15 ऑगस्ट1947 अमृत महोत्सव
15 ऑगस्ट1947 अमृत महोत्सव
खरोखर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली.त्यामुळे हे वर्ष आपण अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करत आहोत.प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाबदद्ल अभिमान मनामनात जागृत झाला.देशाच्या प्रत्येक शाळा,कॉलेज,महाविद्यालये यामधून अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहेत.घर घर तिरंगा म्हणून देशातील प्रत्येक नागरीक आपल्या घरावर झेंडा फडकवत आहेत.देशाचे जवान डोळयात तेल घालून देशाच्या सर्व सीमावर तैनात राहून देश रक्षण करत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले.एक आदर्श संविधान देशाला मिळाले.पंडीत जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले.डॉ राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती झाले.देशाचे पोलादी पुरुष अशी ओळख असलेले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थाने भारतात विलीन झाले. देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारो लोकांचे बलिदान झाले. अनेक क्रांतिकारकांना फासावर लटकविले गेले.कित्येकांचे बळी गेले.देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करून आज भारतीयांना जगण्याचे मूलभूत हक्क मिळाले.यात अनेक महापुरुषांच्या कार्याचे योगदान आहेत.म.गांधी,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सुभाषचंद्र बोस,झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर,विनायक दामोदर सावरकर,वासुदेव बळवंत फडके दादाभाई नौरोजी,लाला लजपतराय.त्याचप्रमाणे भगतसिंग,राजगुरु,सुखदेव,क्रांतिसिंह नाना पाटील ह्या क्रांतिकारकांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे.त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.शेवटी भारतीयांच्या उठावाला कंटाळून इंग्रजानी भारत सोडला.15ऑगस्ट 1947साली लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला.त्या शांत मध्यरात्री भारत पार
तंत्र्यातून मुक्त झाला.एक सोनेरी पहाट उगवली.
देशाला स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीयांच्या त्यागातून मिळालेलेआहे.शौर्यातून मिळालेले आहे.देशाच्या सैनिकांच्या रक्तरंजित बलिदानातून प्राप्त झाले आहे.त्यासाठी त्या सर्वांचे कायम स्मरण रहावे.शहिदांची गाथा भारतीयांना कायम प्रेरणा देत आहे. देशातील लोकशाही हुकूमशाही होऊ नये.सत्तेचा गैरवापर होऊन निरपराध जनतेवर अन्याय होऊ नये,अत्याचार होऊ नये.सूडबुद्धीचा वापर करू नये.न्याय,समता,बंधूता या न्यायाने सर्वांना वागविले जावे.कुणावरही अन्याय होऊ नये.देशातील जनतेला गुलामीची वागणूक मिळू नये.देशातील विकासकामे प्रामाणिक होत राहिली पाहिजे.हा देश भारतीय जनतेचा आहे.त्यावर ठराविक शोषण करणारे लोक लोकशाही धोक्यात आणू शकतात.तशी संधी त्यांना मिळू नये.आर्थिक,मानसिक,शारीरीक शोषण हे देशाला नेहमी घातक ठरू शकते.स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आपण आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. अन्न,वस्र निवारा,शिक्षण,आरोग्य या अत्यावश्यक सेवा भारतातील नागरीकांना मिळायला पाहिजे.प्रामाणिक समाजकारण करणारी व्यक्ती असेल तर त्रास होऊ नये.तिचा आदर व सन्मान केला जावा.देशाची राष्ट्रीय एकात्मता कायम राहवी.देशाची सुरक्षितता,सार्वजनिक वास्तूंचे,ऐतिहासिक स्थळांचे ,राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण होणे गरजेचे आहे.नैसर्गिक जंगलांचे,राष्ट्रीय उद्यानांचे,अभयारण्यांचे या सर्वांचे संवर्धन व जतन होणे आवश्यक आहे. शहिदांचे स्मरण,देशाची अखंडता ही खरी अमृत महोत्सवाची सुवर्ण अक्षरात नोंद घेतल्यासारखे राहील.