Sanjay Raghunath Sonawane

Others

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Others

आत्महत्या मानसिक शारीरिक आजार

आत्महत्या मानसिक शारीरिक आजार

4 mins
152


आजपर्यंत अनेक आत्महत्या झाल्या.या आत्महत्या का होतात?त्याची कारणमिमांसा शोधणार आहोत.त्याची मानसिक व शारीरिक कारणे कोणती आहेत?त्याचा शोध प्रत्यक्ष अनुभवातून शोधणार आहोत.घटना,प्रसंग ही त्यामागची खरी वास्तविकता आहे.यासाठी हल्लीचे लोकजीवन व पूर्वीचे लोकजीवन यांचा सह्सबंध आहे.औषधे हा त्यावरील शंभर टक्के उपाय नाही.तो तात्पुरता उपचार म्हणावा लागेल.कारण वेडे झालेली माणसे कधी लवकर बरे झालेली मी पाहिलेले नाही.ते शांत होऊ शकतात ते त्यांच्या मेंदूवर औषधांचा वापर करूनच.त्यामुळे त्यांच्यापासून मानसिक आजाराची कायमस्वरुपी सुटका होत नाही.मग हे आजार होऊ नये यासाठी कायमस्वरुपी उपाय शोधले पाहिजे.


त्यातील प्रथम अशी वेडी मुले अचानक वेडसरपणा करू लागतात.ते त्यांच्यातील आलेल्या जीवनातील वैफल्यअवस्थेमुळे.त्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या शरीराने निरोगी व धष्टपुष्ट जरी असली तरी मानसिक विकलांग झालेली असतात.त्यात दोन प्रकारचे मानसिक विकलांग असतात.त्यातील काही अती चिंतेने ग्रासलेली विकलांग व दुसरे शारीरिकदृष्ट्या आनुवंशिक विकलांग.शारीरिकदृष्ट्या आनुवंशिक विकलांग यांना शांत जीवन जगण्यासाठी औषधांचे वेळोवेळी सेवन करावे लागते.दुसर्याप्रकारचे विकलांग मानसिक चिंतेने ग्रासलेले हे कायमस्वरुपी बरे होऊ शकतात.परंतु त्यांनी भावनिक दृष्ट्या आपल्या सह्कारी मित्राला झालेल्या चुका प्रामाणिकपणे सांगितल्या पाहिजेत.एकाकी जीवन सोडले पाहिजे.आपली सुख दुःखे एकत्रित सांगितली पाहिजे.


मित्र हे मानसिक आधाराचे केंद्रबिंदू असतात;पण मित्र सुसंसकृत,निस्वार्थ,निर्व्यसनी असावेत.त्यांच्यात लोभ नसावा.मित्रसुद्धा एक मानसिक आधार देणारे अनुभवाचे डॉक्टर असतात.ते अनेक वाईट व धोकादायक गोष्टींपासून परावृत्त करत असतात.मित्र निवडताना तो परिचयातील असावा. गरीबीची जाणीव असलेला असावा.तो फार श्रीमंत असला पाहिजे याची गरज नसते.मग तो मित्र असेल किंवा चांगली मैत्रिणसुद्धा असू शकेल. तो किंवा ती अनेक विघातक गोष्टीं पासून नेहमी सावध करत असतात.चांगले मित्र व मैत्रिण पारखून घेतलेले असावे.घातकी व स्वार्थापुरते नसावे. आयुष्यभर निर्मळ मनाची व गोड स्वभावाची असावी.


    आत्महत्या या कष्टकरी वर्गात कमी प्रमाणात असतात.अशा आत्महत्या आर्थिक गोष्टींमुळे होतात.काही आत्महत्या या कुटुंबातील जाचाला कंटाळून होतात.अती ताण तणाव हे सुद्धा कारण असते. याचे प्रमाण ग्रामीण भागात आढळते.हे प्रमाण फार अत्यल्प असू शकते.कारण कष्टाचे जीवन जगत असलेल्या लोकांत सहनशीलता जास्त असते.मानसिक परिपक्वता प्रमाण जास्त असते.अती श्रम व योग्य निद्रा यामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी असते.समाधानी जीवन नसते. काटकसर, चिकाटी हे त्यांचे अंगभूत गुणधर्म असतात. त्याचा परिणाम मनाशी व मेंदूशी जोडलेला असतो.आरामदायी जीवन,आळस शक्यतो गरीब कुटुंबात फार कमी प्रमाणात असते.त्यामुळे अशी कुटुंबे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असतात.ठराविक गरजा,साधी राहणी हे त्यांचे जीवन वैशिष्ट्य असते.त्यामुळे आजारांचे प्रमाण कमी असते. प्रतिकारशक्ती जास्त प्रमाणात असते. साधे आजार त्यांची शरीरातील प्रतिकारशक्ती नष्ट करते. त्यामुळे साधे आजार किंवा आर्थिक तणाव ते पेलू शकतात.


बरेच वर्षे त्यांच्यात सहनशीलता येते.घरातील शिस्त,संस्कार,संयम,कष्ट करण्याची सवय,नियमितता यामुळे ग्रामीण भागात ह्या घटना जास्त आढळून येत नाही.अनावश्यक गरजा यावर नियंत्रण असते.त्यामुळे बदललेली जीवनशैली जरी असली तरी ते आहे त्या परिस्थितीत राहतात.त्यांचे राहणीमान सुद्धा बहुधा साधेच असते.त्यांना परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.अशा वातावरणातील मुले चंचल असतात.निरोगी असतात.शोधकवृती त्यांच्यात असते.शरीराने व मनाने सुदृढपणे जगत असतात.अपमान व अपयश पचविण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असते.आईवडिलांचे कष्टमय जीवन ते प्रत्यक्षात पाहत असतात.त्यांचे अनावश्यक चोचले पैसे असून देखिल पुरविले जात नाही.


     याउलट परिस्थिती शहरात अती श्रीमंत व मध्यम वर्गीय कुटुंबात असते.छोट्या छोट्या गोष्टीसाठी,क्षुल्लक भांडणामुळे आत्महत्या होतात.त्यात फार मोठे गंभीर कारण नसते.ज्या पुर्वजांच्या पुण्याईमुळे श्रीमंती आलेली असते तिथे कलह,भांडणे चालू असतात. आरामदायी जीवन, सुखमय जीवन यामुळे काहींना कष्ट काय असतात?पैसा कसा येतो? याच्याशी देणे घेणे अजिबात नसते.त्यातील बरेच सदस्य कष्ट करत नाही. त्यामुळे थोडशे कुठे कमी पडले की आत्महत्येचा मार्ग निवडतात. आयते सुख शिक्षणात अडथळा होऊन बसते.अशी मुले शिक्षण घेत नाही. शिक्षण त्यांना डोकेदुखी वाटू लागते.त्यांची इच्छा नसते.मग एक दिवस घरच्यांना कंटाळून आत्महत्या करण्याकडे वळतात तर काही व्यसनाकडे वळतात.


श्रम करण्याची किंवा एखादा धंदा करण्याची त्यांची स्वत:हून इच्छाशक्ती निर्माण होत नाही.अर्धवट शिक्षणामुळे हवी ती नोकरी मिळत नाही.मग ते वैफल्यअवस्थेत जातात.यातील काही रिकामटेकडेपणा मुळे चरस ,गांजा ओढतात,दारू पितात.चोरी करतात.जबरदस्ती चांगल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.त्यांच्या गुंडप्रवृत्तीला बळी पडतात अशी मुले,मुली आत्महत्या हा पर्याय निवडतात. कधी कधी चांगल्या कुटुंबात देखील हे प्रकार घडतात.याला शिक्षण किंवा अभ्यासक्रम जबाबदार नाही.शिक्षणामुळे आत्महत्या केली हा आरोप चुकीचा आहे.त्याला कारण विद्यार्थ्यांमध्ये असलेला अभ्यासाचा अभाव.आळसीवृती व   सहज सर्व सुखसोई.कष्टमय जीवन काय असते हे विद्यार्थ्यांना समजले पाहिजे.आईवडिलांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना असली पाहिजे.अभ्यास हे जप आहे,तप आहे हे विद्यार्थ्यांनी समजले पाहिजे.स्वत:विद्यार्थ्यांत अभ्यासाची,व्यायामाची आवड असली पाहिजे.मुलांना सारखे नोकरीसारखे गुंतवून ठेवू नये.त्यांना विचार करण्यास,अभ्यास करण्यास वेळ दिला पाहिजे.शिक्षण घेण्यासाठी वातावरण शांत असले पाहिजे.टीवी ,मोबाईल यावर नियंत्रण असले पाहिजे.त्याचा अतिरेक होता कामा नये.विद्यार्थ्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी गरीब आईवडिलांकडे अनावश्यक गोष्टींसाठी हट्ट धरू नये.इतरांशी आपली तुलना करू नये.समाधान मानावे.साधी राहणी उच्च विचारसरणी हे आपले ध्येय असले पाहिजे.आपल्या जीवनात जीवंत अनुभव सांगणारे उत्तम आत्मचरित्र असलेले पुस्तक वाचावे.चांगले पुस्तक जीवनपरीवर्तन करीत असते.मनाचे सबलीकरण करीत असते.मानसिक ताण तणाव दूर करत असते.याचा परिणाम आत्महत्या थांबू शकतात.मन परिपक्व होते.


आत्महत्या म्हणजे पाप आहे, गुन्हा आहे. आपल्या आयुष्यात ती आपण स्वत:हून मानलेली हार आहे,पराभव आहे.सक्षम मन नेहमी विजयाकडे वाटचाल करत असते. अनेक परिस्थितीशी संघर्ष करून जो लढतो तो खरा जीवनात यशस्वी होतो. जीवनात अपयश येत राहते. अपमान होतच असतो.तो आपण गिळायची सवय केली पाहिजे. एक दिवस निराशा निघून जाईल व आशेचा एक किरण आयुष्यात पुन्हा येईल. पुन्हा एकदा लढ गड्या एक दिवस तुझ्यासाठी अनमोल असेल.


Rate this content
Log in