करुन तरुणांना माहिती देतात,,
"करावे ते काम असे करावे,
त्यातून लोकांस समृद्धी मिळावे.''
शेवटी असचं रमता रमता कार्यक्रम आटोपला. सर्व निघुन गेले फक्त आम्ही थांबुन होतं आणि मी अपेक्षा केली नव्हती आणि कविसम्मेलन रमलं आणि पहिली कविता सादर करण्यासाठी युवाकवी म्हणून मला बोलाविण्यात आलं. सादर केली कविता आयुष्य या विषया वरील 'आयुष्य' ही कविता खुप प्रतिसाद मिळाला. बघता बघता कविसम्मेलन रसमय झालं आणि एक एक कविता यायला लागल्या. विषय देशभक्ती, पर्यावरण जीवन कवितांनी फुलले. दुधपचारे सर यांनी छान कविता सादर केली. शेवटी समारोपिय कविता भगतसिंगची कविता जे बंडूजी धोतरे यांना आंदोलन करतांना नेहमी प्रेरणा दिली अशी ती कविता त्यांनी सादर केली आणि समारोप झाला. व्यवस्था उत्तम होती. शेवटी आम्ही दीड-दोन तास रमलेलं कविसम्मेलन संपलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो.
म्हणूनच म्हणतो मी की;
"जगून घ्यावे थोडे; पर्यावरणासाठी,
वृक्ष तिथे छाया; आपुलकीच्या या नाती."