Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Shubhankar Malekar

Children Stories Inspirational


4.8  

Shubhankar Malekar

Children Stories Inspirational


त्याची पुन्हा एकदा नवी सुरुवात

त्याची पुन्हा एकदा नवी सुरुवात

4 mins 264 4 mins 264

    शुभांकर हा एका छोट्याश्या घरात आपल्या आई बाबांन सोबत राहायचा.त्याचे बाबा एका ऑफिस मध्ये कामाला होते.तो इयत्ता 8 वीत 'ज्ञानसागर विद्यालय' मध्ये शिकत होता.तो त्याच्या शाळेतला सगळ्यात हुशार आणि चपळ विद्यार्थी होता.दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही त्याच्या शाळेत धावण्याची स्पर्धा होणार होती.शुभांकरने ही स्पर्धेसाठी सराव सुरु केला होता.त्याचे आई बाबा ही त्याला खुप प्रोत्साहन द्यायचे.

 

        दररोज सकाळी उठुन तो त्याच्या शेजारच्या दादा सोबत सराव करण्यासाठी जायचा.एकादा सराव करता करता शुभांकरचा पाय एका खड्ड्यात अडकला आणि तो खाली पडला.त्याच्या पायाला खुप इजा झाली होती.त्याला चालता सुद्धा येत नव्हते.त्याच्या सोबत आलेल्या दादाने त्याला डॉक्टरांकडे नेले. तिथे गेल्यावर त्याने शुभांकरच्या आई बाबांना फोन केला.त्याचे आई बाबा ताबडतोब तिथे आले.डॉक्टर शुभांकरला तपासत होते.काही वेळाने डॉक्टर बाहेर आले.

शुभांकरची आई-डॉक्टर काय झालं माझ्या मुलाला?आता कसा आहे तो?

डॉक्टर-"त्याच्या पायाला आतुन खुप जखम झाली आहे.त्यामुळे त्याच्या पायाला प्लास्टर करवा लागेल."

शुभांकरचे बाबा-"तो ठिक तर होईल ना?"

डॉक्टर-"हो,मी दिलेल्या गोळ्या त्याला वेळेवर द्या आणि तुम्ही 10 दिवसांनी पुन्हा तुमच्या मुलाला चेकअप साठी घेऊन या.मग बघुया पुढे काय करायच ते."

(काही वेळाने त्याचे आई बाबा त्याला घरी घेऊन गेले.)


           घरी आल्यावर शुभांकर खुप चिंतेत होता.काही वेळाने त्याचे शेजारी त्याची विचारपुस करण्यासाठी आले.त्यांनी शुभांकरच्या तब्बेतीची विचारपुस केली. त्यांच्यातल्या एका काकुने असे सांगितले की,"माझ्या भावाच्या मुलाच्या पायाला देखील प्लास्टर केले होते.त्याला 10 दिवसांनी बोलावले आणि त्याला तपासले आणि पुन्हा त्याच्या पायाला प्लास्टर केले."हे ऐकुन शुभांकर खुप घाबरला होता,कारण स्पर्धेला मात्र एक महिनाच बाकी होता आणि त्याला त्या स्पर्धेत भाग घ्यायचाच होता.

        (शेजारी गेल्यानंतर तो अक्षरशः रडायला लागला.)


आई-"शुभांकर काय झालं?रडतोयस का?"

शुभांकर-"आई 10 दिवसांनी मला देखील चेकअप साठी बोलावलय.माझ्या पायाला पण पुन्हा प्लास्टर करतील का?मी पुन्हा कधीच शर्यतीत भाग घेऊ शकणार नाही का?मला खुप मोठा व्हायचं आहे.मला आपल्या देशासाठी अनेक बक्षिस जिंकायची आहेत."

(त्याच्या आईने त्याचा हात आपल्या हातात घेतला.)

आई-"घाबरु नकोस,मला खात्री आहे,तु ठिक होशीलच.तुला देशासाठी अनेक बक्षिस जिंकायची आहेत ना!जर तु इथेच हार मानली तर कसं बरं चालले.एक वेळ तु हरलास तरी चालेल,पण प्रयत्न करत रहा.तुझ्या पाठीशी मी नेहमी उभी असेन.जर तु बरा झालास आणि डॉक्टरांनी जर अनुमती दिली,तर तुला स्पर्धेत भाग घेण्यापासुन कोणीही थांबवणार नाही."

शुभांकर-"आई मी तुला वचन देतो,मी कधीही मागे हटणार नाही आणि नेहमी प्रयत्न करत राहील."

आई-"शाब्बास!"

    

        बोलता बोलता 9 दिवस निघुन गेले.ह्या वेळेत शुभांकरला सराव करता नाही आला मात्र त्याला त्याच्या आईने काही पुस्तक घेऊन दिली.तो ह्या दिवसात अभ्यासा सोबत पुस्तक देखील वाचायचा.पुढच्या दिवशी तो त्याच्या बाबांसोबत डॉक्टरांकडे गेला.डॉक्टरांनी त्याला तपासले.

डॉक्टर-"आता तुमच्या मुलाचा पाय ठिक आहे,पण ह्याला काही दिवस आरामाची गरज आहे.पुन्हा प्लास्टर लावायची गरज नाही.काही गोळ्या लिहुन देतो त्या त्याला वेळेवर द्या."


शुभांकर-"डॉक्टर माझ्या शाळेत दरवर्षी धावण्याची स्पर्धा असते.मी नेहमी त्याच्यात भाग घेतो.ह्या वर्षी ही मी भाग घेणार होतो,पण माझ्या पायाला दुखापत झाली.आता तुम्ही म्हणाल्या प्रमाणे माझा पाय ठिक झाला असेल तर मी त्या स्पर्धेत भाग घेऊ शकतो का?"

डॉक्टर-"तुझा पाय ठिक आहे,मात्र पुर्णपणे ठिक होण्यास थोडा वेळ लागेल.तू काही दिवस आराम कर आणि जर तुला जमत असेल तर तु त्या स्पर्धेत भाग घे.त्या पायावर जास्त जोर नको देऊ.शक्यतो तु त्या स्पर्धेत भाग घ्यायला नाही पाहिजे,पण तुझी इतकीच इच्छा असेल तर तु भाग घे;मात्र जर तुला जमत असेल तरच.जबरदस्तीने कोणतेही काम नको करु."

शुभांकर-"ठिक आहे डॉक्टर."


        शुभांकरने सगळे काही आपल्या आईला संगितले.आईनेही त्याला तोच सल्ला दिला.पण शुभांकरला स्पर्धेत भाग घायचाच होता.तो एकदा बाहेर चालत होता.तेव्हा त्याचा शाळेतला मित्र त्याच्या जवळ आला.


मित्र-"शुभांकर काय मग ह्या वर्षी ही तु स्पर्धेत भाग घेतोयस अस ऐकलं."

शुभांकर-"हो,मात्र नक्की नाही."

मित्र-"मला असा वाटतय की,तु ह्या वेळी भाग नाही घेतला पाहिजे.आज एक पाय तुटला आहे,उद्या दुसराही तुटू शकतो.(तो हसु लागला)ह्या वर्षी मात्र मीच जिंकणार."

शुभांकर-"मला आनंदच होईल तु जिंकलास तर मात्र मेहनत करुन.दरवर्षी तु जिंकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खुप काय करतोस."

मित्र-"तुला माहीत आहे ना मी काय काय करु शकतो,मग ह्या वर्षी स्पर्धेपासुन लांब राहायचं."(असा बोलुन तो तिथुन निघुन गेला.)


        शुभांकर थोडा घाबरला होता कारण त्याच्या पायाला आधीच दुखापत झाली होती.त्याचा मित्र जिंकण्यासाठी काहीही करु शकतो हे त्याला माहीत होते.त्याने त्याच्या आईला वचन दिले होते की, तो नेहमी प्रयत्न करत राहील.त्यांने काही दिवस आराम केला.त्याला काही दिवसा नंतर ठिक वाटु लागले.त्यांने आईला संगितले की तो स्पर्धेत भाग घेणार. ह्या सगळ्यात त्याने अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही.आईने त्याला परवानगी दिली.त्यांने पुन्हा त्याचा सराव सुरु केला.


         बोलता बोलता अखेर तो दिवस आलाच.अखेर शुभांकर स्पर्धेत उतरला.गेट-सेट-गो म्हणताच स्पर्धेला सुरुवात झाली.शुभांकरचे आई बाबा देखील स्पर्धेला उपस्थित होते.शुभांकर सगळ्यात पुढे धावत होता आणि त्याचा तो मित्रा त्याच्या मागे होता.त्यांने पुढे येउन शुभांकरला अचानक धक्का दिला. शुभांकर खाली पडला. सगळी मुल त्याच्या पुढे निघुन गेली.त्याच्या मनात एकच विचार घुमत होता आता मी हरलो,मात्र त्यांने त्याच्या आईने सांगितलेले शब्द आठवले आणि तो पुन्हा उठला आणि त्यांने पुन्हा धावण्यास सुरुवात केली.त्यांने त्याच्या आईच्या बोलण्याप्रमाणे प्रयत्न सुरुच ठेवला. बोलता बोलता तो सगळ्यांच्या पुढे निघुन गेला.तरीही त्याचा तो मित्र त्याच्या पुढेच होता.त्याला पुन्हा बघुन तो चक्कच झाला.अखेर ते शेवटच्या टप्प्यात येउन पोहचले.शुभांकरच्या मित्राने ती लाईन क्रॉस केली आणि शुभांकरचा मित्र जिंकला.


      शुभांकर मात्र स्वतःसोबतच्या स्पर्धेत जिंकला होता.तो स्पर्धेत जरी हरला असला तरी त्याने प्रयत्न करणे सोडले नाही.मित्रांनो,आयुष्य ही एक स्पर्धाच आहे ह्यातही काही लोक आपल्याला हरवण्यासाठी तत्परच असतात,म्हणुन आपण कधीही माघार नाही घेतली पाहिजे.आपण नेहमी आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले पाहिजे.


Rate this content
Log in