Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

2  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

पुनर्जन्म

पुनर्जन्म

5 mins
93


ताई आज तुमची मुलाखत टी व्ही वर दिसणार काय? शिला नंदिनी ला नाष्टा देत म्हणाली. हो शीला तू सुद्धा नक्की बघ. ताई बघणार की तुमचं काम किती पुण्याचं आणि माणुसकीच आहे . मला अभिमान वाटतो तुमचा. शीला म्हणाली. शीला माणूस म्हणून जे वाटते ते मी केले बाकी माझा काम लहान की मोठं ते मला नाही माहीत पण लोकांच्या उपयोगी मी पडते यातच मला समाधान आहे. पण याच सगळं श्रेय रेश्मा मॅडम ना जाते. नाष्टा संपवून नंदिनी निघाली. शीला तुझं काम झालं की तू जा आणि संध्याकाळी माझा कार्यक्रम बघ. मला आता आश्रमात जायला हवे. हो ताई जा तुम्ही . नंदिनी एक कर्तव्यदक्ष लेडीज जिल्हाधिकारी होती. काम सांभाळत तिने एक अनाथ महिला आश्रम ही सुरू केला होता. नंदिनी चा इथ पर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नवहता. आज तिच्या कडे पैसा,सत्ता आणि अधिकार ही होता पण एके काळी तू काही ही करू शकणार नाहीस,आमच्या घराण्याला मिळालेला तू शाप आहेस हे शब्द स्वतः च्या वडिलांच्या तोंडून तिला ऐकायला मिळाले होते. घर सोडून तिला आठ वर्षे झाली होती. हे आठ वर्षे खूप दुःखात आणि कष्टात तिने काढले होते. पण जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर आज नंदिनी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जात होती. नातेवाईक,हा समाज आणि भेटणारे लोक सगळ्यानी तिची अवहेलना केली होती. तू आयुष्यात काही ही नाही बनू शकणार म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडावर नंदिनी ने जोरात चपराक दिली होती. कोणाला कसली ही मदत पाहिजे असेल तिथे नंदिनी हजर असायची. दिन दुबळ्याची आणि गरजवंताची ती पालनहार बनली होती. समाजाने नाकारल्या वर कोणत्या दुष्ट चक्राला सामोरे जावे लागते हे फक्त तीच जाणून होती. नियती ने तिला एका वेगळ्या परीक्षे साठी जणू जन्माला घातले होते. पण खूप सारे दुःख ,यातना सहन करून ही नंदिनी ने हार मानली नवहती ना की आपल्या नशिबाला दोष दिला होता. तीच म्हणणं होतं की जे जगावेगळे असतात तेच काहीतरी अफाट करू शकतात. हो ती होतीच जगावेगळी .. 

   वयाच्या तेराव्या वर्षी नितेश ला आतुन काही वेगळ्या फिलिंगज येत होत्या. मुलगा असून ही त्याला आपण मूलगी आहोत असच वाटत राहायचे. या बद्दल कोणा जवळ बोलू ही शकत नव्हता. अशीच चार पाच वर्ष निघुन गेली. आता नितेश ला प्रचंड अस वाटू लागले होते की आपले शरीर जरी मुलाचे असले तरी भावना मुलीच्या आहेत. जेव्हा त्यालाच हे सगळ असह्य झाले तेव्हा आई बाबा समोर त्याने हा विषय काढला. आपला एकुलता एक मुलगा अस अभद्र आणि विचित्र बोलत आहे म्हणुन नितेश च्या बाबा नी त्याला ख़ुप मारले. आई ने समजूत घातली त्याची पण त्याच मन हे मानायला तयार नव्हते. आई मग नितेश ला घेवून डॉक्टरां कड़े गेली. डॉक्टर म्हणाले की नितेश चे ऑपरेशन करावे लागेल. कारण त्याच्या भावना या सगळ्या फेमीनाईंन च होत्या. ट्रांसजेंडर करून घेणे गरजेचे आहे. नितेश चे बाबा त्याला ख़ुप बोलले आणि घरातून निघुन जा म्हणाले. आई ने मात्र आपले दागिने मोडून नितेश चे ऑपरेशन केले. आता नितेश ची ती नंदिनी बनली होती. आपल्या मुळे आई बाबा ना त्रास नको म्हणुन नितेश ने घर सोडले. रस्त्यावर फिरत असताना ख़ुप लोक त्याला हिजड़ा म्हणुन हिनवत असायचे. कोणी काही खायला दिले तर तो खात होता नाहीतर उपाशी च बागेत किंवा बस स्टैंडवर तो झोपत असे.एके दिवशी काही टवाळ खोर मुलांनी नितेश ला बागेत झोपलेले बघुन त्रास द्यायला सुरवात केली. तेव्हा तिथुन जाणाऱ्या कांता चे लक्ष नितेश कड़े गेले. तिने मग त्या मुलांना हाकलून लावले. कांता ही किन्नर च होती. तिने नितेश ची काळजी पुर्वक चौकशी केली. नितेश ला आसरा नाही म्हणुन मग आपल्या सोबत घेवून आली. एका चाळी वजा झोपड़पट्टीत कांता राहत होती. आता नितेश नंदिनी म्हणुन कांता सोबत सिग्नल वर,दुकानदारां कड़े पैसे मागत फिरत होती. कसे बसे दोन वेळचे खायला नंदिनी ला मिळत होते. पण लोकांचा त्रास जास्त होत असे. अशातच एक दिवस कोरोना नामक महामारी सगळी कड़े उदभवली. लोक बाहेर पडेनात की दुकान चालू होईनात. सगळच ठप्प झाले होते. यातच नंदीनी आजारी पडली . कांता ने तिला सरकारी दवाखान्यात नेले तिथे गेल्यावर समजले की नंदिनी ला कोरोना झाला आहे मग तिला हॉस्पिटल मध्ये ऐडमिट करावे लागले. नंदिनी चे आधीच हाल झाले होते त्यात अजुन ही कोरोनाची भर पडली . तिला आता जगण नकोस झाले होते. सरकारी हॉस्पिटल त्यात सगळे कोरोना ग्रस्त रुग्ण कोण आजाराला कांटाळुन आत्महत्या करत होते तर कोणाचा कोरोना ने मृत्यु नंदिनी डोळ्या समोर बघत होती. आपली ही अवस्था अशी च होणार या विचाराने ती अजुनच निराश झाली. नितेश म्हणजेच नंदिनी चे शिक्षण चांगले पदवी पर्यंत झाले होते पण नशिबाने तीची क्रूर थट्ठा केली होती. हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णाची मानसिकता बदलावी आणि ते आजारा तुन लवकर बरे व्हावेत या साठी मानसोपचार तज्ञ डॉ. रेश्मा तिथे आल्या होत्या त्यांनी रुग्णाना कोरोना बद्दल गैरसमज काय आहेत किंवा हा आजार बरा होऊ शकतो हे पटवून दिले. नंदिनी ने बरेच प्रश्न डॉ. रेश्मा ना विचारले त्या वरुन रेश्मा ला समजले की नंदिनी जरी ट्रांसजेंडर असली तरी बुद्धि ने हुशार आहे तेव्हा रेश्मा ने तिच्या सोबत बोलून नंदिनी ला आयुष्यात तू बरेच काही करू शकतेस हा आत्मविश्वास दिला. नंदिनी ला आपल्या सारख्या लोकां साठी काम करायची इच्छा होती तेव्हा रेश्मा ने नंदिनी ला एम पी एस सी चा अभ्यास कर आणि परीक्षा दे म्हणाली. नंदिनी ने मनाशी पक्का निर्णय केला आणि रेश्मा मैडम च्या मदतीने एम पी एस सी चा अभ्यास लवकरच सुरु केला. कोरोना च्या काळात हॉस्पिटल मध्येच नंदिनी पुस्तकें वाचत राहिली त्यातून तिला नव नवीन मार्ग सापडत गेले. महिन्या नन्तर कोरोना मुक्त होऊन नंदिनी परत कांता कड़े आली आणि अभ्यास करून परीक्षा देणार या बद्दल बोलली. नंदिनी चे स्वप्न पूर्ण झाले होते. एक ट्रांसजेंडर व्यक्ति जिल्हाधिकारी म्हणुन आज कार्यरत होती. आपल्या सारख्या महिलां साठी आणि गरज महिला साठी सुद्धा एक अनाथाश्रम तिने सुरु केला होता सव्हताच्या आत्मविश्वासा वर आणि जिद्द चीकाटीने ती इथ पर्यंत पोहचली होती. कोरोना वर मात करत जणु नंदिनीचा पुनर्जन्म झाला होता.आपण जसे आहोत तस नंदिनी ने स्व:ताला स्विकारले आणि समाजाशी लढा दिला. ख़ुप लोकांनी तिला नावे ठेवली होती. तर कोणी चक्क ये हिजड़ा,नाच्या या शब्दात तीची अवहेलना केली होती. आज एका न्यूज चैनल वर तीची मुलाखत होती. नंदिनी ला आपण कोणी वेगळे आहोत अस कधीच वाटले नाही. नितेश पासून नंदिनी बनून तिने स्व:ताचे अस्तित्व निर्माण केले होते. हाच क्षण तिच्या साठी विजयाचा ठरला होता. 

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)

समाप्त.

...............

लैंगिकतेच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांनाच समाज स्वाभाविक मानतो. वास्तविक या पलीकडेही लैंगिक प्रवृत्ती असते. पुरुषाच्या शरीरात स्त्री आणि स्त्रीच्या शरीरात पुरुष असू शकतो. निसर्गाने हे दान ज्यांना दिले आहे, अशांची मोठी घुसमट होते. भिन्न लैंगिक प्रवृत्ती असूनही घरच्यांच्या व समाजाच्या दबावामुळे त्यांना निमूटपणे आहे त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यातून संघर्ष करून जे आपली लैंगिक ओळख जाहीर करतात त्यांना ना घरचे स्वीकारतात, ना बाहेरचे. अशांच्या वाट्याला खडतर जगणे येते. चांगले शिक्षण घेऊन, आत्मसन्मानाने रोजीरोटी कमावण्याचा त्यांचा मार्गही खुंटतो. वेगवेगळ्या शेलक्या विशेषणांनी समाज त्यांची कुचेष्टा करतो. ही अवहेलना, उपहास सहन करीत तृतीयपंथीय जीवन जगत आहेत. त्यांचे मानवी हक्क रोज पायदळी तुडवले जातात. त्यांच्यावर अत्याचार होतात, त्यांना गुन्हेगारी जगतात ढकलले जाते; परंतु लैंगिकदृष्ट्या 'स्वाभाविक' असणाऱ्यांना त्यांच्याशी काही देणेघेणे नसते. (ही माहिती साभार गुगल)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract