Shubhankar Malekar

Action Inspirational

4.8  

Shubhankar Malekar

Action Inspirational

खरा नायक...

खरा नायक...

5 mins
224


    राजेश हा अग्नीशमन दलातला खुप धाडसी वृत्तीचा व्यक्ती असतो.तो त्याच्या बायको आणि दोन मुलांसोबत 'राजहंस' नावाच्या बिल्डिंग मध्ये राहात असतो.त्याचे त्याच्या देशावर फार प्रेम असते.तो कोणत्या ना कोणत्या कारणाने देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो.त्याने त्याच्या मुलांनाही हिच शिकवण दिलेली असते,मात्र त्याची बायको खुप भावुक असते.तिचे देशावर प्रेम तर असते मात्र तिला देशासाठी आपल्या कुटुंबाला संकटात घालणे मान्य नसते.ती राजेशला नेहमीच सावध राहुन काम करायला सांगायची.मात्र एके दिवशी असे झाले की...................


"सुजाता डब्बा झाला का? मला कामाला जायला उशीर होतोय....."


"हो...हो... झाला,आलेच मी."


"श्रेयस,पियुश शाळेत जायची तयारी झाली का तुमची?"


"हो बाबा,आमची तयारी झाली आहे.आईने डब्बा दिला की आम्ही निघतो आणि बस येइलच आता."


"सुजाता...."


"आले...(सुजाता किचन मधुन बाहेर येते) हे घ्या तुमचा डब्बा आणि पोरांनो हा घ्या तुमचा डब्बा."


"ठिक आहे.चल मी येतो..."


(असे बोलुन राजेश घरातुन निघतो)


         राजेश त्याच्या ऑफ़िस मध्ये एका उच्च पदवर काम करत असतो.त्याच्या कामावर सोहम नावाचा त्याचा एक खास मित्र असतो.


"राजेश आलास..."


"हो..."


"राजेश,अरे रवी तुला कधी पासुन फोन करतोय तु उचलत का नाही त्याचा फोन?मला आत्ताच त्याचा फोन आलेला."(रवी हा राजेशचा भाऊ असतो.)


"मला फोन केलेला?...थांब मी फोन बघतो..."


.


.


.


"अरे फोन silent ला होता.बरं झाला तु सांगितलसं.मी करतो त्याला फोन."


(तेवढयात रवी तिथे येतो.)


"थांब फोन नको करु. तिकडे बघ..."


"रवी........"


"काय दादा,इतके फोन केले तुला तु एक ही फोन उचलला नाहीस."


"अरे फोन silent ला होता.ये बस किती दिवसांनी आला आहेस.हे घे पाणी पी... आणि बाकी कसा आहेस तु? वहिनी कश्या आहेत? नेहा कशी आहे?"


"हो हो दादा सगळं सांगतो...मला पाणी तर पिऊ दे...सगळे ठिक आहेत.नेहा आणि सुषमा तुझ्याच घरी गेलेत.मी ही तिथुनच आलो आहे."


"तू घरी गेलेलास?"


"हो तु तिथे भेटला नाहीस म्हणुन मी इथे आलो."


"मग बाकी कधी आलास तु तुझ्या मिशन वरुन?"


"दोन दिवस अगोदरच आलो मी..."


"कशी झाली मिशन..."


"कशी होणार दादा! दर वेळी प्रमाणे ह्या वेळी ही आम्ही सगळ्यांनी मिळुन त्या अतिरेक्यांना धुळ चारली."


"वा...मला वाटलेलच...आपली आर्मी कधीच हरु शकत नाही."


(बोलता बोलता राजेश अचानक शांत होतो.)


"दादा...अरे दादा..."


(दचकुन)"हा..."


"अरे काय झाले तु कसल्या विचारत पडलास..."


"काही नाही.तुला माहीत आहे ना मला देखील आर्मी मध्ये सहभागी व्हायचे होते मात्र काही कारणाने मला सहभागी होता आले नाही.मला ही माझ्या देशासाठी खुप काही करायचे होते.मला ही शरीरावर वर्दी घालुन देशाचे संरक्षण करायचे होते.आपल्या देशातल्या लोकांची मदत करायची होती.आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या लोकांना योग्य ती शिक्षा द्यायची होती, पण......."


"अरे दादा,विसर ते सगळे आता,तु आता देखील देशाच्याच कामाला येतोयस.तु स्वत:ला कमी समजु नकोस."


(तेवढयात सोहम तिथे धावत येतो.)


"राजेश,अरे त्या 'गुरुकृपा' बिल्डिंग मध्ये आग लागली आहे तु चल लवकर..."


"ही 'गुरुकृपा' म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या बाजुचीच बिल्डिंग.चल लवकर आपल्याला निघायला हवं..."


     राजेश त्याच्या टीम सोबत तिथे पोहचतो.तिथे स्थिती खुप गंभीर झालेली असते.राजेश आणि त्याची टीम आग विजवण्याचा पुर्ण प्रयत्न करतात,त्या बिल्डिंग मध्ये अनेक लोकही अडकलेले असतात.राजेश सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो.त्याचं बिल्डिंग मधे सुजाता आणि सुषमा अडकलेला असतो.राजेश त्यांना आणि इतर सगळ्याना सुखरुप बाहेर काढतो.


"सुजाता आणि वहिनी तुम्ही ठिक आहात ना?तुम्ही इथे कश्या?"


"अहो आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी आलो होतो."


"ठिक आहे.तुम्ही बाजुला उभे रहा.सोहम सगळे सुखरुप बिल्डिंगच्या बाहेर आले ना?"


"हो..."


(तेवढयात एक बाई येउन रडत रडत राजेशच्या हाता-पाया पडु लागते...)


"अहो ताई,काय झाले?"


"दादा,माझा मुलगा,माझ्या मुलाला वाचवा दादा..."


"तुम्ही आधी उठा.कुठे आहे तुमचा मुलगा?कितव्या मजल्यावर?"


"तिसऱ्या मजल्यावर.दादा,मी हात जोडते माझ्या मुलाला वाचवा..."


"सोहम,सीडी आण."


"राजेश,पण त्या मजल्या वर आग खुप भयंकर लागली आहे.तिथे जाणे खुप जोखिमचे आहे."


"अहो...तुम्ही नका जाऊ.तुम्ही तिथे तुमच्या कोणत्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवा..."


"अगं पण...."


    त्या बाईच्या डोळ्यातले अश्रु राजेशला पाहावत नाहीत.तो सोहमला सीडी आणायला सांगतो आणि कोणाचेही न ऐकता तो सीडीवर चढतो.सुजाता फार घाबरते.रवीची बायको तिला खुप समजावते.राजेश त्या घराच्या बाल्कनीत येउन पोहचतो आणि कोणाचाही विचार न करता तो दरवाजा तोडुन आत शिरतो.घरात जिथे तिथे आग लागलेली असते.राजेश जसा जसा पुढे जात होता तशी तशी आग त्याच्या दिशेने येत होती.राजेशला त्या धुरात काहीच दिसत नव्हते.तो हळु हळु पुढे सरकु लागतो.तेव्हा त्या मुलाच्या रडण्याचा आवज त्याच्या कानी पडतो.तो आवज बेडरूम मधुन येत असतो.राजेश त्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागतो.त्या दरवाजाला पुर्ण पणे आग लागलेली असते.राजेश त्या दरवाजावर लाथ मारतो आणि दरवाजा तोडतो.राजेशला तो मुलगा दिसतो.तो खुप घाबरुन गेला असतो.तो खुप रडत असतो.त्या दरवाजा मुळे राजेशचा आत जाण्याचा मार्ग बंद झाला असतो.मात्र राजेश त्याची युक्ती चालवुन जोरात तिथे आत उडी मारतो.तो त्या मुलाला उचलुन घेतो आणि त्या बेडरूमच्या बाल्कनीच्या दिशेने जातो...


           बाहेर सुजाता रडत असते.रवी आणि त्याची बायको तिला सावरत असतात.सोहम त्याच्या टीम सोबत आग विजवण्याचा प्रयत्न करत असतो.तेवढ्यात सोहमला त्या बाल्कनीत राजेश दिसतो.राजेशला बघुन सगळे खुप खुश होतात.सोहम योग्य ती साहित्य वापरून त्या मुलाला सुखरुप बाहेर काढतो,मात्र राजेश जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या घरात मोठा ब्लास्ट होतो.त्या आगीचा धुर आणि प्रकाश इतका होतो की तिथे काही वेळासाठी काही दिसेनासे होते.सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.तेवढ्यात सुजाताला त्या धुरातुन राजेश येताना दिसतो.सुजाता त्याला जाऊन घट्ट मिठी मारते.राजेशला सुखरुप बघुन सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो...


"अहो,तुम्ही ठिक आहात ना?..."


"हो दादा,तु ठिक आहेस ना?तुला कुठे लागले तर नाही ना."


"नाही मी ठिक आहे,फक्त हाताला थोडे लागले आहे.सोहम तो मुलगा ठिक आहे ना?"


"हो,तो ठिक आहे,मात्र सर हळु हळु स्थिती आपल्या हाता बाहेर जात आहे.आपल्याला काही तरी केले पाहिजे."


"हो,तु हेड ऑफ़िसला कॉल कर.आपल्याला अजुन फोर्सची गरज आहे.सुजाता,रवी,वहिनी तुम्ही बाहेर जा.इथे थांबणे धोकादायक आहे."


"हो दादा.वहिनी चला..."


         काही वेळाने फोर्स तिथे येते आणि सगळी स्थिती आटोक्यात येते.राजेश बाहेर येउन सगळ्यांना ह्या सगळ्याची माहिती देतो.तेवढयात ती बाई तिथे येते आणि राजेशच्या पाया पडते


"दादा,खुप खुप आभार तुमचे.तुमच्या मुळे माझा मुलगा आज सुखरुप आहे.आज तुम्ही नसतात तर काय झाले असते ह्याचा विचारही मी करु शकत नाही...."


"ताई,माझ्या पाया नका पडु.देवाच्या पाया पडा.आज त्याच्या मुळेच तुमचा मुलगा वाचला आहे."


     इतके बोलुन तो त्याच्या कुटुंबाकडे येतो.


"तुम्ही सगळे ठिक आहात ना?"


(सुजाता त्याला रडत रडत मिठी मारते.)

"अहो,आज तुम्हाला काही झाले असते तर मी आणि आपल्या मुलांनी काय केले असते!.....मात्र मला ह्या गोष्टीचा ही अभिमान आहे की आज तुमच्या मुळे अनेक लोकांचा जीव वाचला."

"हो दादा.मी तुला बोललेलो ना,तु ही देशाची मदतच करतोयस.तु देशाच्या नागरिकांना मोठ मोठ्या संकटातुन वाचवतोस.तु ही खऱ्या अर्थाने देशाच्या कामात येतोयस."

       राजेश रवीला मिठी मारतो.राजेशच्या चेहऱ्या वर एक वेगळाच आनंद होता.राजेशच्या ह्या शूरवीरतेची बातमी हळु हळु प्रसार माध्यमातुन सर्वत्र पसरली.सगळी कडे राजेशची वाह...वाह... होते.राजेशच्या ह्या शूरवीरतेचे राजेशला अनेक पुरस्कारही मिळातात.


      तर मित्रांनो प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या देशाच्या कामात येतच असतो.प्रत्येक जण आपले देशप्रेम कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त करत असतो.देशातला प्रत्येक नागरीक वेळ प्रसंगी आपल्या देशाला वाचवण्यासाठी स्वत: एक योद्धाही बनु शकतो.त्या मुळे देशातला प्रत्येक व्यक्ती हा 'खरा नायक' असतो.


||भारत माता की जय||


Rate this content
Log in

Similar marathi story from Action