विद्यार्थी जीवनात परीक्षा
विद्यार्थी जीवनात परीक्षा
'शिक्षक,विद्यार्थी आणि शिक्षण' ही शिक्षणाची त्रिसुत्री
आहेत.याला शिक्षणाची साखळी देखील म्हणता येईल.
यातील एखादा घटक जर कमजोर असेल तर शिक्षणा तील मूल्यमापन शंभर टक्के होऊच शकत नाही.ते शिक्षण अधोगतीकडे वाटचाल करत आहेत असे समजावे.यंत्रणा राबविणारी मंडळी अनुभवी,जाणकार असावी.त्यातून राष्ट्रीय उद्दीष्ट्ये साध्य होण्यासाठी परीक्षा ह्या
मूल्यमापनाचा तंत्राचा प्रामाणिक व विश्वासार्हतेने वापर होणे गरजेचे आहे.
विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे.आधुनिक शिक्षणप्रणालीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठरला आहे.त्या विद्यार्थ्याला सर्वांगिण विकास साधणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे व त्यासाठी योग्य त्या परीक्षा साधनाचा वापर केला गेला पाहिजे.शंभर टक्के लेखी परीक्षेचे उद्दीष्ट असावे.कारण काही शाळांत विद्यार्थी,शाळा,संस्था यांच्या गुणवत्ता टक्केवारी साठी वीस गुणांचा तोंडी परीक्षेचा गैरवापर होतो.ते लेखी परीक्षेत समाविष्ट करून मूल्यमापन तंत्राचा कमजोरपणा सिद्ध होतो.ज्या विद्यार्थ्यांना चारओळी लिहिता येत नाही,बोलता येत नाही तो विद्यार्थी हे तोंडी गुण मिळाल्यामुळे उतीर्ण होतो आणि नंतर त्याला साधा अर्जही लिहिता येत नाही.हे कुठेतरी शालेय स्तरावर थांबले पाहिजे.शिक्षणाचे महत्त्व वाढवायचे असेल तर शंभर गुणांचाच लेखी पेपर असावा.
भाषा विषयात तरी तोंडी गुणांचा समावेश नसावा.अन्यथा शिक्षण हे रद्दाड,कंटाळवाणे व निरर्थक राहील.लेखी परिक्षा म्हणजे शिक्षणातील जीवंतपणा आहे.त्याचे विद्यार्थी जीवनात फार मह्त्त्व आहे.कोणत्याही विद्यार्थ्याचे मूल्यमापन करायचे असेल तर शंभर टक्के लेखी परीक्षेशिवाय पर्याय नाही.आज जी स्पर्धापरीक्षेची जी वेळ ओढवली ती परीक्षेतील कमकुवतपणाचे लक्षण दर्शविते.मूल्यमापनतंत्र जर योग्य असेल तर अशी वेळ येत नाही.गुणवत्ताप्रमाण शंभर टक्के च्या वर कधीच जाणार नाही.आज सर्व सामान्यविद्यार्थी शाळाशाळांत पंच्यानव ,श्यानव टक्के गुण घेतो.याचा अर्थ काय समजायचा?पूर्वी ही टक्केवारी राज्यस्तरावर होती.गुणांचे मुल्यमापन लेखी परीक्षेत शंभर टक्के होते.अभ्यासक्रमात आता भाषा विषयात घटक नियोजनात घटकाचे तुकडे,तुकडे केले.सृजनशीलता,आवड,अभिरुची ह्या गोष्टी हळूहळू कालबाह्य होऊन शिक्षण निरस होईल.शंभर गुणांच्य
ा लेखीपरीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न,दिर्घोत्तरी प्रश्न.निबंधवजा प्रश्न,निबंध,पत्र ,मुद्द्यावरून गोष्ट,उतार्यावरून प्रश्न,कवितेच्या ओळी व व्याकरण हे इयत्ता पाचवी पासून ते दहावी पर्यंत असावे.व्याकरणाशिवाय भाषा जीवंत राहू शकत नाही.अभ्यासक्रमात प्रत्येक भाषेत व्याकरण हे असलेच पाहिजे.तरच श्रवण,वाचन,संभाषण,लेखन ही कौशल्ये आत्मसात करता येईल.यासाठी नियमित शाळा असावी.पटसंख्या दररोज शंभर टक्के कसी राहील याकडे लक्ष देऊन अध्यापनाचा व अध्ययनाचा मेळ बसवला पाहिजे.
लेखी परिक्षा विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्याची फार विश्वासाहर्य यंत्रणा आहे.जगातील सर्वात महत्त्व याच यंत्रणेला आहे.बुद्धिमत्ता व बौद्धिक कौशल्य यातून अजमवता येते.त्यासाठी अभ्यास,शोधकवृत्ती असायला पाहिजे.यात काठीण्यपातळी सुद्धा मह्त्तवाची आहेत.यांत हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन राष्ट्रीय पातळीवर संशोधनात प्रवेश देता येतो.हे तर खरे शिक्षणातून साध्य व्हायला हवे आहे.गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळायला पाहिजे;पण दुर्दैव असे की त्यांनाही स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते.विद्यार्थी लेखी परीक्षेमुळे बौद्धिक विकास साध्य करू शकतो.लेखी परीक्षा ज्यावेळी शंभर गुणांची होते त्यावेळी विद्यार्थी वर्ष भर वाचन,चिंतन,मनन करत असतो.स्वयंशिस्त,नम्रता,आदर हे गुण वाढीस लागतात.लेखी परीक्षा व मूल्यमापन सरकारी यंत्रणेत नि:पक्षपातीपणे झाले पाहिजे.त्यासाठी उत्तम व्यवस्थापणाची गरज आहे.
तोंडी परिक्षा ह्या इयत्ता नववीपर्यंत ठिक आहे;पण दहावी नंतर त्याचे गुण भाषा विषयात ग्राह्य धरू नये.त्यामुळे शिक्षणाचे व विषयाचे शंभर टक्के मूल्यमापन होणार नाही.गुणवत्तेचे प्रदर्शन होईल.ती गुणवत्ता कुचकामी ठरेल.म्हणून विद्यार्थी जीवनात परीक्षेला फार मह्त्त्व आहे.परिक्षा नाही तर शिक्षण नाही.शिक्षण नाही तर देश विकास नाही.विद्यार्थी घडवायचे असतील तर लेखी परीक्षा असलीच पाहिजे.अन्यथा शिक्षणातील मृतवतपणा जाणवेल.अनगोंदी कारभार होईल.बळी तो कानपिळी अशी परिस्थिती निर्माण होऊन शिक्षणाचे बाजारीकरण होईल.देश अराजकतेकडे झुकेल.परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत असल्यामुळे त्यात संस्कार,संस्कृती,राष्ट्रीयमूल्ये,यांचा समावेश असतो.शिक्षणा ला वाघिणीचे दूध म्हणतात तर त्या वाघिणीला चारापाणी घालण्याचे काम परीक्षा करतात.