Shubhankar Malekar

Crime Thriller

4.9  

Shubhankar Malekar

Crime Thriller

भीतीदायक स्वप्न.

भीतीदायक स्वप्न.

4 mins
471


    रोशन एका छोट्या शहरात राहायचा.त्याचे बाबा एका चांगल्या ऑफिस मध्ये नोकरी करायचे.त्यांने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.त्याला आता उन्हाळ्याच्या सूट्टया लागल्या होत्या.एकदा तो मैदानात खेळायला गेला होता.त्याचे सगळे मित्र त्याच्या सोबत होते.ते सगळे खुप खेळले.घरी जाताना त्याला खुप भयानक असे दृश्य दिसले.तो त्या वेळी खुप घाबरला.तो घरी गेला आणि त्याच्या रुम मध्ये जाऊन एका जागी शांत बसला.तो कसला तरी विचार करत होता.काही वेळाने त्याची आई त्याच्या खोलीत आली.

"रोशन,चल मी गरमा गरम नाश्ता केला आहे.खाऊन घे चल."

(रोशनचे लक्ष वेगळ्या गोष्टी कडे होते.)

"रोशन,अरे काय झालं?"

(रोशन दचकला.त्याला खुप घाम आला होता.)

"काही नाही."

"तुझं लक्ष कुठे आहे.तुझी तब्बेत तर ठिक आहे ना?"

"हो आई,ठिक आहे मी.काय म्हणत होतीस तु?"

"अरे गरमा गरम नाश्ता केला आहे तुझ्यासाठी चल लवकर खाऊन घे."

"हा आई आलोच फ्रेश होऊन."


      रोशनने जे बघितले ते त्याच्या मनातुन काही केल्या जात नव्हते.रोशन नेहमी कसला तरी विचार करत बसायचा.त्याचं दुसरी कडे कुठे लक्षच लागत नव्हते.रात्र झाली,नेहमी प्रमाणे तो आपल्या रुम मध्ये झोपी गेला.सगळी कडे शांतता होती फक्त घड्याळाचा आवाज येत होता.तो रात्री अचानक दचकुन उठला.तो मोठ मोठ्याने श्वास घेऊ लागला.त्याला खुप भयानक स्वप्न पडले होते.त्या नंतर पुन्हा त्याने झोपण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याला झोप लागतच नव्हती.काही वेळाने सकाळ झाली.आई त्याचा दरवाजा वाजवु लागली.

(घाबरुन) "कोण आहे?"

"अरे मी तुझी आई आहे.दरवाजा उघड आणि उठ वाजले बघ किती!"

(रोशनने हळुच जाऊन दरवाजाची कडी उघडली.)

"रोशन काय झालं?तू इतका घाबरला का आहे?"

"आई......आई....." (घाबरुन)

"काय झालं नीट सांग मला.हे बघ घाबरु नकोस.मी आहे ना तुझ्या सोबत.बोल बाळ काय झालं."

"आई मला एक खुप भयानक असे स्वप्न पडले."

"कोणते स्वप्न."

(घाबरुन)"आई मी स्वप्नात बघितले की,माझ्या वर्गातला राज आहे ना,त्याला कोणी तरी एका गाडी खाली ढकलला आणि तो मेला.त्याचे रक्त सगळी कडे पसरले होते.त्याचे हात पाय वेगळे झाले होते."

(त्यांने आईला एक घट्ट मिठी मारली.)

"रोशन बाळ ते स्वप्न होते.राज अजुन जिवंत आहे. तू त्याला फोन लावुन बघ.घाबरु नकोस काही नाही झालं.ते फक्त एक स्वप्न होते."


     रोशनने जवळचा फोन घेतला आणि राजला फोन लावला.राजशी तो बोलला त्याला बरं वाटलं.तो खुप घाबरला होता.आई ने त्याला खुप समजावले.मात्र त्याच्या मनात काही प्रमाणात भिती होतीच.काही वेळाने ही सगळी हकीकत त्याने त्याच्या बाबांना सांगितली.

"रोशन,अरे ते एक स्वप्न होत.त्याचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नाही.तु जास्त विचार करु नको ह्या बद्दल.तु शहाणा मुलगा आहेस ना!मग तू ह्या छोट्या गोष्टीला घाबरलास."

"हो बाबा मी शहाणा आहे.मी नाही घाबरणार."


"गुड बॉय."


      हा दिवसही निघुन गेला.रात्री पुन्हा त्याला तसेच स्वप्न पडले.स्वप्नात त्याने एका माणसाचा दुर्दैवी मृत्यु बघितला.तो आता खुप घाबरल होता.पुन्हा त्याने सगळी हकीकत त्याच्या आई बाबांना सांगितली.आई बाबांनी त्याला खुप समजावले.कस बस तो सावरला.पुन्हा पुढच्या दिवशी तो त्याच्या आई बाबां सोबत झोपायला गेला.तेव्हा ही कोणाचा तरी खुण होतोय असे स्वप्न पाहिले.त्याचे आई बाबाही आता घाबरले होते.रोशनच्या बाबांनी ही हकीकत त्यांच्या भावाला सांगितली.ते बोलले की"ही त्याची एक कल्पना आहे.त्याने पिक्चर मध्ये तसं काही पाहीलं असेल.काळजी नको करु थोड्या दिवसांनी तो विसरुन जाईल सगळं."त्यांच हे बोलन ऐकुन रोशनचे बाबा ही सावरले.त्यांनी ही रोशन समजावले.


       दिवस जसे जसे उलटत होते,तसे तसे रोशनला वाईट स्वप्न पडत होते.फार दिवस झाले.त्याचे आई बाबा ही खुप घाबरले होते.रोशन खुप घाबरला होता.त्याने अन्न पाणी सोडले होते.एकदा त्याचे बाबा त्याला एका थेरपीस्ट कडे घेऊन गेले.थेरपीस्ट ने सगळी हकीकत ऐकुन घेतली आणि रोशनला तपासले.


"तुमच्या मुलाने कसले तरी टेंशन घेतले आहे.त्याने कुठे तरी असा प्रकार घडताना बघितला असेल.तो आतुन खुप घाबरला आहे. त्याने मनात खुप काही साठवून ठेवलं आहे. ह्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत आहे आणि मानसिक टेंशन मुळे त्याला तशी स्वप्न पडत आहेत.हे त्याच्या साठी खुप घातक आहे.तो depression मध्ये सुद्धा जाऊ शकतो."

"डॉ. काही मार्ग नाही का?"


"एक काम करा,तुम्ही बाहेर बसा,मी तुमच्या मुलाशी बोलतो."


"ठिक आहे."


     थेरपीस्टने एक हास्यमय वातावरण तिथे निर्माण केले.तो त्याच्याशी खुप वेळ बोलला.त्यांने नंतर त्याला विचारला की;


"रोशन तु कुठे कोणाचा खुण होताना किंवा कोणाला मरताना पाहिलं आहेस का?"


(घाबरुन)"नाही."


"घाबरु नकोस,तुला कोणीही काही बोलणार नाही.तुला कोणीही काही करणार नाही."


"डॉ. मी एका मुलीचा खूण होताना बघीतलं.मी आणि माझा मित्र जेव्हा मैदानातुन घरी जात होतो,तेव्हा एका गल्लीत एका मुलाने एका मुलीला चाकूने मारले.त्याने चार पाच वेळा तिच्यावर हल्ला केला.आम्ही खुप घाबरलो होतो.तेवढयात त्या मुलाने आम्हाला पाहीलं आम्ही तिथुन पळून गेलो.तो आमच्या मागे लागला होता.आम्ही खुप घाबरलो होतो.आम्ही शेवटी आमच्या घरी पोहचलो.मला वाटले की तो आता आम्हाला ही मारुन टाकेल."


"बाळ घाबरु नकोस.कोणीही तुला काही करणार नाही आणि जे झाला ते विसरुन जा.तुझे आई बाबा तुझ्या सोबत असताना तुला कसं कोण काही करेल.तु त्या मुलाचा चेहरा बघितलास का?"


"हा डॉक्टर."


"ठिक आहे.आपण पोलीसांना सारं काही सांगु आणि मग ते योग्य ती ऐक्शन घेतील."


"नको डॉक्टर.मी पोलीसांना सांगितलं आणि त्याने मला मारले तर....."


"घाबरु नकोस बाळ.तुला काही होणार नाही.पोलीस तुला काही होऊ देणार नाही."


"नको डॉक्टर."


"ठिक आहे.समज हिच गोष्ट तुझ्या परिवारात कुणा सोबत झाली असती आणि कोणी तरी हे पाहिलं असेल.पण तो ही ह्याचं भितीने पोलीसांना मदत करत नाही.पण तुम्ही त्या माणसाला शोधत आहात.ज्याने तुमच्या परिवारातल्या माणसाला मारलं.पण ज्याला माहीत आहे त्यानेच जर काही सांगितले नाही तर,त्या व्यक्तीला न्याय कसा मिळेल."


(रोशनने खुप विचार केला.)


"ठिक आहे डॉक्टर.मी त्या व्यक्तीला न्याय नक्कीच मिळवुन देइल.थैंक यू डॉक्टर."


    थेरपीस्टने हे सगळं त्याच्या बाबांना सांगितले.काही वेळाने तेथे पोलीस आले.त्यांनी रोशनच सारं बोलन ऐकुन घेतलं.रोशनने त्या व्यक्तीचे वर्णन केल्या प्रमाणे चित्रकाराने त्या व्यक्तिचे चित्र काढले.मग पोलीसांनी त्या व्यक्तीला पकडले.त्याला खुप मारले.अखेर त्याने त्याचा गुन्हा कबुल केला.रोशन मात्र खुश होता.त्याने एका व्यक्तीला न्याय मिळवुन दिला होता.त्याच टेंशनही दुर झाले होते.रोशनला पोलीसांनी एक पुरस्कारही दिला.त्या नंतर रोशनला कधीही तसे स्वप्न पडले नाही.त्याचे आई बाबा ही आता खुप खुश झाले.

       मित्रांनो,आपल्या आजुबाजुला अश्या अनेक गोष्टी घडत असतात.तुम्हाला जर अश्या गोष्टीं बद्दल काही माहीत असेल तर तुम्ही माघार घेऊ नका.आपल्या सोबतही असे घडु शकते म्हणुन पोलीसांंना योग्य ते सहकार्य करा.त्यांना घाबरु नका.



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime