लेख- रडवेला मन@@@
लेख- रडवेला मन@@@


अमृतासमान सर्व भेटतात हो, मित्र मैत्रिनी.. पण जेव्हा संपतो; तेव्हा मात्र एक हसतो आणि सर्व रडतात, हे मान्य या जगाला ? का? कशासाठी ? आणि का बरं ?... जवळ असणारी व्यक्ती दूर चालली; त्यातच रोजच्या आठवणी आणि हसता-रडता निघून गेलेले ते क्षण ! असं आठवतं न मन रडत. नाही जावेसे वाटत; सोडावेसे वाटतंच नाही; पण नियतीला ते मान्य नसते जे की आपणाला वाटते, रडू येत पण ते नियती घडवते आणि ते आपण रोखू शकत नाही; आणि रोखले तर त्याचे संकट आपणावरच येणार हे नक्की. याची काळजी भीती वाटतेच...
एका खोलीतील दोन दरवाज्यांच्या मधात अडकलेले हे मन काय कराव हे सांगत नाही, आणि सांगताक्षणी सुद्धा निव्वळ दुःख देत. कारण त्यात मात्र हरवलेल मन असतं...शेवटी एवढेच! जगण्यासाठी नाण्याच्या दोन बाजू सारखे एकच बाजू स्विकारावी लागते तेव्हाच कोणीतरी जिंकतो, तसच आयुष्याचं असत. नवीन येतील नवीन जातील असचं होणार. फक्त आपल्याला ठरवून आपलं लक्ष साध्य झालं तर थांबायचं, मनात घर केलेल्या लोकांना मनातच घर द्यायचं, तेच आठवत न बसता उडत्या पाखरासारख उडायचं आणि शेवटच्या श्वासात निघून जाताक्षणी लोकांतील मनात घर करून जायचं, देह सोडून द्यायचं.
आता इतकचं! जन्मता आपण रडून दुसऱ्यांना हसवलेले क्षण परतवून आपण चुुुप बसून लोकांना रडवणं हेच दुर्भाग्य आपल्या जीवनात आलं, म्हणूनच मन रडवेला होऊन रडतेय !!!!!!.