रडवेला मन ४
रडवेला मन ४


प्रेम अभूतपूर्व शक्ती! कुणासोबत होतं आणि का होतं समजेनासे होऊन जातं. प्रेमाचे रंग पाहावे ते निराळे नी निराळे, प्रेयसी!!!!!!
मनाची ती आठवण आणि ह्रदयाचे ते ठोके, हेवेदावे करताना प्रत्येक वेळेस जाणवते या अद्भुत शक्तीमागे अस काय दडलंय! प्रेम...
बघावेसे वाटायचे तिला परंतु ती नेमक्या त्यास वेळी ती तिथं नसायची, आधीच आमचं होत पण अचानक पणे नाते हे तिच्यामनात नंतर पुसत झाले मात्र माझे मन अजूनही ती.....
प्रेमाची ही नाती अशी नाही तुटत हो, त्याला अफाट शक्ती लागते त्याला. निर्माणधीन शक्ती अशी तोडू शकेल मात्र मनातील चाहूल मात्र नाही बरं का!!!! काहीही झालं तरी ती आपलीच असावी असं नेहमी वाटतचं. तीन वर्षे उलटून गेली तिला बघायला गेलं तर ती मात्र त्यास वेळेत तिथं नसायची. कोणी तिच्यासारखं दिसलं की मनात शहारा आणि दचकी भरून धड-धड वाढायची आणि घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे टक-टक असं व्हायचे पण...पण....?..?..? मात्र जवळ आल्यावर अस व्हायचं की नेमकी ती नसायची. तिच्या चालण्याच्या नजरेवरून ओळखायचं, तरीही मात्र ती नसावी का? झर्रकन ठोके शांत व्हायचे आणि मन शांत होऊन ती नसल्याने मनःशांती व्हायची. छे-छे ती आली असती ना आणखी उलट स्तब्ध व्हायचं असही धाक भरून मनात गुदमरायचं. तरीही आसुसलेले हे नयन पुन्हा दिसावी ह्या आशेपोटी मात्र आस ठेवायची... ती येणार!!!
मन भरून यायचं आणि ती... असचं बघावं गेली कित्येक वर्षे उलटली कशी असेल ती? दिसते तरी कशी ती? असे मनात प्रश्न यायचे. मात्र एक दिवस उजाडला आणि असचं व्हाट्सअप स्टेटसमध्ये असंच सकाळी हसत आनंदी फोटो ठेवला आणि काय ते आंनद ही आनंद नवीन आणि अद्भुत असं घडायला लागलं ज्याची स्वतः अपेक्षा केलेली नव्हती. संध्याकाळ झाली होती मित्रांसोबत फिरायला गेलो आणि मोबाईल बघता बघता तिचा फोटो नजरेस आला आणि झूम करून बघितला तर खरंच ती होती मनाला अबोल असा आनंद झाला. काय बोलावे काय नाही असं झालं. तो दिवस होता रविवार दिनांक १९/०८/२०१८ आणि मनात आनंद मावेनासा झाला आणि ती आणि ती अशी दिसते लोकांनी सांगलेले सर्व खोटे आहे म्हणजे ती आहे तशीच दिसते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिथं सापडली आणि मनाला खूप बरं वाटलं की तिला असं जरी समोरासमोर बघता नाही आलं तरी मात्र फोटोत मात्र बघता आलं याच समाधान होत. त्याचक्षणी मला आठवलं तिला बोललेले शब्द आणि निश्चय पक्का केला की तिला त्रास तर नाही द्यायचा मात्र जे आपण तिला स्वतःचे सांगितलेले स्वप्न पूर्ण करायचे आणि नंतरच तिला भेटायचे. तिला सांगितलेले आयुष्य खर्ची घालण्यासाठी दुनियेत आपले स्थान काय हे दाखवायचे आणि जी परिक्षा पास होऊन अधिकारी होईन असं सांगितलं त्यासाठी प्रयत्न करून तिला सप्राईस द्यायचं आहे आणि जरी आयुष्यात नाही आली तरी मात्र आयुष्याच्या वळणावरून गेली याचं तरी समाधान नक्की असेल, असचं कुणीतरी यावं आणि अभ्यासात तसेच खूप अश्या व्यावहारीक जीवनात साथ द्यावी जरी ती साथ छोटी असली तरी चालेल मात्र त्यातून जगण्याचं बळ द्यावं, उंच उडता परी पाखरांसोबत उडून जावं, तिच्या साथेने किंवा तिच्या शब्दांसोबत घातलेल्या जिव्हाळ्याने अशीच असावी ती सदा खुश आणि मनमोकळी या जगाला आपलेसे करवून घेणारी जशी ती ह्रदयी...