PUBG
PUBG


मी,आर्यन,सारंग आणि सिद्धी चांगले मित्र होतो. आमच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या.आमचे सारे पेपर छान गेले होते.आम्ही आमच्या सट्टीत खुप मज्जा करायचे ठरवले होते.आम्हाला सगळ्यांना पब्जी गेम खेळायला खुप आवडायचे.परीक्षा असल्यामुळे आम्ही तो गेम खुप दिवस खेळलो नव्हतो.एका दिवशी आम्ही सगळे पुन्हा एकत्र भेटलो.आम्ही खुप गप्पा मारल्या.बोलता बोलता पब्जी गेमचा विषय निघला.आम्ही तो गेम पुन्हा खेळायचे ठरवले.आर्यनचे आई बाबा गावला गेले होते. त्यामुळे तो आणि त्याची ताई दोघेच आता घरात होते म्हणुन तो बोलला की "तुम्ही सगळे संध्याकाळी माझ्या घरी खेळण्यासाठी या."मग आम्ही सगळ्यांनी आर्यनच्या घरी पब्जी गेम खेळण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी 4.00 वाजता आर्यनच्या घरी पोहचलो.आम्ही आर्यनच्या खोलीत गेलो. तिथे त्याने आमच्या नाश्त्याची ही व्यवस्था केली होती.आम्ही सगळ्यांनी आपआपल्या फोन मध्ये पब्जी गेम चालू केला. मग आम्ही एकमेकांना गेममध्ये request पाठवली आणि आमची एक स्क्वॉड बनवली. मी गेम चालु केला.आम्ही चौघेही त्या गेमच्या लॉबी मध्ये जाऊन पोहचलो.आम्ही तिथे 'कुठे जायचे?' ह्यावर विचार केला.काही वेळा नंतर आमचे rozhok ला जायचे ठरले.आम्ही नंतर विमानात बसलो.
आम्ही सगळ्यांनी सिद्धीला follow केले होते. rozhok येताच आम्ही विमानातुन खाली उडी टाकली.आमच्या सोबत तिथे 4 स्क्वॉड आल्या होत्या.आम्ही rozhok मध्ये रोडच्या उजव्या बाजुला उतरलो.आम्ही ज्या घरात उतरलो, तिथेच बाजुला एका घरात दुसरी स्क्वॉड उतरली होती.आम्ही gun शोधु लागलो कारण ज्या स्क्वॉडला सगळ्यात आधी gun मिळेल ती स्क्वॉड लवकरात लवकर आपल्या विरुद्ध स्क्वॉडला संपवेल.आमच्या स्क्वॉड मध्ये सारंग आणि मला gun मिळाली आम्ही दोघांनी ही समोरच्या घरात जायचे ठरवले.आम्ही दोघे घरात गेलो तर त्यांची स्क्वॉड वरच्या मजल्यावर gun घेऊन तयार होती.आम्ही वरती गेलो. सारंग ने त्यांच्यातल्या दोघांना knock केले, एकला मी knock केले.उरलेला एकाने खिडकीतुन उडी मारली आणि फिरुन परत वरती आला. त्यांने आम्हा दोघांना ही knock केले. तेवढ्यात मागुन सिद्धी gun घेऊन आली आणि त्याला मारले. आता पुर्ण स्क्वॉड संपली होती.मग आर्यनही आमच्या घरात आला. त्या दोघांनी आम्हा दोघांना revive केले.
Knock झाल्या मुले आमची हेल्थ कमी झाली होती.आर्यनकडे 10 bandage होत्या.त्याने त्या आम्हाला दिल्या.आम्ही त्या bandage ने आमची थोडी हेल्थ वाढवली. रोडच्या त्या बाजुला अजुन एक स्क्वॉड होती. तिने तिथे उतरलेल्या एका स्क्वॉडला संपवले होते.आम्ही पुन्हा guns च्या गोळ्या,हेल्थ कीट,स्कोप,ड्रिंक शोधु लागलो.काही वेळा नंतर ती स्क्वॉड रस्त्याच्या ह्या बाजुला यायला निघाली.त्यातल्या एकाला आर्यनने येता येता knock केले आणि पुर्ण संपवले.परंतु आर्यन आमच्या पासुन 2 घर लांब होता. ती स्वॉड आर्यनच्या घरात घुसली.आम्ही लगेच मागुन आर्यनच्या घरा जवळ गेलो.आर्यनने त्या मधल्या एकाला knock केले मात्र उरलेल्या दोघांनी आर्यनला knock केले.तेवढ्यात आम्ही त्या घरात पोहचलो.सारंग आणि मी त्या दोघांना संपवले.आर्यनची हेल्थ खुप कमी झाली होती.सिद्धीने झटक्यात येउन त्याला हात लावला आणि त्याला revive केले.आम्ही त्यांच्या guns,हेल्थ कीट,ड्रिंक्स घेतल्या.
आम्हाला आता झोन मध्ये जायचे होते.आम्ही गाडी शोधु लागलो. पण आम्हाला गाडी सापडली नाही.मग आम्ही झोन च्या दिशेने चालु लागलो.जाता जाता रस्त्यात सारंगला गाडी सापडली.आम्ही झोनच्या दिशेने गेलो.झोन मध्ये आम्हाला farm च्या इथे drop दिसला.आर्यन बोलला आपण तिथे जाऊ आणि drop मधलं सामान घेऊ.मग सारंग ने गाडी drop च्या दिशेने वळवली.आम्ही drop जवळ पोह
चण्याआधीच तिथे एक स्क्वॉड होती. सारंगने त्याच्यातल्या एकाला गाडीने उडवले आणि knock केले.त्यांच्या गोळ्या ही आम्हाला लागत होत्या.गाडीतुन देखील धुर यायला लागला होता म्हणुन आम्ही तिथे एका घरा जवळ थांबलो.गाडीतुन उतरताना त्या स्क्वॉड मधल्या एकाने आर्यनला sniper ने गोळी मारली.आर्यन knock झाला आम्ही त्याला revive करायला जातच होतो,तेवढ्यात त्याने अजुन एक गोळी मारली. त्यामुळे आर्यनचा गेम संपला.आम्ही घरात जाऊन पहिल्यांदा हेल्थ वाढवली.
सारंगने knock केलेला प्लेयर आता revive झाला होता.आता 3vs 4 चा battle सुरु झाला होता. ते आमच्या जवळ येत होते.जवळ येता येता सिद्धीने एकाला knock केले आणि मी त्याला पुर्ण पणे मारले. मी त्यांच्या उजव्या बाजुने त्यांना मारण्याच्या प्रयत्न करत होतो.ते त्या घरा पर्यंत पोहचले.आत जाताच त्यांनी सारंगला knock केले.सिद्धी ने त्यांच्यातल्या दोघांना knock केले.उरलेल्या एकाला मी लांबुन sniper ने मारले. सिद्धी ने सारंगला revive केलं.आम्ही तिघांनी पुन्हा हेल्थ वाढवली.सिद्धी ने त्याच्यातल्या एकाकडे असलेली sniper घेतली.आता झोन military base ला झाला होता.त्या स्क्वॉडची गाडी घेऊन आम्ही तिथे जायला निघालो.आम्हाला तिथे पुलावरुन जायचे होते.आम्ही पुलावर गाडीने जात होतो तेवढ्यात आम्हाला गोळ्या लागु लागल्या.त्यामुळे सारंग knock झाला आणि गाडीतुन खाली पडला.त्यांनी सारंगला पुर्ण पणे मारले. सारंगही आता खेळातुन बाहेर गेला होता.आता आम्ही दोघेच उरलो होतो.मी गाडी बाजुला एका दगडा जवळ थांबवली.मग आम्ही आधी आमची हेल्थ वाढवली.तेवढ्यात त्यांच्यातला एक प्लेयर आमच्या जवळ आला.त्याला मी konck केले,मात्र लांबुन त्याच्या प्लेयर ने मला knock केला.मी दगडच्या मागे आलो.सिद्धीने त्या knock प्लेयरला पुर्ण पणे संपवले आणि मला revive दिला.
त्याच्या स्क्वॉड मधल्या एकाला सिद्धीने sniper ने पुर्ण पणे मारले.आता त्यातला एकच बाकी होता कारण त्यांच्या स्क्वॉड मध्ये कदाचीत तीनच प्लेयर होते. झोन आमच्या जवळ येऊ लागला.सिद्धी बोलली,"आपण झोन मध्ये जाऊया नाहीतर आपण देखील knock होऊ,तो एक प्लेयर झोन मुळे मरेल."मग आम्ही गाडी घेऊन military base ला गेलो.आता गेम मध्ये मात्र 6 प्लेयरच उरले होते म्हणजे 2 vs 4 चा battle आता सुरु होणार होता.काही वेळा नंतर अजुन एक प्लेयर गेम मधून कमी झाला.आता मात्र आमच्या समोर 3 प्लेयरच उरले होते.सारंग आणि आर्यन आमचा गेम पाहत होते.आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये होतो,त्या बिल्डिंग मध्ये एक प्लेयर आला.तो आमच्या खोलीत आला तेव्हा त्यांने सिद्धीची आणि माझी खुप हेल्थ कमी केली.मग मी त्याला मारले.
आम्ही हेल्थ वाढवत होतो.मी सिद्धी च्या बाजुच्या खोलीत आलो होतो.तेवढ्यात माझ्या खोलीत लागोपाठ 2 बॉम्ब आले.पहिल्या बॉम्ब मुळे मी knock झालो आणि दुसऱ्या बॉम्ब मुळे माझा गेम संपला.आता सिद्धी एकटीच बाकी होती.सिद्धीला ते प्लेयर दिसले.ते दोघेही आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्येच होते.सिद्धीने एक बॉम्ब त्याच्या खोलीत टाकला.एका प्लेयरने तो बॉम्ब फेकताना सिद्धीला पाहिले त्यामुळे त्याने खिडकीतुन खाली उडी मारली आणि त्याचा दुसरा प्लेयर वरती खोलीत knock झाला.त्याला उडी मारताना बघुन सिद्धीने ही खाली उडी मारली आणि त्याला गोळ्या मारल्या.मात्र तो वाचला त्याने लगेच भिंतीचा सहारा घेतला.झोनही आता छोटा होऊ लागला.त्याने जागो जागी स्मोक बॉम्ब टाकले होते.त्यामुळे सगळी कडे धुर झाला होता.सिद्धी ने पुन्हा तिथे बॉम्ब टाकला.बॉम्ब मुळे त्याची थोडी हेल्थ कमी झाली आणि तो दुसरी कडे पळु लागला.सिद्धी ला त्याच्या पायाचा आवज आला. धुरा मुळे तिला काहीच दिसत नव्हते तरी ही तिने अंदाजाने गोळ्या चालवल्या आणि तो प्लेयर मेला.अश्या रितीने आम्ही चिकन डिनर जिंकलो.