रडवेला मन-२
रडवेला मन-२
धन्यवाद कुणाला द्यावं आणि धन्यवाद कुणाकडून घ्यावं; कधी आणि केव्हा??? हे कधी कधी समजेनासेच होते. मन मारून जगतांना अदृश्य जग पण दृष्टीरूपास येते. आपले पाऊले खुलते. न पाहावे ते बघवते आणि मग....आणि मग.......मन त्यातच निघून जावून विचाराधीन एक असतो; आणि उद्दिष्ट च्या पलीकडे जावून कुठेतरी दुसरेच विचार मनात घुमजाव करावयास लागतात व मग मात्र अचानक आपलं कर्तव्यनिष्ठ व जबाबदारी तसेच उद्दिष्ट समूळ त्या क्षणार्धात नाहीसे होतं. डोळ्यांच्या मनभेदात फक्त आणि फक्त त्या नकोश्या गोष्टींचा विचार वावर चालू होतं नं मग मात्र निरकाल असं मन त्यातचं गुंतून दुसऱ्यांच्या तसेच स्वतःच्या कर्तव्याचा विसर पडतो आणि मग मटलं तर स्वतःचे मन नुसतच होवून जातं......
सोशल मीडिया आणि इतर आजूबाजूचे वातावरण यांतील गुंतागुंत ही कुठेतरी मनाला साद न घालता भुरकटलेल्या वेलासारखी आपनाकडे ओढत आहे आणि मग रात्र आणि दिवस मात्र होतं ते काम नियोजित वेळेत न होता ते उद्यावर ज
ातं, शेवटी अपयश येतचं.........…..........
असतांना आणि नसतांना ताळमेळ घालावी तशी मनाची घालता येत नाही; जणू विरह लागतो त्यात,,, जणू दोन दिवस मन झोकून ते काम मनावर घेतल्यासारखे केले जाते अन मात्र तेवढे उलटताच त्याचाही विसर व्हावा तसा ठप्प पडतो. का का अन कशासाठी ??? मनाचा ताबा का सुटतो; एकीकडे वाटते की मन हे अभ्यासात मग्न असावं ; मात्र मग इच्छा मारून अभ्यास टाळून हेलवाहू कसे काय नसते उद्योग ..मात्र मनाला घोर करतात !!!
मनातील माणसे जिंकायची असतांना सुध्दा मात्र स्वतःचेच मन हे विसरते, न रडवेला अस होऊन काहीतरी चुकीचं करीत आहे याची जाणीव होते; वाटते की मन हे रडवेलाच आहे. त्याच्या मनात येईल तो वागणूक देतो आणि घेतो ..तरीपण एकमात्र खरं असतं विचारांची सांगड ही तो घालतो आणि माणूसपणा तरी जिवंत ठेवतो. हेच मनाचे कार्य समजून काबू मिळवण्यासाठी आता उपाय शोधावे लागेल अन स्वतःचा शोध घ्यावा लागेल तेव्हाच मनाला जिंकता येईल..अस वाटते..