पृथ्वीचे जतन : काळाची गरज
पृथ्वीचे जतन : काळाची गरज
पृथ्वीचे जतन काळाची गरज या अर्थाने सांगावे लागते की पृथ्वीवर शिलावरण,जलावरण,वातावरण ह्या घटकांचा समावेश एकत्रित रित्या झाला आहे. या सर्व ठिकाणी मानवनिर्मित साधनामुळे जैविक व अजैविक दोन्हीं घटकावर गंभीर दुष्परिणाम झाले आहेत.पर्यावरणाचा र्हास होत आहेत. नैसर्गिक संपत्ती नष्ट होत आहे.तिचे नियंत्रण होणे काळाची गरज आहे;पण मानवाच्या हव्यासापोटी तिच्यावर घाला घातला जात आहेत.हे होऊ नये यासाठी प्रत्येक घटकाची काळजी घेणे आवश्यक आहे.तिचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे.
त्यातील पहिला घटक आहे निसर्ग.निसर्गात असणारी झाडे मानवाला वरदान आहे.शुद्ध हवा,पाऊस ह्या निसर्गामुळे मिळतात;पण त्यात असणारी झाडे तोडली जातात.त्यामुळे त्यांच्यावर जगणारे हजारो पक्ष्यांचे प्राण्यांचे निवारे उध्वस्त होतात.त्यामुळे निसर्ग साखळी बिघडून अवेळी पाऊस पडतो. काही ठिकाणी अति जोराचा तर काही भाग अवर्षणाचा,दुष्काळाचा.त्यामुळे काही ठिकाणी अचानक ढगफुटी होते.काही ठिकाणी महापूर येतो.यात मानवहानी आणि निसर्ग हानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते.निसर्गातील जंगले नष्ट केली जात आहे.मोठमोठी डोंगर,पर्वत कालबाह्य होत असून त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रेटच्या इमारती,बंगले बांधले जात आहे.जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्याचा परिणाम वातावरणातील तापमानावर झाला आहे.तापमानपातळी वाढून अनेक आजार त्यातून निर्माण होत आहे.याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे.
दुसरा घटक आहे जलावरण.पृथ्वीच्या 71टक्के भागात जलावरण आहे.29टक्के भाग जमिनीने व्यापला आहे.जलावरणात 3 टक्के पाणी हे गोडे पाणी आहे;पण ह्या पाण्यात नियमांचे उल्लंघन व वाढत्या अनधिकृत झोपड्यांमुळे गोडे पाणी दूषित होत आहेत.त्यात रासायनिक कंपन्या यांनी तर जलमय गोड्या पाण्याच्या नद्या दूषित करून गोडे पाणी प
्रदूषित केले आहे.त्यातील असणारे जलचर जे मानव मासे,खेकडे,झिंगे म्हणून खातो ते मारले जात आहेत.काही नद्या अतिक्रमणात नाहीस्या झाल्या आहेत.त्यांचा उगम जिथे होतो तिथे गटारे जोडली जातात.अशा अनेक गटारांची गटार गंगा उदयास येत आहेत.गोडे पाणी प्रदूषित करून मानवी आरोग्य धोक्यात येत आहेत.त्यामुळे अनेक साथीचे रोग इतरत्र पसरले जातात.सागरी वाहतूक होत असताना तेल गळतीमुळे अनेक जलचर प्राणी मृत पावतात.तसेच शहरातील घाणीचे गटारे त्यामुळे जलचर जीवन कायम संकटात असते.
तिसरा घटक आहे वातावरण.वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वातावरणात ध्वनी प्रदूषण,वायूप्रदूषण वाढत आहे.त्याचा परिणाम मानवी जीवनाशी होत आहेत.त्यामुळे अनेक आजार वाढत आहेत.दमा,कँसर,डोळ्यांचे आजार,फुफ्फुसाचे आजार,हृदयविकार हे आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत.म्हणून काही प्रदूषित पट्टयात वृक्षारोपण केले जाते.त्यामुळे त्या पटटयातील हवा शुद्ध राखण्यास मदत होते.ऑक्सिजनचे प्रमाण वाढले जाते.आरोग्य चांगले राहते.म्हणून वृक्षारोपण करून झाडांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे.त्यांची लहानमुलासारखी काळजी घेतली पाहिजे.त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जातो.अतिवृष्टी व गारांचा पाऊस ह्या गोष्टी निसर्गातील बदलामुळे घडत असतात.म्हणून देशात जंगले राखीव केली जावीत.डोंगरांचे उत्खनन थांबवावे.निसर्गातील असमतोल विनाशाला कारणीभूत आहेत.त्यामुळे मानवावर अनेक आजार व इतर विनाशकारी संकटे येत राहतील.त्याला मानवाने आता रोखले पाहिजे.जनजागृती,प्रबोधन झाले पाहिजे.शालेय स्तरावर याची जाणीव विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासापुर्ती न राहता प्रात्यक्षिक स्वरुपात दर्शविली जावीत.त्याचे भयानक दुष्परिणाम एकांकिका,नाटिकेतून सादर केले जावे.प्रत्येक शाळेत हा उपक्रम म्हणून राबविण्यात यावा. त्यासाठी प्रोजेक्टरचा वापर, संगणक साहित्याचा वापर शालेय व महाविद्यालयीन स्तरावर दरवर्षी करण्यात यावा.