Shubhankar Malekar

Children Stories Classics Children

4.8  

Shubhankar Malekar

Children Stories Classics Children

2021 चा प्रवास

2021 चा प्रवास

4 mins
99


      नमस्कार,मी शुभांकर मळेकर.माझा 2021 चा प्रवास सुरु झाला तो खंडोबाच्या दर्शनाने.मी आणि माझ्या परिवारा सोबत जानेवारीच्या सुरुवातीलाच जेजुरीला गेलो होतो.जेजुरीला जाऊन आम्ही खंडेराया आणि म्हाळसा देवीच दर्शन घेतलं आणि जगावर आलेलं संकट लवकरच दुर व्हावे अशी प्राथना देखील केली.आम्ही पहिल्यांदाच जेजुरीला गेलेलो.सोन्याची जेजुरी आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली.खुप छान वाटले जेजुरीला जाऊन.त्या नंतर माझ्या बारावीच्या परीक्षेची तयारी सुरु झाली.ह्या दिवसात अनेक अफवा पसरल्या.कोण म्हणत होतं की,परीक्षा ऑफ़लाईन होणार,कोण म्हणत होतं की,परीक्षा ऑनलाइन होणार तर कोण म्हणत होतं की परीक्षा रद्द होणार.ह्या मध्ये मी खुप गोंधळून गेलो होतो.मला अभ्यास करावा की करु नये हेच समजत नव्हते.

           शेवटी काही दिवसांनी बातमी आली की,बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली.हे ऐकुन मी खुश झालो होतो.खुश ह्या साठी की परीक्षा रद्द झाली,म्हणजे अभ्यासाच टेंशन नाही.त्या नंतर मला स्टोरीमिरर ह्या एप वरती 'ऑथर ऑफ़ द वीक' च नामांकन मिळालं.शेवटी मी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्याचा 'ऑथर ऑफ़ द वीक' ठरलो.मी तेव्हा खुप खुश झालो.काही दिवसांनी होळी आली.कोरोनाचे सगळे नियम पालन करुन आम्ही साध्या रितेने होळी साजरी केली.त्या नंतर स्टोरीमिरर वर चालु असलेल्या कॉलेज राइटिंग स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.मी माझे शंभर टक्के देऊन माझी कथा आणि माझे कोट्स दुसऱ्या फेरीसाठी सादर केले.आता ओढ लागलेली ती निकालाची.

           त्या नंतर काही दिवसांनी आम्हाला कॉलेज मध्ये काही कामासाठी बोलावले होते.खुप दिवसांनी मी माझ्या कॉलेजला गेलो होतो.अकरावीच्या वर्षातल्या अनेक आठवणी कॉलेजशी जोडल्या गेल्या होत्या.कॉलेजला जाऊन त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.कॉलेजला जाऊन खुप आनंद झाला.काही दिवसांनी मी आणि माझे बाबा गणपतीची छान आणि सुंदर अशी मुर्ती बुक केली आणि बाप्पाला आमच्या घरी येण्याचे आमंत्रण दिलं.त्या नंतर मी एका नवीन दुनियेत प्रवेश केला.तिथे अनेक काही शिकलो आणि अजुनही शिकत आहे.तिथे अनेक जिवाभावाची नाती देखील जोडली गेली.ती दुनिया कोणती हे मात्र मी तुम्हाला सांगु शकत नाही.

           शेवटी तो दिवस आलाच ज्याची मी खुप आतुरतेने वाट पाहत होतो.तो दिवस म्हणजे स्पर्धेच्या निकालाचा.स्टोरीमिररच्या कॉलेज राइटिंग स्पर्धेचा निकाल शेवटी लागलाच.मी कोट्स ह्या प्रकारात पहिला आणि कथा ह्या प्रकारातुन तिसरा क्रमांक मिळवला.मी हे पाहुन खुप खुश झालो होतो आणि माझ्या घरातले देखील हे ऐकुन खुश झाले होते.त्या नंतर माझा बारावीचा निकाल लागला.मी 92% मिळवुन बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो.त्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.काही दिवसांनी गणपती बाप्पाची येण्याची तयारी सुरु झाली.घराचे रंगकाम करण्यात आले.घराची साफ सफाई झाली.आम्ही बाप्पासाठी छान अशे डेकोरेशन देखील केले होते.काही दिवसांनी बाप्पाचे आगमन मोठ्या थाटा माटात आमच्या घरी झाले.कोरोनामुळे अनेक नातेवाईक ह्या सोहळ्याला अनुपस्थित होते.मात्र बाप्पा घरात आल्या मुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.पाच दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा पुन्हा त्यांच्या घरी जायला निघाले.आम्हाला तेव्हा फार वाईट वाटत होतं.बाप्पा घरातुन गेल्या नंतर घर खाली खाली वाटत होतं.

         त्या नंतर नवरात्र उत्सव सुरु झाले.आमच्या येथे एका मंडळात सार्वजनिक नवरात्र उसव साजरा केला जातो.मात्र ह्या कोरोनाच्या काळात शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करुन आम्ही नवरात्री उत्सव साजरा केला.नंतर काही दिवसांनी दिवाळी आली.दिवाळीला ही घरात खुप आनंदाचे वातावरण होते.दिवाळीत आम्ही सगळ्यांनी नवीन कपडे घेतले.अनेक गोष्टींची खरेदी केली.फराळ बनवला.अभ्यंगस्नानाच्या दिवशी मी सकाळी लवकर उठुन सुगंधी उठण लाऊन अंघोळ केली आणि उंबरठ्यात येउन पायाने कारटं फोडलं.त्या नंतर मी आणि माझ्या मित्रांनी फटाके फोडले.दुसऱ्या दिवशी आम्ही मिळुन घरात लक्ष्मी पूजन केलं.त्या नंतर पुढच्या दिवशी भाऊबीज साजरी केली.सगळी कडे खुप आनंदाच आणि उत्साहाच वातावरण निर्माण झालं होतं.सगळी दुनिया प्रकाशमय झाली होती.तुळशीच लग्न झाल्या नंतर दिवाळी संपली.त्या नंतर पुन्हा पुर्वी सारखं जीवन सुरु झालं.

          त्या नंतर माझ्या गावाला राहणाऱ्या बहिणीच्या लग्नासाठी गावाला जायचा योग जळुन आला.कोरोना मुळे दोन वर्ष गावाला जायची संधी मिळाली नव्हती मात्र लग्नामुळे खुप दिवसानंतर मी पुन्हा गावाला गेलो.मी माझ्या भावंडांसोबत मिळुन गावात खुप मज्जा केली.बहिणीच्या लग्नात देखील आम्ही खुप मज्जा केली.अनेक दिवसानंतर परिवारातले सगळे एकत्र भेटले होते.हे पाहुन खुप बरं वाटलं.काही दिवस गावात राहताच आम्ही घरी यायला निघालो.घरी आल्यावर काही दिवसातच मला स्टोरीमिररच्या कॉलेज राइटिंग स्पर्धेच्या ट्रॉफ्या मिळाल्या.ते पाहुन मी खुप खुश झालो.काही दिवसानंतर माझी ऑनलाईन परीक्षा सुरु झाली.बोलता बोलता ती परीक्षा देखील संपली.

      शेवटी मी वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आलाच.तो दिवस म्हणजे माझा वाढदिवस. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खुप चांगला दिवस असतो. प्रत्येक जण ह्या दिवसाची वाट वर्षभर पाहत असतो.माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खुप सारे गिफ्ट मिळले.वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र मंडळी घरी केक घेऊन आले होते.त्या दिवशी खुप मज्जा आली.आई बाबांनी मला खुप मोठे गिफ्ट दिले.कदाचित ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात मौल्यवान गिफ्ट असावं.बोलता बोलता शेवटी मी वर्षाच्या शेवटी येउन पोहचलो.शासनाने पार्टी करण्यावर बंदी घातल्यामुळे मी घरातच राहुन नवीन वर्षाचे स्वागत केले.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या.



Rate this content
Log in