Shubhankar Malekar

Children Stories Inspirational Children

3.8  

Shubhankar Malekar

Children Stories Inspirational Children

माझे पहीले गुरु माझे बाबा...

माझे पहीले गुरु माझे बाबा...

2 mins
151


"बाबा,सायकल सोडु नका हा.घट्ट पकडा."

"हा बाबु चालव तु मी नाही सोडणार."

"बाबा प्लीज सोडु नका हा."

"हा बाबु तु समोर लक्ष दे."

     मी हळुहळु सायकल चालवत होतो. बाबांनी सायकलीला मागुन पकडलं होतं. काही वेळाने मी सायकल वेगाने चालवायला सुरुवात केली.

"बाबा,तुम्ही पकडली आहे ना सायकल?"

"हो तु समोर बघ आणि चालव."

"हा....."

 

          काही वेळाने मी मागे वळुन पाहीलं तर बाबांनी सायकल सोडली होती. बाबा मागे उभे राहुन मला बघत होते. मी अचानक पुढे बघीतलं.मी गोंधळलो आणि मी बाजुच्या भिंतीला जाऊन धडकलो. बाबा धावत माझ्या जवळ आले.

"बाबा,तुम्ही मला का सोडलं?तुम्ही सोडलं नसतं तर मी पडलोच नसतो."

"अरे,जर मी तुला सोडलं नसतं तर तुला सायकल चालवता आली नसती.तु मागे का बघीतलं?मागे बघीतलं म्हणुन तु पडलास."

"बाबा,मला खुप लागलंय.मी आता कधीच सायकल चालवणार नाही."

"बाबु,असं काय करतोस.पडल्या शिवाय कोणीही सायकल चालवायला शिकत नाही.मी सोडलं तेव्हा तु किती छान सायकल चालवली आणि जेव्हा तुझ्या लक्षात आलं की मी सायकल सोडली तेव्हा तु गोंधळलास आणि सायकल ठोकलीस.चल उठ,आता मी नाही सोडणार आणि पुन्हा मागे वळुन बघु नकोस."

"हा ठिक आहे."

   

       मी सायकल घेऊन उठलो आणि परत सायकल चालवायला सुरुवात केली. बाबांनी मला मागुन पकडलं होतं. हळूहळू मी वेग धरला. बाबा माझ्या मागे धावत होते. मी थोडं पुढे गेलो आणि मागे वळुन बघीतलं तर बाबा फक्त मागे धावत होते, त्यांनी सायकल सोडली होती. शेवटी मी सायकल चालवायला शिकलो. त्यानंतर बाबांनी माझा खुप कौतुक केलं.

"बाबा, मी सायकल चालवायला शिकलो,पण तुम्ही मला काही वेळा नंतर सोडुन का देत होतात?"

"जर मी तुला सोडलं नसतं,तर तु शिकलाच नसता."

"आणि जर मी परत पडलो असतो तर......."

"मी होतो ना मागेच.तुला मी पडुच नसतं दिलं."

"तुम्ही असेच नेहमी माझ्या सोबत असाल ना?"

"तु प्रयत्न करत रहा,तु आयुष्यात कुठेही धडपडलास तर तुझा बाबा तुला सावरण्यासाठी नेहमी पुढे येइल."

"थैंक यू बाबा."

         मी बाबांना एक घट्ट मिठी मारली आणि पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली.


Rate this content
Log in