बेरोजगारी आणि उद्योगधंदा
बेरोजगारी आणि उद्योगधंदा
देशात अनेक संकटे येतात.त्यामुळे खाजगी क्षेत्रात अनेक तरुण नोकरी गेल्यामुळे बेरोजगार होतात. तरुण वर्ग चिंताग्रस्त होता.वैफल्यअवस्था येते.अशा परिस्थितीत न डगमगता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे.त्यात ग्रामीण भागातील भूमीहीन असतील.त्यानी जवळच्या
शहराकडे धाव घेतली पाहिजे.महाराष्ट्र असे राज्य आहे या राज्यात बाहेरील ऐंशी टक्के परप्रांतीय फक्त छोट्या उद्योग व्यवसायावर पोट भरत आहेत.ते लोक आपले हजारो किलोमीटर असलेले राज्य सोडून महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी येतात.ते लाजत नाही.त्यामुळे त्यांचे स्वत:चे आलिशान घर आहे.स्वत:ते शेठ आहेत.ते कष्ट करतात; पण गुलामासारखे जीवन जगत नाही.ते आपल्या सोबत चार मित्रांना आणून एका खोलीत एकत्र राहतात.त्यामुळे खोली भाडे,लाइटबील,किराणा यात कमी पैसे लागतात.त्यांच्यात एकी दिसून येते.त्यात कोणी धंदा करतो तर कोणी खाजगी नोकरी करतो.
याउलट परिस्थिती मराठी माणसाची आहे.नोकरी गेली की तो चिंताग्रस्त होतो.नाउमेद होतो.त्याचवेळी त्याच्यासाठी धंदा करून पोट भरण्याची फार मोठी संधी चालून येते.पण ते तो करत नाही.मग तो व्यसनाधिन होतो.दारू पितो.जुगार खेळतो.बाई घरकामाला जाते व तो घरी राहून तिच्या जीवावर पोट भरतो.एखादे छोटेसे वडापावचे दुकान ,चहाची टपरी,एखादे भेळीचे दुकान सुरू करायला काही हरकत नाही.पण हो हे करतांना त्यांना जागेची अडचण येइल.अशावेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती,नगरपरिषद नगरपालिका,महानगरपालिका यांनी ह्या बेरोजगार तरूणांना कायदेशीर परवाना दिला पाहिजे.त्यांचा दरमहा जो कर आहे हे सुशिक्षीत तरूण भरतील.शासनाला याचा फायदा होईल.बेरोजगारी कमी होईल.महाराष्ट्रातील जे वडीलोपार्जीत आहेत त्यांना परवाने देण्यात यावे.परिसर स्वच्छ राहिल याचे हमी पत्र व रस्ता रह्दारीचे नियम यात फेरीवाले यांना बंधनकारक असले पाहिजे.यासाठी स्थानिक गरजू,अपंग,विधवा,भूमीहीन,अल्पभूधारक सुशिक्षीत बेरोजगार यांचा सहानूभूतीपूर्वक प्राधान्याने विचार करण्यात यावा.स्थानिक बेरोजगाराना प्रथम संधी देण्यात यावी.
<
p>
त्यासाठी समाजसेवक, सरपंच,नगरसेवक,आमदार,खासदार यांनी प्रामाणिकपणे याकामी गोरगरीब जनतेसाठी पुढाकार घ्यावा.त्यांना न्याय देवून सर्वांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे.शासकीय परवाने फेरीवाल्यांना दिले पाहिजे.त्यासाठी महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगार तरूणांचा विचार करण्यात यावा.महाराष्ट्रातील तरूणानी आळस झटकून आता उद्योग धंदा याकडे वळले पाहिजे.मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य केले पाहिजे.भाषिक,प्रांतीक वाद विसरले पाहिजे.शासनयंत्रणेने मराठी तरूण बेरोजगार वर्गाला सहकार्य करून आर्थिक अनुदान दिले पाहिजे.त्यात अल्पबचत गट सुरू करून सर्वांना त्यात सामावून घेतले पाहिजे.फक्त नातेवाईक,मित्र याशिवाय प्रत्येक सुशिक्षीत बेरोजगार मतदाराला संधी दिली पाहिजे.कोणीही वंचित राहता कामा नये.मराठी तरूणानी हिम्मत न हारता नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे.आता भविष्यात प्रत्येकाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही.;पण भविष्यात आपण खूप मोठे उद्योजक बनू शकता.त्या ठिकाणी आपल्या मराठी तरूणांना कामावर घ्या. त्यांना व्यवसाय शिकवा, धंद्यासाठी प्रोत्साहीत करा.परवाने देतांना स्थानिक मतदाराचा व महाराष्ट्रीयन माणसाचा प्रथम विचार व्हावा.हा कारभार पारदर्शक व्हावा.नि:स्वार्थ भावनेने,मानवता दृष्टीकोनातून,समाजसेवी भावनेतून प्रत्येकाला दोन वेळचे जेवण मिळेल असा आधार व्हावा. सरकारी कुबड्यावर न जगता स्वतः स्वावलंबी बना.
भारतातील सर्व राज्यातील लोक महाराष्ट्रात धंद्यावर जगतात तर मराठी माणूस का जगणार नाही?अनेक संकटे येतील नोकर्या जातील आर्थिक महामंदी येईल म्हणून न घाबरता धंदा करा.स्थानिक लोकप्रतिनिधीनी तरूणवर्गासाठी सहकार्य करावे.त्यांच्यासाठी बेरोजगारांसाठी शाखा उघडाव्या. त्यात हे काम विनामूल्य झाले पाहिजेत.तरूणांकडून त्यासाठी आर्थिक लूट होऊ नये. जागा सरकारी जागेत भाडेतत्त्वावर देण्यात याव्यात.ते भाडे सरकारने घ्यावे.गुंड प्रवृतीच्या माणसाने किंवा लोकप्रतिनिधीने दादागिरीवर आर्थिक वसूली करू नये.शासकीय कर्मचारी व अधिकारी ते काम पाहतील.चला तर मग 'एकमेकां सहाय्य करू अवघा धरू सुपंथ'.