shobha khanwalkar

Children

1.6  

shobha khanwalkar

Children

शाळेचे ते रम्य दिवस

शाळेचे ते रम्य दिवस

8 mins
31

ते दिवस आठवताना ,सगळ्यात आधी तिसरी वर्गातला तो प्रसंग आठवतो .आणि मनातून खूप वाईट वाटते.

खरंच का केलं मी तसं? नक्कीच निरागस वयातलं ते अज्ञान असावं. त्यामुळे दोन मुक्या जीवांना मी किती दुःख दिलं, हे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला समजलं, पण माझ्या हातातून चूक घडून गेलेली होती.

आमच्या वर्गात, खिडकीच्या वर ,अर्धवट उघडी ठेवलेली तावदानं होती. त्या दिवशी बाईंनी, मोठ्या कौतुकांना कबुतरांनी, त्याच्यावर बांधलेलं छोटसं घरटं आम्हाला दाखवलं.

" यात त्यांनी दोन अंडी घातली आहेत. आता काही दिवसांनी ती फुटतील. त्यातून छोटी -छोटी पिल्लं निघतील. कबूतर दिवसभर -रोज त्यांना चोचीतून दाणे आणून खाऊ घालतील. हळूहळू ते मोठे होतील. उडायला शिकतील. आणि मग, ते छान पैकी उडायला लागले, की, निघून जातील." आम्ही खूप मन लावून ते ऐकत होतो.

आणि मग, त्या पुढच्या उरलेल्या वेळात- माझ्या डोक्यात ,एक अफलातून वेगळीच कल्पना शिजू लागली." आपण या अंड्यांना घरी नेलं तर? तिथेच त्यांना उबवू ,मग पिल्ले झाली की आपणच त्यांना मोठं-- करू त्यांना पाळू -त्यांना शिकवू !

मग ते आपली पत्र, उडत एकमेकींना पोहोचवतील"

 मी माझ्या मैत्रिणीला ही कल्पना सांगितली. तिलाही ती खूपच आवडली.

 त्यावेळेस हे सगळं खरंच होणार -असं वाटलं !ते किती अशक्य आहे , केवळ दिवस स्वप्न आहे, असं आम्हाला कोण सांगणारं तिथं कुणीही नव्हतं .मग शाळा सुटल्यावर वर्ग रिकामा झाला. आणि आम्ही टेबल सरकवून आमचा हात तावदाना पर्यंत पोहोचवला. ती अंडी अलगद काढून घेतली .लपवून , ठेवून ,सरळ घरी आलो.

आता प्रश्न होता, त्यांना उबवायचं कसं? ते माहीत कुणाला ?मी अक्कल चालवली. आमच्या घराच्या मागे, छोटासा बगीचा होता. तिथेच  एका झाडाखाली,छानसं गवत पसरवून, त्यावर मऊ कापूस ठेवून ,ती अंडी मी पानांनी झाकून ठेवली. आणि खेळायला निघून गेले. मनात विश्वास होता, की आता ती रात्र भरात , नक्किच उबतील, आणि सकाळी सकाळी छोटी छोटी पिल्लं आम्हाला दिसतील.

 किती वेडी कल्पना होती ती?

 थोड्यावेळाने परत येऊन पाहिलं, तर एक अंड नाहीसे झालेलं --! दुसरं फुटून तिथंच पडलेलं ! माझ्या मनात धस झालं! आणि कळलं बाहेरच्या माऊ बाईंना , रात्रीचं जेवण मिळालेले आहे --!खूप खूप वाईट वाटलं -रडूही आलं!--  पण मी कुणालाच, माझा उपद्व्याप काही सांगितलेला नव्हता.! पोटात मात्र सारखी कालवा-कालव 

चालेली होती .

दुसऱ्या दिवशी आमच्या वर्ग भरला.

 मी पाहिलं, की दोन कबूतरं वारंवार, रिकाम्या घरट्याकडे येत होती,करुण आवाज काढत होती,  रिकाम्या घरट्याला पाहून ,परत जात होती. ते बघून माझ्या छोट्याशा मनाला चटके बसू लागले .मी खूप उदास झाले .डोळे पाण्यांनी भरून येऊ लागले. घरी येऊन ,आजीच्या मांडीवर डोकं टेकलं, आणि मी खूप रडू लागले, तिला सगळं घडलेलं खरं खरं सांगून टाकलं- तिनं शांततेने ते ऐकून घेतलं ,मग मला पोटाशी धरलं, आणि म्हणाली --"अग तुझी चूक तुला कळली ना? मग आता देवाजवळ हात जोडून क्षमा माग-- खरा पश्चाताप झाला, तर सगळ्या चुकांना क्षमा असते बाळा' तू मुद्दामून दुष्ट बुद्धीने ते केलं नाहीस ना? मग झालं! अग मुक्या प्राण्यांना दुःख पोहोचेल असं आपण काहीही करू नये गं"--

 मला ते फारसं कळलं नाही-- मी फक्त देवाला हात जोडले आणि सांगितलं खूप --खूप मोठी चूक झाली रे- आता असं मी कधीच करणार नाही! आणि खरंच त्यानंतर मी असले उद्योग कधी केले नाहीत!

"मी एकही वर्ष नापास न होता पुढे- पुढे जात होते. मराठीत सगळे विषय शिकवले जायचे, त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या नंबर नं चांगली पास होत असायचे .बाई माझ्या हुशारीचा कौतुक करायच्या !माझ्याकडूनच, वर्गामध्ये उभे राहून सगळे धडे वाचून घ्यायच्या.

 पण सहावीच्या पुढे सगळं दृश्य बदललं. मराठी फक्त विषय राहिला, बाकीचे सगळे विषय हिंदीतून शिकवले जाऊ लागले. इंग्लिश, नागरिकशास्त्र, बीजगणित ,भूमिती -ही नवीन  दादा मंडळी ,घुसली,  आणि मग सगळं जरा जड जाऊ लागलं. त्यावेळेस होमवर्क नावाचा आणखी छळवादि प्राणी  डोकावला नव्हता. घरी आलं कि मस्त खेळायचं ,खायचं आणि झोपायचं,.

 तरीही ती  दोन वर्ष बरी पार पडली. मात्र आठवीत  माझी  चांगलीच घसरगुंडी झाली. आणि तिमाहीत मध्ये मला चक्क भोपळा मिळाला.

"शोभा तू गणितात कधीही पास होणारच नाहीस" आमच्या गणिताच्या अनिखिंडी बाई वैतागून मला म्हणायच्या. मी काय करू? मला खरंच गणित समजायचे नाही. तसंच माझा इंग्लिश विषयहि खूप कच्चाच होता. संध्याकाळी घरी आले की भरतनाट्य मध्ये माझा सगळा जीव अडकलेला असायचा. त्याचा परिणाम म्हणजे तिमाही मध्ये मला दोन्ही पेपर मध्ये शून्य मिळालेले होते. त्याचवेळी शाळेतून रिटायर झालेल्या ,-गणिताच्या

तज्ञ आजीकडे माझी तक्रार आमच्या बाईंनी नेली. होती. आणि मग ती पण चांगलीच तापली होती. "आजी गणितज्ञ आणि नात शून्य आणते म्हणजे काय ?"

इंग्लिश चे पूर्ण पुस्तक दोन पाठ केल्याने, आणि गणितात कसेबसे प्रयत्न केल्याने ,मी आठवी वर्ष कसतरी पार पाडलं

. मी सुटकेचा श्वास सोडला , आणि मला खात्री आहे की अनिखिंडी बाईंनाहि

एक डोके दुखी आता टळली म्हणून , बरं वाटलं असावं !कारण आईनं त्यावर उपाय योजना केली.

माझ्या आईला मात्र  मनातून वाईट वाटत असावं. आणि माझी अडचण  तिच्या लक्षात आली , म्हणून एक -दोन मुख्य बदल तिने केले. माझा डान्स क्लास पूर्णपणे बंद केला. इंग्लिश साठी गंधे मास्तरांचा क्लास लावून दिला . गंधे सर अतिशय विद्वान, आणि त्या काळी इंग्लिश घेऊन एम.ए. झालेले असे गृहस्थ होते.. .

आणि गणित सोडून दुसरे विषय मला घ्यायला लावले ते विषय होते सायकॉलॉजी , मराठी आणि नागरिकशास्त्र.

मी एकही वर्ष नापास न होता पुढे- पुढे जात होते. मराठीत सगळे विषय शिकवले जायचे, त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या नंबर नं चांगली पास होत असायचे .बाई माझ्या हुशारीचा कौतुक करायच्या !माझ्याकडूनच, वर्गामध्ये उभे राहून सगळे धडे वाचून घ्यायच्या.

 पण सहावीच्या पुढे सगळं दृश्य बदललं. मराठी फक्त विषय राहिला, बाकीचे सगळे विषय हिंदीतून शिकवले जाऊ लागले. इंग्लिश, नागरिकशास्त्र, बीजगणित ,भूमिती -ही नवीन  दादा मंडळी ,घुसली,  आणि मग सगळं जरा जड जाऊ लागलं. त्यावेळेस होमवर्क नावाचा आणखी छळवादि प्राणी  डोकावला नव्हता. घरी आलं कि मस्त खेळायचं ,खायचं आणि झोपायचं,.

 तरीही ती  दोन वर्ष बरी पार पडली. मात्र आठवीत  माझी  चांगलीच घसरगुंडी झाली. आणि तिमाहीत मध्ये मला चक्क भोपळा मिळाला.

"शोभा तू गणितात कधीही पास होणारच नाहीस" आमच्या गणिताच्या अनिखिंडी बाई वैतागून मला म्हणायच्या. मी काय करू? मला खरंच गणित समजायचे नाही. तसंच माझा इंग्लिश विषयहि खूप कच्चाच होता. संध्याकाळी घरी आले की भरतनाट्य मध्ये माझा सगळा जीव अडकलेला असायचा. त्याचा परिणाम म्हणजे तिमाही मध्ये मला दोन्ही पेपर मध्ये शून्य मिळालेले होते. त्याचवेळी शाळेतून रिटायर झालेल्या ,-गणिताच्या

तज्ञ आजीकडे माझी तक्रार आमच्या बाईंनी नेली. होती. आणि मग ती पण चांगलीच तापली होती. "आजी गणितज्ञ आणि नात शून्य आणते म्हणजे काय ?"

इंग्लिश चे पूर्ण पुस्तक दोन पाठ केल्याने, आणि गणितात कसेबसे प्रयत्न केल्याने ,मी आठवी वर्ष कसतरी पार पाडलं

. मी सुटकेचा श्वास सोडला , आणि मला खात्री आहे की अनिखिंडी बाईंनाहि

एक डोके दुखी आता टळली म्हणून , बरं वाटलं असावं !कारण आईनं त्यावर उपाय योजना केली.

माझ्या आईला मात्र  मनातून वाईट वाटत असावं. आणि माझी अडचण  तिच्या लक्षात आली , म्हणून एक -दोन मुख्य बदल तिने केले. माझा डान्स क्लास पूर्णपणे बंद केला. इंग्लिश साठी गंधे मास्तरांचा क्लास लावून दिला . गंधे सर अतिशय विद्वान, आणि त्या काळी इंग्लिश घेऊन एम.ए. झालेले असे गृहस्थ होते.. .

आणि गणित सोडून दुसरे विषय मला घ्यायला लावले ते 

विषय होते सायकॉलॉजी , मराठी आणि नागरिकशास्त्र.

दुसरे विषय घेतल्याने ,गणिताची कटकट संपली होती .आणि इंग्लिशचा क्लास चांगलाच अंगी लागला होता. मग एका" ढ" मुलीचे हुशार मुलींमध्ये वेगाने रूपांतर होऊ लागलं.

भर दुपारी बारा वाजता सगळे विद्यार्थी उन्हात उभे होते नुकतीच प्रार्थना वंदे मातरम संपलं होतं तोच रागीट आवाजात प्रिन्सिपल बाई बोलल्या

" दहावी ई "चा वर्ग इथेच उभे रहा -बाकी सगळे आपापल्या वर्गात जा".

" काय झाले तरी ?- नक्किच या वर्गाने काहीतरी गडबड केली"- प्रत्येक जणि आपसात कुजबुज करु लागल्या .

"आधी जाताय की-- तुम्हाला सगळ्यांनाहि इथं उभं ठेवू ?"

आणि क्षणात खाली मान घातलेल्या, बाकी मुली पसार झाल्या. आम्ही जागेवरच चुळबुळत होतो, "दहावी ई" हा पूर्ण पिरेड तुम्हाला इथेच उभे राहायचे आहे -लक्षात आलं?"

 परत त्या तितक्याच रागाने बोलल्या .आणि आम्हाला कळेच ना, की "असा मी काय गुन्हा केला?"-

" ही तुम्हाला मिळालेली शिक्षा आहे, आगाऊपणा केल्याबद्दल! तुम्ही मागाल ती टीचर तुम्हाला मिळेल- असं कसं शक्य आहे? मुळात तुमची ही मागणीच, आणि  तीहि -लिखित रूपात, अगदीच चूक आहे. उद्या सगळेच क्लास हव्या त्या टीचर मागू लागतील .तुम्हाला एकदा- दोनदा नाही सांगितले गेले', तरी तुमचा हट्ट  चालूच राहिली! हद्द म्हणजे काल तर ,माझ्या टेबलावर तुमच्या लिखित स्वरूपातील मागणीचा कागद होता. म्हणूनच आता उन्हात पूर्ण पिरेडभर तुम्ही उभे रहा"

 आणि त्या चालत्या झाल्या. 

त्या काळात दुपारचा डबा कोणीतरी आणायचं, पण पाण्याची बाटली आणण्याची प्रथा मुळीच नव्हती. सरळ पळत- पळत जायचं अन नळाला तोंड लावून पाणी प्यायचं!कुठून तिनं 

सांगितलं, आणि आम्ही माती खाल्ली-- असं

 सगळ्यांना झालं होतं !खालच्या आवाजात सगळ्याजणी तिची "बिना पाण्याची तासत होत्या! ती बिचारी गरीब गाय -करणार काय? तिचा शहाणपणा तिच्या गळ्यात आला होता.

 आता दुसरी वही काढून तिनं ,वारं घ्यायचं काम बहुतेकांनी सुरू केलेले होतं!

" ए , मला खूप तहान लागली आहे गं!" उन्हानं "लाल माकड- तोंड" झालेली, माझी शेजारीण मला म्हणाली .

"मला तर बाई अंधारीच येतीये डोळ्यासमोर!"

 दुसरी नाजूकडी बाहुली म्हणाली. 

"अग ती बघ कशी डोलतीये " मी म्हणत होतेच, तेवढ्यात तीच मुलगी चक्कर येऊन चक्क खाली पडली, मुलींचा गोंगाट सुरू झाला-- आणि मग दृश्य एकदमच बदललं-

एक-दोन टीचर पाणी घेऊन धावत आल्या. तिच्यावर पाणी शिंपडू लागल्या." बाई आम्हाला पण- आम्हाला पण पाणी द्या ना जो !"

तो बाईंच्या भोवती कोंडाळं करून ,पाणी मागू लागलं .पडलेली मुलगी अजून शुद्धीवर आलेली नव्हती--बाईंनी तिला उचलून सावलीत नेलं- बाकी आम्हाला पाणी पाजून वर्गात पिटाळलं गेलं! घाबरून बाईंनी  तो सगळा मामला कसातरी सांभाळून घेतला!

 मला खात्री आहे दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलची असल्या कठोर  शिक्षेबद्दल, नक्कीच कान उघाडणी झाली असणार!,

 पण अंदाजे अर्धा तास 35 मिनिटं तरी  आम्ही उघड्या  डोक्यावर सूर्य महाराजांचा क्रोध   सहन करत  होतो.

 आणि हे सगळं कोणासाठी ?तर त्या खूप आवडत्या बाईंसाठी होतं !कीति भाबडं जग होतं तेव्हा आमचं!

Rate this content
Log in

Similar marathi story from Children