राही मतवाले
राही मतवाले
बेंगलोर स्टेशन वरच्या, प्रचंड गर्दीत मंगल अक्षरशः बावचळून उभी होती. काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं. कारण आता पंधरा मिनिटात तिची खांडव्याला जाणारी ट्रेन येऊ घातली होती. पण तिचा वेटिंग नंबर" मेला" खूपच हळूहळू कासवाच्या गतीने पुढे सरकत होता.
: मॅडम मे आय हेल्प यु?" तिला घाबरलेलंपाहून, त्यांना प्रश्न केला. तो केव्हाचाच तिला बघत होता. घामाने भिजलेला चेहरा, आणि वारंवार चष्मा काढून तिचं पुसणं बघून ,त्याला बरच काही समजलेलं होतं.
तसं तो सावज हेरण्यात पटाईत होता.
तिने मानेनच नकार दिला .
-आणि तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा फोन" -का ग ?तिकीट कन्फर्म झालं का ?नाही ना ?मग नाद सोड,- आता तू असं कर,- सरळ बस स्टैंड वर जा- तिथून मुंबईला जाणाऱ्या रात्रीच्या खूप बसेस असतील- मुंबई गाठ .,-- कारण तिथूनच खांडव्याकडे जाणाऱ्या खूप ट्रेन मिळतील तुला!"
काहीतरीच काय"? ती रागानं बोलली.
तिला तो पर्याय अजिबात पटलेला नव्हता. "तुम्हाला काय जातं तिथं दूर बसून सुचवायला?"
" बरं बाई मग आता असं तरी कर- निदान!अग ट्रेन धयेताच, तुझं हे वेटिंगच तिकीट लगेच कॅन्सल होईल- म्हणूनच याच ट्रेनच ,तुला दुसर साध तिकीट काढावं लागेल-"
"अरे देवा! म्हणजे? आता दुसर तिकीट ?आणि तेही ,या लांब लचक लाईनीत परत उभ राहून ?"
तिनं वैतागून फोन बंद केला. पण आता पुढे काय? ती हादरलीच! दोन्हीही पर्याय किती अवघड! देवा आता काय करू? वेगाने तिचं कपाळ भिजायला लागलं- घामाचे ते थेंब डोळ्यावर येऊन चष्म्यातूनही तिला नीट दिसेना! किती वेळा पुसायचा तरी मेला याला ?
सगळ्यात आता- काय ठरवायचं? करायचं तरी काय ?
"मॅडम काय झालं?"
परत त्याचा आगाऊ प्रश्न .
पदरानं चष्मा नीट पुसत, तिनं डोळ्यांवर लावला, आणि मग त्याला जरा लक्ष देऊन पाहिलं. साधासा शांत चेहरा ,त्यावर सोनेरी चष्मा ,आणि अगदीच काटकुळा म्हणावा- असा देह! कुठल्याच अँगलने तो गुंड वाटत नव्हता.
"याला खरंच सांगावा का आपला प्रॉब्लेम ?तसा तो किती साधा भोळा-, शांत दिसतोय! हा काही गुंड वगैरे नसूच शकतो."
"अगं असलेच साधे दिसणारे, भुरळ पाडणारे ही असू शकतात-"
तिचं दुसरं मन ओरडलं. ती थोडीशी घुटमळली. पण का कुणास माहित,- तिनं त्याला आपली अडचण सांगून टाकली.
आणि मग तिला ,-स्वतःचा विश्वास देणे, त्याला गरजेचं झालं .
"ताई माझ्यावर भरोसा ठेवा .मै सच मे, आपकी मदत करना चाहता हुॅ, म्हणजे असं आहे की याच ट्रेनची माझ्याकडे दोन तिकीट आहे- एक तत्काल वाला, और दुसरा आर.ए.सी. वाला--, मजे की बात-- दोनोही अभी अभी कन्फर्म हुए है .अगर आप चाहती हो, तो इस आर एसी वाले से -इसी ट्रेन से सफर कर सकती हो -
खरं सांगतोय ताई -मनात शंका आणू नका–
तो मजेदार हिंदी -मराठीत बोलत होता!
पण खरी अडचण तर पुढेच येणार होती-
"पण आर .एस .सी .वाल्या- तिकिटावर तुमचंच नाव असेल ना?"
तिची रास्त शंका. खट्याळ पोरानं ,अवघड गणित सोडवावं -तसं ,त्याचे डोळे चमकले -तो मिश्किल हसला -आणि म्हणाला
"कोई बात नही जी 'ताई ती तर माझी जबाबदारी- आप अभी बस -जल्दी करो ,सच मे मै कोई चोर चक्का नही हुॅ "
असं म्हणत -,त्यानं तिची बॅग उचलली, आणि तो चालू लागला -आणि मग -"नको -नको" असं तिचं मन घोकत असतानाही ,-तिला त्याच्या मागे धावावं लागलं.
त्यानं तिला त्याच्या, सीट नंबर वर, नीट बसवलं तिची
बॅगही, सीटच्या मागे खोलात ढकलली. आणि मग- तिच्याच जवळ बसून राहिला. पुढचे येणारे प्रश्न त्याच्या सुपीक डोक्यानं केव्हाचेच सोडवले असावे कदाचित! लांबूनच-, टी.सी .,एकेकाचे तिकीट तपासत येताना तिनं पाहिल,- अन् तिच्या छातीची धड-धड वाढली. पण तो तर अगदीच शांत होता.
" ताई जरा थोड्या वेळ टॉयलेट मध्ये जाल का?" त्यानं हळूच विचारलं. तिनही तसंच केलं.. थोड्या वेळाने बाहेर येऊन बघते, तर तो हसत होता. कारण टी. सी. येऊन, त्याच्याही तिकिटावर "राईट "ठोकून दिसेनासा झालेला होता."
" लिजिए ताई ,आता आपलं टेन्शन पण एकदम खत्म!- आता रातभर या सीटवर तुम्ही झोपा! कोई टोकेगा नही-"
तिच्या चेहरा एकदमच खुलला- पण पुढचं येणारे संकट? त्याने तिला त्याचीहि कल्पना-, दिली आणि तेही कसं निस्तरायचं हे- तो समजावून लागला-
" लेकिन उसका क्या है कि,- ताई रात्री दुसरा टी.सी .पण येऊ शकतो- तेव्हा काय करायचं नीट ऐका- ये दुसरा वाला" बंदा" आहे ना?- आपके उपर- त्याला हे तिकीट मी देऊन जातो- तुम्ही बस डोक्यावर पांघरूण घ्या, आणि झोपल्याच रहा-, हा" बंदा" ,आपका भी तिकिट उसे बता कर, उससे निपट लेगा- चुपचाप झोपलं रहायचं काय?"
येणाऱ्या संकटांना तिचा लांब झालेला चेहरा परत ठीक- ठाक झाला." वर" बसलेला "बंदा"पण कौतुकाने त्याच्याकडे बघत-, मान डोलावत होता. खरंतर खालची सीट त्याची होती, पण तो देखील मुकाट्यानं वरच्या सीटवर जाऊन बसला होता .मग तिनं निश्वास सोडत मान डोलावली-
"-मै अभी बस-' भागता हुॅ- मेरी तत्काल वाली सीट की तरफ --क्या है-, कि वो टी.सी. अभी वहाभी पहुचता हि होगा "--आणि तो पसार झाला.
तिला त्याच्या या सेटिंगचे मनापासून कौतुक वाटले .आपले पोट भुकेने केव्हाचा टाहो पडत आहे याची जाणीव तिला, आत्ता जरा झाली.
" चला आता जरा सुखाचे दोन घास गळायला काही हरकत नाही "ती पुटपुटली. आणि तिने बॅगेतून .. केव्हाचा ठेवलेला डबा, काढला -तोच नवऱ्याचा परत फोन!
" का ग? काय झालं मग?" त्याची काळजी आवाजातूनही ओसंडत होती. ती थोडी घाबरली. पण धीर धरून खरंखुरं काय -ते तिनं सांगून टाकलं. तो उडालाच.
" मूर्ख डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काहीही करून बसतेस !अगं एकदम कुणावरही विश्वास कसा ठेवतेस तू? असं कोणीही, काहीही, म्हणालं तर त्याच्या मागे- मागे कशी निघालीस तू?
आणि तो पुढे तिला रागवतच राहिला--
तिचा चेहरा खरर्कन उतरला." माझी खरंच काही चूक झाली का?" तिला कळेना!
" बरं आता एवढं तरी नीट करा-- तो काहीही खायला प्यायला देईल, ते -अजिबात घेऊ नका. नाहीतर त्याच्या मागे- मागे केव्हा निघून जाल -हे तुम्हालाच कळणार नाही- दुसरं म्हणजे तो परत आला की त्याच्याच मोबाईल वरून, त्याला माझ्याशी बोलायला लाव- म्हणजे मला त्याचा जरा अंदाज येईल ! अगं आज-काल असे भुरळ घालणारे बदमाश खूप सोकावले आहेत- काय? मी सांगतोय ते नीट कळतंय ना?"
मंगलचा नवरा रागात आला की तिला अहो- जाहो करायचा .
तिचं जरा निवांत झालेलं मन, परत झोके घेऊ लागलं. ."खरंच एकट्या बाईला अशी एवढी मदत कोणी करतो का ?मंगल हे काय करुन बसली आहेस तू!"? तिचं एक मन तिला दोष देत असतानाच,
दुसऱ्या मनानं तिची बाजू घेतली.
" नाही ग तसा मवाली दिसत नव्हता ग तो! खंरच तसा असता ,तर मला टॉयलेट मध्ये धाडलं तेव्हाच माझी बॅग उचलून पसार झाला असता की! असं तर नाही ना झालं? मग?
मनाशी चाललेला उलट- सुलट- संवाद संपतच नव्हता तिचा!
तेवढ्यात तो परत आलाच. तिच्या शेजारीच आपुलकीने बसला."
" ताई कुछ खायेगी ?चहा? तो तर चालेल -"
त्यानं विचारलं."
" नाही- नाही ,माझा उपास आहे. पाणी पण पीत नाही मी!"
घाबरून पटकन डबा, पदरा आड करत तिनं उत्तर दिलं. थोड्या वेळानं मग ,तिनच त्याच्याशी आपण होऊन, गप्पा सुरू केल्या. तोही खूप मोकळेपणानं तिच्याशी बोलू लागला. तो चांगल्या घरचा होता" बाल- बच्चे वाला "होता. त्याच्या बिझनेससाठी त्याला बेंगलोर दिल्ली सतत प्रवास करावा लागायचा. घरात त्याचे आई-वडीलही होते .त्याच्या बोलण्यात कुठेच खोटेपणा जाणवत नव्हता .मग तिने त्याला त्याच्याच फोनवरून ,आपल्या नवऱ्याशी बोलायला लावलं,. त्याच्या अदबीच्या मोकळ्या संवादाने ,तिचा चिंतातुर नवराही, जरा काळजीतून बाहेर आला .थोड्या वेळाने तिने त्याला तिकिटाचे पैसे देऊ केले. पण खूपच संकोचानं नाकारत,- तो लागलीच उठला- आणि निघून गेला.
तिच्या वरच्या सीटवर बसलेला "बंदा "निमूट पणे तिथंच आडवा झाला. मग मंगलनं, खरंच शांतपणे डबा खाल्ला-- आपली चादर काढून डोक्यावर घेत ,तिनं स्वप्नांच्या राज्यात प्रवेश केला--ट्रेनच्या ताल,आणि वेग, तिला मस्त झोके देऊ लागले .आणि मग ,-जागेपणीच घाबरून गेलेल्या तिच्या सशाच्या काळजानं ,तिला दुष्ट स्वप्नांनी घाबरवून टाकलं!
"ती कुठल्या सावली मागे चालली होती- तिचा नवरा तिला हाका मारत होता- पण ती तर, पुढे -पुढे जातच होती,- तिचे पाय काही केल्या, थांबतच नव्हते -तिला जाग पण येत नव्हती! तिनं कूस पालटली,--
आता दुसरं ,आणखीनच विचित्र स्वप्न सुरू झालं! एक आवाज तिच्यावर ओरडत होता" नीचे उतरो, तुम दुसरे के टिकीट पे बैठी हो "
चालत्या ट्रेनच्या दाराशी ती उभी होती. कसं उतरावं हे तिला कळतच नव्हतं. पण तो आवाज तर रागावून ओरडतच होता." नीचे उतरो- नीचे उतरो"--
आणि डोक्यावरची चादर तिनं एकदम काढली. तिला भरपूर घाम आलेला होता .
"कसली मेली नष्ट स्वप्न तरी"!
असं म्हणत तिने घाबरूनच इकडे तिकडे नजर फिरवली .तो वरचा "बंदा" तिला जागवत होता.
" आंटीजी जागीये- मै नीचे उतर रहा हू- सुन रही है ना-? रात मे दुसरा टी.सी. आया था. वो तो अच्छा हुआ, .-आपने सर पर से चादर ओढी थी- तो उसने आपको जगाया नही' मैने झट से आपका टिकीट उसको बता दिया - फिरवो आगे निकल गया- अब आप आराम से सोती रहना, कोई चिंता नही है!"
ते तर मंगलला सांगायलाच नको होतं,- मग ती पुढे खऱ्या सुखात ,घोरत राहिली.
" खंडवा बस, अभी आनेमेही है"- असं कोणीतरी म्हणत तिच्या सीट जवळून गेलं ,आणि मंगल चे डोळे खाडकन उघडले.-
ती घाई -घाईत उठून ,सामान गोळा करू लागली. अचानक एक दुष्ट शंका, तिच्या डोक्यात चमकून गेली. "स्टेशनवर उतरल्यावर गेटशी परत टी.सी. तिकीट चेक करत उभा असणारच आहे !त्यानं विचारलं तर काय सांगायचं? विदाऊट तिकीट प्रवास केलं म्हणून?"
मग परत मंगलच धाबं धणाणलं !कुठलंच तर तिकीट नाहीये तिच्याजवळ! आता??
पण परत तिचा तो "कृष्ण -सखा" बोलवायच्या आधीच हजर !
"ताई आपका वो वेटिंग वाला"तिकीट देना तो जरा, कुठे बिना कामाचं म्हणून- फाड तो नही डाला?"
खरंच त्या तिकिटाला तर- ती पार विसरूनच गेली होती! पण त्याचं आता इथे काय?
तिनं प्रश्नार्थक चेहऱ्याने ते शोधलं ,आणि त्याला दिलं! त्यानं मग -भराभर चेक झाल्याच्या राईटच्या दोन खुणा त्यावर काढल्या, खाली अगम्य अश्या लपेटीत, कुठलीही सही पण ठोकली,--
" बस इसे आप दिखा देना -और बिंदास गेट से निकल जाना-चेहरे पर टेन्शन बिलकुल ही नही दिखना चाहिए- अरे टी.सी. लोगो के पास, इतनी फुर्सत कहा है हर एक टिकीट ध्यान से पढने को!" तिला तिकीट परत करताना तो गमतीने म्हणाला! आता मात्र त्याच्या त्या" जुगाडूपणा "पुढे ती थक्क -थक्क!
"धन्यवाद, तुम्ही एवढी मदत केली नसती तर"
" नाही -नाही ताई"
तिला मध्येच टोकत तो म्हणाला.
" इसकी क्या जरुरत है? क्या है कि -,मी "ये जा" करत असतो ना नेहमी- तर सफर मे कोई जरूरत मंद दिखा,- तो ऐसीही मदत कर देता हु बस! एक आदत सी - पड गयी है मुझे !
अब देखना ,-इसी टिकीट पर ,-आगे भी- ऐसेही किसी बंदे की मदत करता जाऊंगा"
त्याचे मिस्कील डोळे चष्म्यातून हसत होते.
ती आता मात्र -अगदी निशब्द!
प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर क्षितिजावर दूर पुसट होत जाणाऱ्या ट्रेन कडे कितीतरी वेळ ती बघत उभीच होती.!
" असेही प्रवासी भेटतात?"तिचं मन नवलानं विचारत होत !-
