Sanjay Raghunath Sonawane

Others

2  

Sanjay Raghunath Sonawane

Others

जलसुरक्षा

जलसुरक्षा

3 mins
74


पाणी जीवनावश्यक आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याचे मानवी जीवनात फार मह्त्त्व आहे.जसे गोडे पाणी मानवाचे जीवन आहे तसेच उद्योगव्यवसायासाठी खारट पाणी तितकेच महत्त्वाचे आहे. त्यात गोडे पाणी व खारट पाणी यांचा समावेश आहे.अनेक व्यवसाय हे गोडे पाणी व खारट पाणी यावर अवलंबून असतात.अनेकांची उपजीविका नद्या,तलाव,तळी,समुद्र खाड्या,समुद्र,महासागर यावर अवलंबून असते.अनेक प्रकारची जलवाह्तूक नद्या,समुद्र,महासागर यामधून होत असते.अनेक व्यवसायाचे साधन म्हणजे नद्या,समुद्र,खाड्या,महासागर होय.राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलवाह्तूक स्वस्त व कमी खर्चाची यातून होत असते.म्हणून ही संसाधने मानवाला वरदान ठरली आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यापारात ह्या नैसर्गिक जलमार्गाचा फार उपयोग होत आहे. मीठ,मोती,मासे,गैस ह्या जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होत असते. तसेच भविष्यात वीजनिर्मितीसाठी देखील समुद्र व महासागर यातील पाण्याचा वापर होणार आहे.

          परंतू ही वरदान असलेले संसाधने धोक्यात येत आहेत. तेल गळतीमुळे जलचर धोक्यात येत आहेत. त्यामुळे अनेक मासे मृत्यू पावतात.त्याचा परिणाम मानवी व्यवसायावर व आरोग्यावर होत आहे.दूषित रासायनिक पाण्यामुळे नद्या, तलाव, तळी, खाड्या, समुद्र, महासागर यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे.हा जागतिक पातळीवर फार गंभीर प्रश्न आहे.ग्रामीण व शहरी भागात अनेक गटारे नदी,नाले,तलाव,खाड्या यात सोडले जातात.प्लास्टिक न विरघळणार्या वस्तू त्यात सोडल्या जातात.त्या वस्तू पाण्यात जमा होऊन थर तयार होतो.गाळ तयार होतो.त्यात अनेक जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे.अनेक जलपर्णी वनस्पतींमुळे वाह्तूकीत अडथळा निर्माण होत आहेत.गाळ व ह्या वनस्पतींमुळे पुराचे प्रमाण वाढत आहेत.त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहेत.नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत.जलमार्गात होणारी बांधकामे हा देखील फार मोठा अडथळा होत आहेत.मृत्यू पावलेली जनावरे,मानवी शरीर नद्यात सोडली जातात.काही पुरामुळे वाहत येऊन अडकतात व रोगाची भयानक साथ येत असते.अनेक दिवस तुंबलेली दूषित गटारे पावसाळ्यात नद्यात,खाड्यात सोडले जातात.याला कारण गटारात सोडलेला कचरा जो आहे तो कचरापेटीत न जाता गटारात जातो व तो कचरा नद्यात व खाडी यांमध्ये जसाची तसा मिसळला जातो.त्यासाठी कचरा विलिगीकरण करून कचर्याची योग्य विल्हेवाट लावता येते.त्यासाठी ग्रामीण भागात व शहरात कचरापेट्या असणे गरजेचे आहे.त्यामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण थांबले जाईल.रोगराई कमी होईल.

            आता त्यासाठी जलसुरक्षा फार मह्त्त्वाची आहेत.नद्या व खाड्यातील पाणी सुरक्षित राहणे फार महत्त्वाचे आहेत.त्यासाठी कारखाने व त्यातील दूषित पाणी नद्यात सोडू नयेत. शहरातील गटारे गोड्या पाण्याच्या नद्यात सोडू नये.पिण्याच्या पाण्यात ब्लिचींग पाउडर,जंतूनाशक पाउडर मिसळावी.पाण्याचे निर्जंतूकीकरण होणे गरजेचे आहे.सण,उत्सव समारंभ यावेळी मोठ्याप्रमाणात पाणी दूषित होत असते.त्यावेळी अनेक नदीकिनारे,सागरकिनारे दूषित होत असतात.केरकचरा साचला जातो.हे काम फक्त प्रशासन करू शकत नाही.त्यासाठी सामाजिक उपक्रम हे जागतिक स्तरावर राबविले गेले पाहिजे.अनेक उत्सव मंडळानी एकत्र येऊन समुद्र किनारे,नदीकिनारे स्वच्छ केली पाहिजे.

शाळा,कॉलेज,महाविद्यालयातून प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे आहे.ते मनुष्यबळ सामाजिक उपक्रमासाठी वापरून स्वच्छतेची जनजागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छता अभियान सप्ताह साजरा करून दरवर्षी आपले समुद्रकिनारे गोड्यापाण्यासारखे निर्मळ,नितळ,स्वच्छ केले पाहिजेत.त्यासाठी शासनाची परवानगी व सहकार्य मिळवावे.नद्या,खाड्या यातील गाळ व कचरा दरवर्षी काढण्यात यावे.सार्वजनिक पाणी दूषित करणारावर कडक कारवाई झाली पाहिजे.रासायनिक उद्योग व इतर उद्योगपती यांनी स्वच्छता मोहीमेसाठी शासनाला दरवर्षी आर्थिक मदत पुरविली पाहिजे.आपल्या आजूबाजूला असलेले तलाव,नदी,ओढे,तळी स्वच्छ करण्यास प्रोह्त्सान दिले पाहिजे.स्थानिक सरपंच नगरसेवक,आमदार,खासदार यांनी याकामी दरवर्षी निधी उपलब्ध करून आपले काम चोख व प्रामाणिक करावे.जलसुरक्षा यावर आधारीत जो विषय आहे त्यात प्रात्यिक्षिक राबवून सामाजिक उपक्रम राबवून आजू बाजूला परिसर स्वच्छ केल्याचा प्रत्यक्ष पुरावा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन विभागातील अधिकारी यांच्या सह्भागातून सादर होणे गरजेचे आहे.सामाजिक मंडळानी यात दरवर्षी सहभाग असावा.अशाप्रकारे स्थानिक व देशपातळीवर शासनाने पुरस्कार देऊन देशकार्य करणारे,स्वच्छतेचे व्रत घेऊन परिसर स्वच्छ करनार्या विश्वासू व्यक्तींना व त्यांच्या मंडळाना स्वच्छतायोद्धे पुरस्कार देऊन गौरव करावा.तसेच स्वच्छता राखणे फक्त शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक भारतातील नागरिकाची आहे.आपला परिसर आपली स्वच्छता ही नैतिक जबाबदारी असली पाहिजे.आपला जलसाठा आपले आरोग्य आहे.ते स्वच्छ,शुद्ध ठेवण्याची जबाबदारी स्थानिक ठिकाणी राहत असलेल्या प्रत्येक माणसाची आहेत.त्याला जबाबदार आपण सर्वजण आहोत.त्यासाठी पाणी दूषित करणार्याविरुद्ध आवाज उठविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.त्यासाठी शासनाला व प्रसारमाध्यमाला माहिती देण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरीकाचे आहे.नद्या स्वच्छता प्रकल्प यावर जास्तीत जास्त निधी राखीव असला पाहिजे.नद्यापात्रांचं बांधकाम होणे गरजेचे आहेत.नद्यांच्या अंतर्गत जलसुरक्षा फार मह्त्त्वाची आहे.तसेच पाण्याची बचत हा महत्त्वाचा भाग आहे.पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.पावसाळ्यातील पाणी 

अडवा व जिरवा ही मोहीम राबविणे जरूरीचे आहे.प्रत्येक कुटूंबाने पावसाळ्यातील पाणी साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.अनेक ठिकाणी छोटे छोटे बंधारे बांधून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी साठविले पाहिजेत.पाणी वाचवा,देश वाचवा.पाणी वाचवा,मानव वाचवा.हे प्रत्यक्ष कृतीतून घडले पाहिजे.सरकारी पाणी गाव व शहरात पोहचले पाहिजे.त्यामुळे बोअरवेल आपोआप कमी होतील.जमिनीत पाणी राहिल.ते पाणी सर्वानाच वापरता येईल.कोणतेही गाव व शहर सरकारी पाण्यापासून वंचित राहू नये.त्यासाठी पाणी सुरक्षा ही आपली नैतिक जबाबदारी आहे.


Rate this content
Log in