सोळाव्या वर्षीची प्रेमकथा
सोळाव्या वर्षीची प्रेमकथा
"सोळाव्या वर्षाची प्रेम कथा ."
थंडीचे दिवस. दिवे लागणीची वेळ. ती अभ्यासाची पुस्तक छातीसी धरून, केंव्हाची त्याची वाट बघत तिथं उभी आह."
”मैत्रीणीकडे अभ्यासासाठी जातेये“ म्हणून घरातून ती खोट सांगून निघली आहे.अधीर हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येतेय ! ”कुणी बघितल तर“,? या विचारानं सुद्धा ,तिचं काळीज सश्या सारख घाबरतय !
”वेडाबाई, अगदी पिक्चर सारखचं घडतय हे सगळं" तिचं दुसरं उमलतं स्वप्नाळू मन, तिला आतून सांगतय....
.या महादेवाच्या देवळा समोर आज त्यांचा भेटायचा संकेत आहे - नाही का? ! पण अजून तो कां येत नाहिये ? कदाचित आलाच नाही तर ? ”कुणि तिला बघण्याच्या आधी, परत निघून जाव का बाई“ ?! कावरी बावरी होऊन ती डोळयात प्राण आणून त्याची वाट बघतीये - ! उशीर होतोय, पण घरी तसच परत जाण्यासाठी पाऊल वळतही नाहिये.
- सरते शेवटी तो, दूरवर दिसला एकदाचा !"
देखो देखो ”वो आ गया“ म्हणत तिच मन आनंदानं नाचलं -
”केंव्हाची उभी आहेस गं“ ?त्यानं विचारलं .
गोरा रंग, छान देवानन्दच्या स्टाईलचे केस वळवलेले, पांढरी शुभ्र पॅन्ट , आणि क्रीम कलरचा बुश शर्ट
उत्तराची वाट न बघता तो घाईत चालू लागला - मग तीहि त्याच्या सायकलच्या दुसऱ्या बाजूनं दुडक्या चालीनं चालू लागली - किती बोलायचं आहे, सांगायचं आहे त्याला !- शब्द सापडत नाही ! तोही जणू लग्न घाईत - एस .एफ.च्या , मंद प्रकाशाच्या रस्त्या वरून दोघं जाताहेत - दूरवरून गाण्याचे सूर येताहेत - ”ऐहसान तेरा होगा मुझपे“ -
खरच अशा या दहा पंधरा मिनिटांच्या भेटित - तिला बोलायला निवांत मिळावा तरी कसा ? इकडे त्याचीही तीच अवस्था ! पण तो मनातून जार जास्तच भित्रा ! करण त्याच्या घरी जुनं वळण. आणि वडील फारच रागिट -
दुरून आता दुसरी रेकॉर्ड वाजतीये -
”जिया ओ जिया ओ जिया कुछ बोल दो“ -
थोडं दूर गेल्यावर सुरक्षित वाटल्यावर त्यानं विचारल - ”पत्र आणलस“?
”घे - आणि तू“ ?
" आणलय ना, "म्हणत खिशातून त्यानं एक जाडसा लिफाफा काढला.
. ”तुझ्या घरी कळलं तर नाही अजून“ ? त्यानं काळजीनं विचारल ! ”नाही रे माझ्याकडे सध्या आजीच आहे“ - "
"पण तुझ्याकडे ? ”"
"नाही अजून तरी! पण घरात सगळेच असतात ना“ आणि मग त्यांची गाडी हळूहळू प्रेेमाकडे वळली
- हळूच त्यानं - तिचा हात धरला - तिनं झटक्यात सोडवून घेतला - तो थोडासा दुखवला.
”रागावलास“ ? तिनं विचारल -
”चल परतु या - खूप वेळ झाला“ - त्याच उत्तर
- ”मग पुढच्या महिन्यात याच तारखेला आणि याच वेळेला,?,
"हो भेटायचं ना !" तो म्हणाला.
आणि अश्या अधूऱ्या, हुरहुर लावण्याऱ्या ,भेटि-गाठीत वर्ष निघून गेलं!
रोज भेटायचं नाही ,ठरवलं होतं, म्हणून कुणाला फारशी कुणकुण लागली नाही . घरात पण पत्ता नव्हता .त्या काळी प्रेमात पडणं म्हणजेच पाप होतं !आईवडीलांची भिती , वरून समाजाचा धाक !
मुलामुलींची मैत्री तर फार लांबची गोष्ट होती .
तेव्हा तो इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता, आणि ती ? फक्त दहावीत !
हे काय वय झालं प्रेम करायचं?
- पण तसं तिला तो लहानपणा पासूनच आवडायचा म्हणा,! - दहावीत त्यांनी एकाच नाटकात काम केलं .-तेंव्हाच त्यालाही ती खूप आवडली .रोज तालमीच्या वेळीस त्यांची नजर एकमेकांत गुंतू लागली, बोलू लागली, आणि मग संधी साधून, ती एकटी असतांना तिच्या जवळ तो एक पत्र दूरूनच फेकून आला!
-पहिलं प्रेम-पत्र ! प्रेमाचा कबूल नामा ! असं त्यांचं प्रेम सुरू झालं, रंगात आलं ! आता ती अकरावीत आली - तो तिसऱ्या वर्षात‘एटीकेटी’ घेत जाऊन बसला. त्यांच्यां भेटी-गाठींचा वेळ आता जास्त-जास्त होत गेली.. आजूबाजू कुजबुज सुरू झाली. पण कुणीच त्यांच्या घरी जाऊन कागाळया केल्या नाही!
त्याला आता नुसत्या स्पर्शा पेक्षा अजून कांहीतरी हवं असायचं ! पण तिच्या पापाभिरू मनाला ते पटेना ! ”लग्ना नंतरच हे सगळ घडायला हवं !“ तिनं साफ सांगितल - "आत्ताच कशाला एव्हढी घाई ?
मग त्यानंहि हट्ट धरला नाही .
- अकरावीत ती फर्स्ट क्लास घेत पास झाली., तो आता चौथ्या वर्षाला होता !
आणि एक मजेदार घटना घडली -! त्याचा छोटा भाऊ राजा ,तिच्याच एका मैत्रणीच्य प्रेमात पडला. ती प्रेम-कहाणी पण, मग वेगात सुरू झाली ! पण त्यांच्या अति वेगाने एक अनिष्ट घडणर होतं, ते टळलं, - राजानं प्रेमाच्या आवेगात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. - वेळीच त्याला घरच्यांनी सावरल - आणि आणखीही कांही अनिष्ट पुढे घडू नये म्हणून, मग दोन्ही घरातल्या मोठ्या मंडळींनी एकमताने त्यांचा साखरपुडा करून टाकला!,
आता राजावर घरातील दोन्ही कडून दबाव आला.
"याच्या पुढे -नीट लक्ष लावून अभ्यास करा, डिप्लोमा पूर्ण करा .तीन वर्षं तुम्हाला देत आहोत .-नोकरी -धंद्याला ,लागा -नाहितर राणीचं लग्न दुसरीकडे करून टाकू !"
त्या धाकानं तो जरा शहाणा झाला , अभ्यासाला लागला.
मागून निघालेली त्यांचि "सुपर-फास्ट"यांना ओलांडून पुढे निघून गेली .--
यांची गाडी मात्र अजूनही "ग्रीन सिग्नल "ची वाट बघत
तशीच उभी होती .
"असं कसं झालं हो?"म्हणत त्यांचे मित्र- मैत्रिणी
चिडवून लागले .
पण इंजिनीयर होऊन एखादि नोकरी त्याला मिळे पर्यंत
दोघं काय करणार होते ?
आताशा रात्रीच्या भेटण्याचा उपक्रम
त्यांनी सोडून दिला होता .सगळीकडेच त्यांच्या प्रकरणाची चर्चा गाजत होती . फक्त घरी कळायचं काय ते बाकी होतं !
ती काॅलज बंक करून , त्यांच्या एका मित्रा कडे त्याला भेटू लागली .तिथे मग गप्पांच्या सोबत ती वेगवेगळे पदार्थ ,त्यांना ,आवडीनें तयार करून खाऊ घालायची !
एकदा असंच, दोन तास भेटून ती घरी जायला उठली तर, - त्याच्या मित्राला काय वाटल देवजाणे.!
”एक मिनिट थांब, मी जरा बाहेर जाऊन, रस्त्यावर सगळं ”आल बेल“ आहे का बघून येतो“ म्हणतच तो गॅलरीत गेला, आणि भूत बघितल्या सारखा धावतच आत आला !
”साल्या तुझे बाब इकडेच येत आहे“ -
घाबरून तो म्हणाला, आणि मग सगळयांची बोबडी वळली
” तिची पर्स तिच्या हातात कोंबत तो म्हणाला - ”पळ लवकर“ ”
अरे पण कुठं ?“ - तिनं गोंधळून विचारल -
न बोलता त्यानं तिला सरळ ,बेडरूम मधे ढकलून दिलं!
आणि दरवाजा बंद करून टाकला.
त्यांचे बाबा , घरात आले . त्यांच्याशी काय बोलायचं होतं ,ते बोलून , निघून गेले ,
दहा मिनिटातच , त्यांच्या राशीतलं "खग्रास ग्रहण "सुटलं !
बराच वेळ तिचं हृदय धाड-धाड उडत होतं .!
(पण घडलं ते अगदी सिनेमा सारखं होतं नाही?"तिचं दुसरं मन -आतून सांगू लागलं -पण अगदी तस्सच, तिनं पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला असता तर ?
अरे बापरे ! थोबाडीत पडली असती त्यांच्या , नक्कीच ?)
असं काही तरी घडावं ,अशी तिची फार इच्छा होती.
आणि मग घडलंहि तस्सच !पण उलटच !तीच- थोबाडीत पडता पडता वाचली .!
ती आनंदात तरंगतच घरी आली होती .आणि त्या भरात तिनं आपल्या खास मैत्रीणीला–आजीला तिचं गुपित सांगून टाकलं !
मग मात्र भीतीनं तिला रात्रभर झोप लागली नाही .-
तिचे वडील रागीट तर होतेच , शिवाय त्यांचा धाकहि
होता
- दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती घरी येताच ”वादळा पूर्वीची शांतता“ तिला जाणवली, हे काम नक्कि आजीचेच !- या विचारात असतांनाच बॅाम्ब स्फोट झाला
- वडिलांनी तिला बोलावून चढत्या आवाजात तिची ”उलट तपासणी“सुरू केली ..
मग तब्बल एक तास ,ती खाली मान घालून ,बोलणी खात होती .
पण स्वतःची बाजू मांडायची ,तिची काही हिम्मत झाली नाही .
त्या काळी प्रेमात पडणं वगैरे इतकं चांगलं मानलं जातं नसायचं !
(पण ही तिसरी घटना सुध्दा कशी अगदी , सिनेमा सारखी घडते आहे ,हे अनुभवताना तिला आतुन
गुदगुल्या होत होत्या .)),
थोड्या वेळाने आईनं आत बोलावलं आणि खूप खूप समजावून सांगितलं!,
"हे वय प्रेमात पडण्याचं नाही, आत्ता फक्त अभ्यास कर , पुढे पाहू"वगैरे. -
तेव्हढ्यातही ती अगदी खुश !
एक त्याचे "दुर्वास गोत्रि "वडील सोडून बाकी सर्व छानच होतं त्याच्या कडे!,
चला एक पायरी तर ओलांडली !--पण पुढे?
पायऱ्या नव्हत्याच ! अक्षरशः लटकता दोरखंड होता !
तो कसा चढणार ? देवच जाणे !
–पण आता त्यांना , तिच्या घरीच भेटायची परवानगी मिळाली होती ."बाहेरचं भेटणं" पूर्ण बंद करून टाकलं गेलं !
तो इंजिनीयर झाला , आणि त्यांनं बाहेरची नोकरी स्वीकारली . बाहेरच्या जगात फिरायचं स्वप्न त्याने आधिपासून जोपासलं होतं ! त्याचा लहान भाऊ राजाही डिप्लोमा होऊन नोकरीला लागला होता. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बोलणी आता सुरू झाली होती. कॉलेज मधे मैत्रणींचा ग्रुप गप्पांमधे रंगला कि राणि (तिची मैत्रिण) त्यांच्या संसाराची स्वप्न रंगवून सांगायची ,- ते ऐकून तिच्या हृदयात कळ यायची ”माझ कधी“ ?
तिचं आशाळू मन विचारायचं!,
पण त्या नंतर झालं उलटच ! तिचा चक्क प्रेमभंगच झाला !
तो एक एप्रिलचा दिवस होता ! दुपारी पेास्टमननं एक जाडजूड पाकिट तिला दिलं. अर्थात त्याचचं होतं ते ! अधीर होऊन तिनं ते फोडल आणि वाचायला सुरवात केली - आणि तिचे डोळे पाण्यानं भरले चेहरा लाल झाला, ओठ थरथरू लागले, तिला पत्र पूर्ण वाचवेना.! पत्र बाजूला फेकून ती उशीत तोंड खुपसून, रडायला लागली.
”मी इथे एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे. मी तिच्याशीच लग्न करीन. मला विसरून जा.“ वगैरे - पूर्ण पत्रात त्यान तिला हेच वारंवार सांगून ,पटवून दिलं होतं .
! तिला अक्षरशः धक्काच बसला.
”मग ते चार वर्षा पासून चाललेलं काय होतं ?,त्यांचं प्रेम खोटे होतं ? धोका होता“ ?
विचार करून ती थकून गेली.दोन दिवसातच मनाच्या त्या खोल वेदनांनी तिचं शरीर काबीज केलं. - तिला सडकून ताप भरला. डॉ. नं टायफाइडचं निदान केलं.
तिचं अन्न बंद झालं, कालेजहि बंद झालं ! दिवसें दिवस ती नुसत्या गुंगीत पडून असायची ! त्यांच्या भेटिच्या अनंत आठवणी तिला रोज छळायच्या !
शेवटी तर "मरूनचं जाव "हा विचार तिच्या मनात घर करू लागला !
पण एका संध्याकाळी अचानक तो घरी आला. तिच्या आई बाबांशी त्यांन संवाद सुरू केला - तिला वाटलं छे भासच आहे हा ! -
पण थोड्या वेळानं तिच्या कपाळावर एक गरम स्पर्श झाला, ! तिनं डोळे उघडले. तर”तो “ - जवळ उभ!,- तिच्या जवळ अलगद बसत', त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतात.
”ही काय अवस्था करून घेतलीस ग ? इतके दिवस तुझं पत्र नाही - म्हणून मीच तातडीनं निघून आलो. काय झालय- सांग तरी“ . !त्याच्या स्पर्शानचं - न बोललेलं कितीतरी तिला सांगून टाकलं ! आणि तिच्या गालावरून पाणी वाहायला लागल.
”तूच त्या पत्रात लिहिलं होतस ना, मला विसरून जा म्हणून“ - तिचे शब्द हुंदक्यांनी घशात अडकले . तिला पुढचं ब़ोलवेना,शरीर थरथरू लागले.--
"अरेच्चा!कोणचं पत्र?“
त्याला आठवायला जरा वेळ लागला .
अरे हो,ते पत्र? "
"वेडी रे वेडी !अग पूर्ण तरी वाचले का ?
तिनं "नाही "म्हणून डोकं हलवलं .
"अगं ते तर" एप्रिल फूल "होतं "खरं वाटलं काय तुला ?
मी असलं काही करू शकतो, असं वाटलच कसं तुला?,अगं राणी , एकदा तूच मनाला भावलीस ,मग कुणी दुसरी ,आवडेलच कशी सांग?
इतकं मनाला लावून घेतात का कधी?--"
तो तिच्या केसांवरून हात फिरवत पुढे आणखीही काहीबाही बोलत राहिला–
आणि तिचं मन पिसा सारखी हलकं होत ,वर वर उडू लागलं ! "आत्ताच यांचा हात धरून दूर कुठेतरी उडत निघून जावं"असं तिला झालं ! मनात भरलेला अंधार केंव्हाचाच , नाहीसा झाला .--
ती नकळत त्याच्या मिठीत शिरली . इतक्या वर्षांनंतर
तो पहिला -वाहिला प्रेमाचा पहिला जादुई स्पर्श होता!
–"चल, तयार होत लौकर!, आमच्या घरी बोलावले आहे तुला!"तो तिच्या कानात सांगत होता ."आई
बाबा म्हणताहेत , दोन्ही लग्न बरोबरच उरकून टाकू !"
-सुखाच्या लाटांवर लाटां, तिच्या मनात भरती करु लागल्या !
."अरे यार !हे मात्र आता सिनेमाहून,जरा जास्तीच होतय नाही का"?
: - तिचं खटयाळ मन खुदखुदत म्हणत होतं -

