Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

2  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

संकट काळात ऑनलाईन शिक्षण

संकट काळात ऑनलाईन शिक्षण

2 mins
130


नियमित शाळेत प्रभावी शिक्षण असते;शिक्षणात जिवंतपणा असतो.शिक्षण प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध असते.शिक्षक,विद्यार्थी,पालक यांच्यासाठी नियमित शाळेचे मह्त्त्व खूप आहे.शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास आकर्षण असते.त्या वातावरणात अध्ययन, अध्यापनाची योग्य सांगड बसलेली असते.सर्व मुल्यमापन तंत्राच्या साधनांचा वापर करता येतो.अनेक पर्याय व विकल्प असतात.शाळेतील आजूबाजूचा परिसर हे अनुभवातून शिक्षण देत असते.ते प्रत्यक्ष शिक्षण असते.


शिक्षण जगातील एक परिवर्तन करणारे प्रभावी माध्यम म्हणून समजले जाते.प्रगत देशाचे लक्षण म्हणजे प्रभावी व आधुनिक शिक्षण सर्व क्षेत्रातील वर्गासाठी एकसमान असते.त्यामुळे सर्वांचा विकास साधण्यासाठी एकच शिक्षणाचे माध्यम वापरले जाते.

        

  परंतु हल्ली जगावर महामारी कोरोनाचे संकट ओढवले व त्याचा नियमित शिक्षणावर विपरीत परिणाम झाला.शिक्षणाची सर्व सूत्रे बदलली.नियमित शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली नाईलाजास्तव कार्यान्वीत करावी लागली.त्यातून अनेक तोटे झाले.विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावली.ऑनलाइन शिक्षणात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्ह्ता.विद्यार्थी नक्कीच अध्ययन करतो का?की मिळालेल्या साधनांचा गैर वापर केला जातोय अशी संधीग्ध परिस्थिती ओढावली गेली.विद्यार्थ्यांचा मैदानावरचा संपर्क तुटला.मोकळा श्वास घेऊन शिक्षण घेणारी मुलेमुली चारभिंतीच्या आड शिक्षण घेऊ लागली.ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी आल्या.काही विद्यार्थ्यांकडे एकच मोबाईल असायचा व त्यात तीन भावंडे शिकायची.अशी परिस्थिती म्हणजे पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेले असते.गरीबी व अर्थार्जन यात त्यांचे झालेल्या हाल अपेष्टा होय.


           परीक्षेचा कालखंड म्हणजे तारेवरची कसरत होती.एक मोबाइलवर वेगवेगळ्या इयत्तेत शिकणारी भावंडे असायची.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागते.अशा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी परत,परत परीक्षा घ्याव्या लागतात.अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण नकोसे झाले.शाळेची घंटा कधी वाजेल आणि शाळा कधी भरेल ही उत्सुकता लागून राहीली आहेत.नेहमीच्या वर्गातील मित्रांचा सहवास त्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे मिळत नाही.त्यात ग्रामीण व शहरात नेटवर्कचा भयानक परिणाम.ऑनलाइन शिक्षणात ऑनलाइन शिक्षण असूनही ते प्रभावीपणे घेता येत नाही.अनेकांना अनेक अडचणी समोर असायच्या.ऑनलाइन शिक्षण जरी निरस असले तरी संकटकालीन काळात त्याशिवाय पर्याय नाही.काळाबरोबर अनेक आजारांची संकटे येतांना मानवी व्यवस्थापनाची सुरुवात म्हणजे येणारी आव्हानात्मक संकटाशी यशस्वीपणे लढा देणे होय.त्यात ऑनलाइन शिक्षण हा पर्याय नाईलाजाने शासकीय यंत्रणेला निवडावा लागतो.शिक्षण ही प्रक्रीया थांबता कामा नये.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होवू नये.मनातील भीती निघून जावी यासाठी ऑनलाईन शिक्षण काळानुसार चालू ठेवावे लागेल.ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक आजार विद्यार्थ्यांना होतात.नियमित व्यायाम बंद होतो.शरीराची कार्यक्षमता कमी कमी होते.शरीरातील लट्ठपणा वाढत जातो.जीवन आळशी व आरामदायी होते जे शरीराला हानिकारक असते.डोळे,मान,पाठ हे आजार लहानवयात उद्भवतात.


       भविष्यात अशी परिस्थिती ओढावल्यास पर्यायी मुल्यमापन तंत्र व परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या लागतील.त्यासाठी तांत्रिक व संगणकीय प्रशिक्षित शिक्षक वर्ग,प्रशिक्षित विद्यार्थी आणि समाज यांची तयारी असली पाहिजे.शिक्षण व्यवस्थापनाने आता यासाठी दोन पाउल पुढे सरसावले पाहिजे.शासनाला वेळोवेळी सहाय्य केले पाहिजे.प्रशिक्षित वर्ग आयोजित केले पाहिजे.ऑनलाईन शिक्षणाची प्रक्रीया समजून सांगितली पाहिजे.त्यात विद्यार्थी व शिक्षक नवीन असतात.तंत्रज्ञान असणारी,संगणकीय माहीतीचे अद्ययावत प्रात्यक्षिक ज्ञान आणि वृतांतमाहीतीचे संकलन करणे गरजेचे आहे.अवघड व बोजड वाटणारी प्रक्रिया आनंददायी,सोपी व सहज हाताळता येईल अशी असावी.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract