Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shubham mohurle

Romance


2  

Shubham mohurle

Romance


प्रेम

प्रेम

3 mins 1.1K 3 mins 1.1K


प्रेम


  प्रेम किती शब्द छोटा आणि म्हटलं तर मोठा,,, कधी होईल, कुणावर होईल, कसं होईल आणि का म्हणून होईल काही सांगता येत नाही, अवंचित प्रश्न असा उभा असतो प्रेमाचा, प्रेम प्रेम आणि प्रेम ,खूपच ह्र्दयाला भिड़णार आणि रडणार, हसवणार आणि सतत साथ द्यावं असं नितांत वाटणारं प्रेम.


  आपल्यावर कुणी कराव प्रेम अन आपण कराव प्रेम.. आणि एक दिवस आपण होऊन जाव मग्न असं..की, ते प्रेम काळीज सोल्ल्यासारखं निष्ठर निद्वेषपणे विश्वास ठेवला तरी ते प्रेम, प्रेमाच्या जगात अन्धादुन्ध होऊन जाववं तसं गुलाबासारखं काट्यांतून निघाव, लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं आसव पुसायची असणार कोणीतरी प्रेम करणार असावं अस्स नेहमीच वाटत असायचं आणि जाणवायचं असेल कुणी तरी आपला ज्याच्यात आपण द्यावा जीव ओतून आणि राहवे सतत सोबत मिस्कीलपणे थट्टा करत एकमेकांशी,,,,,,,,


  कुल्फी, सिनेमा, फिरने एवढेच नसते प्रेम ! प्रेम म्हणजे असतो तो जो काळजावर कोरलेला घाव. ज्यात मनातून प्रतिमा उमटतात, आयुष्याच्या आणि आणि मग,


  अंतर्गत मन सांगत असते नेहमी सतत आणि साथ दे तू मला गाण्यासारखी टिपणी आणि टिपत असते तिला काहीतरी सांगायचे सारख नेहमी सत्य आपल्या मनातील , स्वप्न पाहू लागतो आणि कधीतरी म्हणून टाकावे एकदा आणि मोकळे व्हावे आणि कराव जीव ओतून प्रेम, त्यातही मनात येतो प्रेम म्हणजे लैंगिक शोषण अथवा मनातील फीलिंग्सला न टाळता केलेले कृत्य, ज्यात आपण भूलून जातो स्वतःला आणि तिला, तिच्यासाठी सर्व काही म्हणण्या पलिकड़े करावं लैंगिक अत्याचार आणि घ्यावे मन मारून तीच; मिठीत आणि उफळावे प्रेम दरबार बन्द खोलीत.


  दोघात म्हणजेच प्रेम, प्रश्न पडतो खरंच आपण आहोत का तसं आणि करावं आपणही तसं, हे केल्याने कमीतकमी धोका तर नाही देणार ना! सतत राहणार सोबत, असा जीव गुदमरतो, पण पुन्हा विचारांनी स्तब्ध होतो आणि म्हणतो नाही हे तुझे काम नाही ,नारी आहे आणि सन्मान दे जिच्याशिवाय तू राहु शकत नाही आणि तोलू शकत नाही स्वतःचे अस्तित्व ह्र्दयाच्या कप्यात,,,


जेव्हा जगतो मरतो आणि प्रेमात रंगतो म्हणजे विश्वास बनतो तरी मग बिनशर्त प्रतीकात्मक त्यावर विश्वास का बरं उडतो ? की, आपणासोबत ती खरंच बोलते म्हणजे प्रेम करतेच का की वाटतो तिला टाइमपास जो वेळ मारून नेण्यासारखा.. की असेल तिच्या आयुष्यात दुसरा माझ्याशिवाय आणखी पर्याय, की ती त्याच्यावर जीव ओतून प्रेम करणारी, मन रागावतो रड़तो आणि म्हणतो खरंच असं असेल का ?


 मनात राहवेसे वाटत नाही आणि जाऊदे म्हणत आणखी असु दे ती सदा खुश माझ्याशिवाय अशी मनाची घालमेल होते आणि विचार थांबता थांबून जातात. एखाद्या शेतकऱ्याचेे पीक वाया गेले, उत्पन्न नाही होणार म्हणून सोडून द्यावी आशा तशी गुंडाळावी गाशा त्याने निसर्गाच्या आशेवर आणि मनात कुजबुज करत राहवे नितांत एकांतात कधीतरी कुठेतरी आणि कसेतरी न केव्हातरी, जावं शांत जगात तिथे आपणाशिवाय आणखी कुणी नसावे आणि असू नये फक्त आपण एकटे राहावे जसे सूर्य स्वतः येतो आणि मावळतो एकटाच ,देतो प्रकाश सोडून आशा संपल्या सारख्या,बमात्र त्याच्या शोधात येतो चन्द्र आणि देतो मिलमील उजेड रात्र चाँदण्यांनी सजवून निळयाशार आकाशाला बनवतो काळ आकाश करून सजवून घेतो मस्त दिव्य चाँदण्यांनी, सूर्य मात्र निघून गेलेला असतो आणि चन्द्र मात्र एक शोधत येतो प्रियकर... पण शोधात होते सकाळ आणि पुन्हा तसाच लपण्डाव चा खेळ चालू असतो सूर्य-चंद्राचा,आणि साथ देणाऱ्या असंख्य चाँदन्यांचा,,!!!!!


 तसाच आजही मी असतो शोधत स्वतःत तुला जिथे तू तिथे मी म्हणत आणि देतो माझ काळीज तुला तुझ्या ह्र्दयात ठेवायला आयुष्यभरासाठी तुझं माझं हक्क असे समजून,,, 

फक्त 

समजून घे मला तू काळीज सोलल्यावर,,, 

एकदा तरी विचार कर !

तुझ्यात जीव ओतल्यावर,,,!

असतात जुन्या आठवणी ! 

जाउदे मी पण विसरतो ,!

नको रडू आता मी असल्यावर,!

नको रडू आता मी असल्यावर....!!!!!!


Rate this content
Log in

More marathi story from Shubham mohurle

Similar marathi story from Romance