Shubhankar Malekar

Children Stories Fantasy Inspirational

3.9  

Shubhankar Malekar

Children Stories Fantasy Inspirational

स्वप्न

स्वप्न

2 mins
284


"शुभांकर,उठ लवकर कॉलेजला नाही का जायचं तुला?"

"हो आई,उठतो."

"अरे उठ तुझं बारावीच वर्ष आहे तरीही तुला त्याची काहीच चिंता नाही."

(झोपेतुन उठुन)

"उठलो बाई.....तू पुन्हा पुन्हा त्या परीक्षेचा विषय नको काढु,मला खुप टेंशन येतं."

"(हसुन) कसलं टेंशन.... घाबरु नकोस रे,पास होशील तु...चल आता उठ आणि आंघोळीला जा.मी तुला नाश्ता करुन देते."

"हो..."

         मी अंघोळ वैगरे करुन बाहेर आलो.त्यानंतर मी नाश्ता केला आणि कॉलेजला जायला निघालो.बस स्टॉपवर जाऊन उभा राहीलो,मात्र बस दरवेळी प्रमाणे वेळेवर आली नव्हती.काही वेळाने मात्र बस आली.ती पुर्ण पणे भरली होती.मला जायला वेळ होत होता म्हणुन मी ही कसा बसा त्या बस मध्ये शिरलो.बस मध्ये खुप गर्दी होती.काही वेळाने मी कॉलेजला येउन पोहचलो.कॉलेज मध्ये गेल्यावर रोजच्या प्रमाणे अभ्यासाचे तास सुरु झाले.काही वेळाने कॉलेज सुटले.त्या नंतर मी माझ्या क्लासला जायला निघालो.तेव्हा सगळी कडे गणेशोत्सवाची तयारी सुरु होती.माझा क्लास हा आमच्या शरातल्या बाजारात होता.बाजारात बघावं तिथे गर्दीच दिसत होती.शहरातले सगळेच लोक त्या बाजारात असावे इतकी ती गर्दी...मी क्लासला गेलो त्या नंतर काही वेळाने क्लास सुटला मग मी घरी गेलो.


            आमच्या घरी ही गणपती बाप्पाचे आगमन व्हायचे. ह्या वर्षीही आम्ही बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात केलं. माझे सर्व नातेवाईक त्या दिवशी आमच्या घरी आले.नातेवाईकांनी संपुर्ण घर गजबजून गेलं होतं.आम्ही गणेशोत्सवात खुप मज्जा केली.त्या नंतर काही दिवसांनी मी माझ्या आत्या कडे जायला निघालो.मी कधी तरीच आमच्या शहरा बाहेर जायचो.त्या दिवशी मी खुप दिवसा नंतर ट्रेनचा प्रवास करत होतो.मी रेल्वे स्टेशन वर येउन पोहचलो.ती गर्दी पाहुन माझं डोक दुखायला सुरुवात झाली.मी आणि माझी आत्या त्याचं गर्दीतुन तिच्या घरी येउन पोहचलो.मी काही दिवस तिच्या कडे राहीलो.मी तेव्हा माझ्या आत्या आणि तिच्या फैमिली सोबत मॉलला गेलेलो.आम्ही तिथेही खुप मज्जा केली.आम्ही तिथे एक मूवी देखील बघितला.


    त्या नंतर काही दिवसांनी मी पुन्हा माझ्या घरी आलो.बोलता बोलता माझ्या परीक्षेचा दिवस जवळ आला.माझा नंबर माझ्याच कॉलेज मध्ये लागला होता.मी पेपर साठी खुप मेहनत केलेली.माझे सगळे पपेर खुप सोप्पे गेले.त्या नंतर मी माझ्या फैमिली सोबत गोवाला जायला निघालो.आम्ही गोवाला जाऊन खुप मज्जा केली.मी माझ्या पुर्ण फैमिली सोबत गोवाला गेलो होतो.मी माझ्या सट्टयांमध्ये खुप मज्जा केली.काही दिवसांनी माझा रिझल्ट लागला.मी पुर्ण महाराष्ट्रातुन पहीला आलो होतो.हे ऐकुन मला अचानक चक्करच आली.त्या नंतर काही वेळाने एक आवज कानी पडला...

"शुभांकर उठ,तुझे ऑनलाइन लेक्चर सुरु होतील आता... उठ लवकर..."

     मी झटक्यात उठलो बघतो तर मी माझ्या घरी बिछ्यानावर झोपलो होतो.

"शुभांकर... काय झालं?"

"काही नाही.आई,मी एक स्वप्न बघितलं..."

"कोणतं स्वप्न?"

"आई,मी पाहिलं की माझी बारावीची परीक्षा ऑफ़लाईन झाली.सगळं काही ठिक सुरु होतं.लोकांवर तेव्हा कोणतेच निर्बंध नव्हते.सगळी कडे गर्दीच गर्दी होती.लोक सगळे सण पुन्हा पुर्वी सारखे साजरे करत होते.आई,मला सांग हे सगळं पुन्हा पुर्वी सारखं कधी होईल?मी माझ्या कॉलेजला जाऊन मित्रांसोबत मज्जा मस्ती करत अभ्यास कधी करेन.आपण सगळी कडे कधी फिरू शकू?आपण सगळे सण कधी साजरे करु शकू?"

"बाळ,तो दिवस आता दुर नाही राहीला.लवकरच सगळं काही पुर्वी सारखं होईल.वाईट काळाला सुद्धा काही मर्यादा असते.आता तो वाईट काळ संपण्याची वेळ आली आहे...."


Rate this content
Log in