द मेसी - मेसनाईट डिनर
द मेसी - मेसनाईट डिनर
—ज्युनीयर ऑफीसर (मास्टर शेफ ) आज खूपच उदास झाला होता. काल रात्रिच्या 'मेस नाईट' ची सगळी जबाबदारी त्याच्या अनुभवी खांद्यांवर होती. त्यानं नेहमी प्रमाणे सर्वच खूप काळजीपूर्वक आखलं होतं, सूचना दिलेल्या होत्या - मेन्यू निवडला होता - ,डिनर सर्व्ह करणारे सेलर्स निवडले होते. फार काय, प्रत्येक डिश सर्व्ह झाली की बँडवर कुठली धुन वाजवायची हे देखील निवडलेलं होतं.
– अर्थात या सगळ्यात जाणाऱ्या सी.ओ.च्या आवडीची कमीच, पण येणाऱ्या सी.ओ.च्या आवडीची विशेष काळजी घेतली होती. हो- लौकरच त्याच्या प्रमोशनची गोड बातमी येऊ घातली होती. उगीच तिच्या,या "नव्याची “माशी नको शिंकायला".
पण कां कोणास ठाउक, सगळच बिघडायला लागलं होतं. त्याच्या करीयरवर आता 'बॅड परफार्मेन्सचा" शिक्का लागणार होता आणि त्या महत्वाच्या संध्याकाळी त्याचं हसं झालं! अजून -वर घरी बायको नाराज झाली होती ते वेगळ!“. नसीब – तो क्या करेगा पांडु” या अस्सल शिवी बरोबर सुस्कार सोडत तो आज ड्युटिवर गेलेला होता. पण रात्रभर त्याच्या डोळ्यासमोर 'ती' रात्र येत होती.
—---सुरवातीला, समोरच्या लेन मधे मोठ्या ‘बड्यांचे’ मोठे-मोठे स्पीच झालेले होते. एकमेकांना हार घालणं चाललेलं होतं ,--आणि खेळीमेळीच्या वातावरणातच स्मॉल 'इटस"' बरोबर बाकीच्या" बहुतेकांची" नजर आजूबाजूच्या 'रंगीत’ खिदळण्यावरून भिरभिरत होती,--
–"आज आपल्या शेजारी 'कोण' बसणार? बोलायला कसं सुरवात करायची? कसले हुकमी जोक्स सांगून ‘तिला’ हसवायचं? "ह्याची उजळणी बहुतेक करत असावा. तो मात्र मनापासून सगळ्या व्यवस्था बघण्यात गुंतलेला. पण त्याला बिचाऱ्याला काय ठावे, सगळं नीट व्यवस्थित असतानाहि फजिती झाली ती व्यवस्थेमुळे नाही, माणसांच्याच चुकांमुळे आणि मुळात त्या वेळेसच्या त्यांच्या त्यांच्या वाईट 'मूड'मुळे. –
–आडव्या 'विशेष' लइनीमधे, बरोबर मध्यावरच्या विशेष सजवलेल्या दोन खुर्च्यांवर– ती दोघं "सीओज "बसली आणि, त्यांच्या शेजारी बाकीचे अडमिरल्स, त्यांच्या बायकांसह बसते झाले. –
–पहिले पासूनच ‘त्या’ दोघांची आपसात खूप स्पर्धा चाललेली होती. बरोबरच एका पाठोपाठ एक अशी प्रमोशन्सहि. त्यांना मिळत गेलेले होते. पण आता मात्र मिस्टर साहनी रिटायर होणार होते. मिस्टर दत्ता नवीनच आल्यामुळे त्यांना पुढच्या प्रमोशनचा देखील चांस होताच!. यामुळेच वरुन वरुन खूप खेळीमेळीचं बोलणं चालत असतानाही साहनी मनातून बरेच नाराज होते. पण दत्ता मात्र खरे खरे आनन्दात होते. ‘चला वाटेतला एक काटा दूर होतोय’ हा भाव त्यांना लपवताना बरेच कष्ट पडत होते.
–पण अचानक समोरच्या उभ्या दहा ओळींपैकी एकीत -, एक गोंधळ सुरू झाला– आणि त्यातील कमोडर गुप्ताला एकदा तीच शिवि मनापासून हासडावीशी वाटली. –
–त्याचं काय झालं,- ते आपल्या नावाच्या सीटवर बसले आणि, शेजारच्या टेबलावरची पाटी, खूप आस लावून वाचली.-- हो आणि खरंच ती पाटी ‘तिच्या’ नावाचिच होती.(केंव्हाचच ,' ती' त्यांच्या मनात , वस्ती ला होती )आनन्दाच्या उकळ्या फुटत असतानाच एका सेलरनी ती पाटी घाई घाईनं उचलली.(अश्या ,डिनर साठी ,कुणाचीच बायको जवळ बसणार नाही ,हा जुना रिवाज होता )
“नाऊ व्हॉट हँपन्ड", तो रागानं खेकसलाच.
"सर, धिस मैडम इज नॉट कमींग, सो सम एडजस्टमेंट..., सॉरी सर.” त्यानं खारीच्या वेगानं ती पाटी उचलली आणि दुसरी पाटी तिथं ठेवली. मोठ्या आशेनं त्यानं नव्या पाटिकडे नजर टाकली ,आणि ती तिथंच खिळून राहिली. –
“तिच्यावर नेमकं त्याच्या बायकोचं नाव होतं”. -
आता डिव्होर्स पर्यंत आलेल्या त्यांच्या भांडणां मध्ये उगीचच अशी जीवघेणी कलाटणी?
–जबरदस्तीनं हसणं बोलणं आणि कदाचित परत तोच कंटाळवाणा संसार. –
“तू तर सात जन्म माझा पिच्छा सोडणार नाहीस.” तो वरवर हसून– गुरगुरत हळूच म्हणाला. त्यानं घरी 'घेतलेली’ पार उतरली होती.
"मी देखील तोच विचार करत होते, इथे तरी निदान दुसरा कुणी चार्मिंग, हँडसम थोडा वेळ शेजारी असेल. !पण वेताळ मानेवरून क्वचितच उतरतात नं“.! आणि ती खुदकन गोड हसली. तसं करणं भागच होतं ना!
–आणि "फाइव्ह-कोर्स डिनर सेरीमनी "सुरु झाला. पहिले फ्रेंच ओनीयन सूप आले, - आतून जळून खाक झालेले सी.ओ. साहनी मनापासून खुश झाले. ‘चला, एवढं तरी मनासारखं झालं म्हणायचं!’ त्यांनी मोठा चमचा उचलला आणि त्यावर चीज लावून, तरंगत असलेला ब्रेड क्रमसचा तुकडा टाकून ,तो अलगद घशात ओतला.
“मस्तच”, आतूनच त्यांनी दाद दिली.-
त्यांनी सुरवात केली, तशी मग सर्वांनी सुरु केलं– आणि मागे उभ्या असलेल्या मास्टर चीफनं– सीनीयर-मोस्ट सेलरने', खूण करताच समोरच्या स्टेजवर बसलेल्या बँडनं पाश्चात्य संगीत सुरु केलं. ‘
व्वा, क्या बात है'. -पण पूर्ण तल्लीन होऊन सूप ओरपताना, त्यांना भान उरले नाही. -आणि मग पुढच्या क्षणाला घात झाला.सहजच त्यांनी डिशमधे आपले चमचा-पोर्क चुकून उताणे ठेवले.--.
म्युझीक एकदम बंद झालं. पांढऱ्या युनीफॉर्म मधल्या सेलर्सची रांग शिस्तित लेफ्ट-राइट करत वेगानं आली, आणि त्यांच्यासकट –सर्वांचे बाऊल घेऊन चालती झाली.--
सी.ओ. मोदींचा रागानं चडफडाट झाला.
"एवढी शुल्लक गोष्ट सुद्धा आयुष्यात मनासारखी मिळू नये?"
त्यांनी मागे वळून ,गुरगुरत ,मागच्या सेलरला खूप फटकारलं. तो बिचारा 'यस सर-यस सर’ करत राहिला. काय करतो बापडा?
"सर सॉरी, आपने आपके स्पून्स तो सीधे रख दिये. तभी तो मैने बँड को इशारा किया”. त्यानं तरीही केविलवाणं सांगितलं.-
आणि मग साहनींच्या लक्षात आलं. ‘मीच तर घोळ घातला. स्पून्स क्रॉसमधे ठेवायचे होते,- ती, अजून खात आहे -,याची खूण होती. उताणे स्पून्स तर खाणं संपल्याची खूण असते.--
"किती चुका करशील तू मोदी जाता जाता’, त्यांनी मनात स्वत:लाच फटकारलं. आणि डिनर पुढे चालू झालं.
येणारा सी.ओ. तर खूपच खूश होता-,. कारण त्यानंतरचा प्रत्येक पदार्थ त्याच्या आवडीचा होता.
–मग सी.ओ. साहनींनी मागच्या सेलरचा चेहरा आणि नाव चांगलंच लक्षात ठेवलं !!. आता त्याचं डिमोशन नक्किच होतं. !
"अरे... पुढयातला भरलेला सूपचा बाऊल उचलून नेला जातो, म्हणजे काय? त्याला एवढं समजायला नको? "
पण , गंमत म्हणजे , मागे उभा असलेला सीनीयर-मोस्ट सेलर आहूजा साठी ते म्हणजे, एक वरदानच ठरणारे होतं
- त्याची दुःखांतिका वेगळीच होती. आता तो अगदि सीनीयर-मोस्ट होता. पण ,लठ्ठ पगार, अनेक सुविधा घेऊनही तो असमाधानी होता. -
त्याची बायकोहि हे सगळं घेऊन खुश नव्हती- कारण सीनीयर-मोस्ट असला तरी "सेलर" –तो सेलरी! ऑफीसरचा रुतबा त्याला शेवटपर्यंत मिळणार नव्हताच.
शेवटि त्यानं खूप विचार करून, आणि चाळिशी उलटली तरीसुद्धा ,रात्रंदिवस अभ्यास करून ऑफिसच्या पदासाठी परीक्षा दिल्या होत्या. सीनीयर-मोस्ट सेलरला मिळणारी ती एकमात्र संधी होती, –ऑफीसरचा मानापानाचा युनिफॉर्म घालयची.! तिचा फायदा त्यानं घेतला आणि परिक्षेत तो पासहि झाला होता. ऑफीसरच्या तोऱ्यात तो आता वागायला लागला होता. त्याची बायकोहि आता नवऱ्यावर जाम खुश होती. सेलर्सच्या बायकांशी ती आताशा बोलणं टाळू लागली!.ऑफिसर्सच्या बायकांमधे उठ-बस करायचा तिचा जोरदार प्रयत्न चालू झाला होता. !
–पण रात्रि नवऱ्यानं जेव्हा झालेली फसगत तिला सांगितली, ती जाम बिथरली.
“म्हणजे काय? आता तर किती तरी नवीन साड्या ड्रेस लागणार!. एवढ्याश्या पगारात ते कसं परवडणार? "
अचानक त्याचा हा खुशीचा फुग्गा फुटला,. कारण त्याला कळलं होतं की ऑफीसर क्लास मधे आपण सामिल होऊ तर खरच– पण एक ज्युनीयर-मोस्ट ऑफीसर बनून. !
म्हणजे,त्याचा लठ्ठ पगार आता एकदम कमी होत होत, ज्युनीयर ऑफीसरच्या पे-स्केल मधे जाणार होता - आणि तो तर एकदमच कमी होता. आत्ता मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्यूनीयर म्हणून बंद. शिवाय छोट्याश्या राहत्या क्वार्टरमधे राहवं लागणार. कारण ज्युनीयर ऑफीसरचे एकही घर रिकामे नव्हते.--
म्हणजे रुतबा वाढणार पण त्याला भिकारी करून.!
“हे देवा, हे मी काय करुन बसलो!”, असे म्हणत त्यानं आपले कपाळ ठोकून घेतले. पण आता त्याचं काय ? भात्यातून बाण तर सुटून गेलेला होता.
त्या दुःखात असतानाच त्याच्या कडून ही घोडचूक झाली होती - आणि सी.ओ. साहनींचा भरलेला सूपचा बाऊल उचलला गेला होता. पण आता त्याला खात्री होती - त्याचे डिमोशन नक्कि! म्हणजे पूर्वीचा लठ्ठ पगार, सगळ्या सुख-सुविधा - जश्याच्या तश्याच मिळणार.
"नकोरे देवा, हवा कुणाला तो निव्वळ रुतबा?मरो ते प्रमोशन,. मी आपला सेलरच बरा, असं मनात म्हणत तो आता जाम खुश होता. –
पण त्यानंतर मात्र डिनरचे बाकीचे कोर्स सुखरूप पार पडले होते. आणि शेवटी परत घात झाला.--
–भरलेले ग्लास उंचावून 'टोस्ट’ करण्याची वेळ आली - आधी- सी.ओ. दत्तांनी नंतर, सगळ्यात ज्यूनीयर ऑफिसरनं– माधवननं -हा सोपस्कार पार पाडायचा होता. हो.. तसा रिवाजच होता ना मुळी. पहिला टोस्ट- प्रेसिडेन्ट ऑफ इंडीयाच्या नावानं...
दुरा टोस्ट जाणाऱ्या सी.ओ. साठी...
याच साठी ज्युनीयर माधवननं जीवाचा केव्हढा आटा-पिटा केला होता. असं नशीब फारच थोडयांच असतं. प्रत्यक्ष सी.ओ. आणि मोठमोठ्या ऑफिसर्सचा डिनरचं निमंत्रण येणं, आणि ज्युनीयर ऑफिसरचा" असा "मान मिळणं.!
रात्र-रात्रभर जागून त्यानं मग उंच स्वरात “फॉर द हेल्थ ऑफ अवर प्रेसीडेन्ट ऑफ इंडिया”
आणि “फॉर द गुडलक ऑफ अवर सी.ओ. साहनी” या वाक्यांना तोंडपाठ केलं होतं.
'हो, कुठे वेळेवर स्वरात, आवाजात, उच्चारात चूक नको व्हायला. आपल्याला नीट जमेल का नाही या शंकेनं तो आजूनहि खूप अस्वस्थ होता, घाबरत होता.
तरी घरी त्याची बायको त्याला सारखा धीर देत होती. "घर में कैसे शेर बनके मुझपे, बच्चों पे दहाडते हो ? अब क्या हुआ? ओ मेरे चूहे राजा- घबराना नहीं. आँखे मीच के जोर से चिल्लाना”. तो रागानं लाल झाला होता.
पण आता खरी खरी वेळ आली होती.
“फॉर द गुड हेल्थ ऑफ अवर प्रेसीडेंट”, खणखणीत स्वरात दत्तांनी हात उंचावून पहिलं टोस्ट केलं.
माधवन पटकन उभा राहिला. पण त्याचे पाय अचानक लटपटत होते. त्याला काहीच आठवेना. नुसतंच हात उंचावून त्यानं असह्यपणे बायको कडे पाहिले. तिनं जोरदार चिमटा घेऊन हळूच म्हटलं ! “कहो ना ‘फॉर द हेल्थ ऑफ अवर प्रेसीडेंट’ आणि त्याच्या घशातून कसा तरी चिमटल्या सारखा आवाज निघाला:- “फॉर... फॉर द - गुड हेल्थ ऑफ अवर प्रेसीडेन्ट”. त्याचे शेवटचे शब्द एकात एक पाय घालून आपटले. आणि सगळी कडून दबलेलं हसू निघू लागलं-
दुसऱ्यांदा दत्ता मग रागानं ओरडलेच, “फॉर द वेल बीईंग ऑफ अवर सी.ओ. मिस्टर साहनी”.
मग मात्र माधवनचा धीर पार सुटला. त्याला ओरडताच येईना. हात उंचावून त्यानं घशातून जे शब्द काढले ते एका विचित्र जनावराच्या गुरगुरुण्या सारखे होते. त्याला काही बोलताच येईना. आता मात्र सगळेच मोठमोठ्यानं हसू लागले. –
तो ओशाळून चुळबुळत हात उंचावून तसाच थोडा वेळ उभा होता. आणि मग हळूच बसला.
हसता हसता सी.ओ. साहनी म्हणाले, “नो प्रोब्लेम, ऐसे कुछ लोग तो होने हि चाहिये. नही तो वो मेस नाईट किस बात की? ”
आणि मग त्यांनीसमोरचा मेन्युकार्ड उचललं ,त्यांचे आठवून आठवून छानसे एरोप्लेन बनवले, आणि हवेत उंच उडवले. त्या बरोबरच ताणलेलं वातावरण एकदम निवळलं. मुक्त कल्लोळात खूपसे कागदाचे एरोप्लेन्स उंच हवेतून इकडून तिकडे आदळू लागले.
कागदाचे अनगाइडेड मिसाइल्स.
