ANJALI Bhalshankar

Abstract

2  

ANJALI Bhalshankar

Abstract

प्रश्न?

प्रश्न?

3 mins
188


माझ्यावर लोक हसतात, कधी अर्थातच समोर नाही कधी कुठून तरी ऐकायला मिळतं मला. माझ्याच विषयी जे मलाही माहीत नसतं ते सार लोक माझ्यासाठी बोलतात.जे ऐकुन मलाही हसू आवरत नाही. जस की हि ऐकटी कशी रहाते भूतासारखी. !दार बंद करून ऐकटिला झोप तरी कशी येते. ?भीती नाही का वाटतं.?मग ही काय काम करते. सतत कांही वाचत किंवा लिहीतं काय असतें.इतकं डोक काय चालवायचयं? अर्थात हे मला न ओळखणारांची मतं. कारण एकतर मी माझ्या घरातून बाहेर म्हणजे, वस्तीतलया वस्तीत कधीच, कोणाच्या घरात किंवा दारातही पाय ठेवत नाहीं. कधी छान तयार वगैरे, जसे की बरयाचशा बायकांच्या आवडीचा छंद मेकअप,साडी वगैरे गोष्टी पासून दूर म्हणजे अगदी नाही म्हणजे नाही याच कॅटेगरीत आहे मी. मग माझं साधं रहाणं मला अशिक्षीत अडाणी बनवून जातं त्यांच्या नजरेत, ज्यांच्या साठी भारी कपडे नव्या नव्या स्टाईल,ची किवा मेकअप वगैरे म्हणजेच जगणं आहे.अर्थात अपवाद आहेतही अगदी थोडे. बाकी प्रश्न कमी नाहीत नजरांचे.नाही!

ईथ संपत नाही !पुढे, माझ्या, मुलांना शिकविणयावरही कंमेट आसतातच अर्थात ही पोर वस्तीतलीच कदाचित् त्यांच्या म्हणजे बोलण्यारयांच्या नातयातलीही आसू शकतात तरीही, कशी काय फुकटात शिकवतं बसते हिला काही काम नाही का? म्हणून छोटी छोटी पोर जमा करीत असतें. आता त्या मागे, माझा हेतू जो, कदाचित काहींना अहकांरी, किवा बालीशही वाटेल जसे कि, या जगात आपण जन्म घेतला जे काही ज्ञान अगदी थोडके ,व तोकडे,असेलही तरी ही जो काही जगणयातला अनुभव आहे ते सार जातांना म्हणजे या, जगातून जातांना, आपण काय करतो सोबत घेऊन जातो का?मग जे ईथ मिळवलं किंवा साहजिकच, अनुभवान, जगण्याच्या, वाटेवर आयुष्याच्या पदरात जे जे दान पडलं ते ईथले ईथेच ज्यांना पुढील आयुष्यात, कदाचित काही निमिशमात्र तरी ऊपयोगी होईल म्हणून लीहीणयाचा, शिकविणयाचा प्रयत्न करीत राहिलो तर काय चुकीचा विचार आहे का ? पंरतु हे फकत माझें विचार माझ्या वैचारिक कुवतीईतके. बाकी बुद्धी किंवा विचार वैचारीकता माणसांच्या ईतराविषयींची जी मते काही लोक ठरवित असतात. कसलीही शहानिशा न करता अगदी सहजतेने कोणाविषयी किंवा खास करून ऐकाकी आयुष्य जगणारया स्रीया विषयी बरेचशे तर्क वितर्क करीत असतात त्यावरून अशा लोकांच्या मेंदूची, व त्यातील पोरकट विचारांची किव येते राग नाही येत.!कारण वस्तीत सारे आजवरचे आयुष्य गेल्याने इथल्या विचारांची पातळी बरयापैकी समजता आलीय.

सरळ मार्गी चालणयाचे फायदे मात्र खुप आहेत ईथ मी सुरक्षितच आहे तोपर्यंत जोपर्यंत मी माझे,चारीत्र व प्रतिमा माझ्या एकाकीपणासोबत घट्ट व खंबीरपणे जपत राहीन आणि खरे तर तीच कोणत्याही स्त्री ची खरी ताकत व शस्र असतं मग ती झोपडपट्टीत राहो वा महालात राहो. अन्यथा ऐक चुकुन नजरचुकीने झालेली डोळयांची साधी हालचाल ही ईशारा, समजणारे कमी नाहीत जगात. मग नजरेला तलवारीची धार आसललाच हवी ना! जेणेकरून पुढचा संघर्ष किंवा नाहक त्रास होणारच नाही.मग मी किंवा कोणतीही स्त्री एकटी कशी रहाते ?वगैरे वगैरे प्रश्न लोकांना पडनारच नाहीत.अर्थात तितकी विचार प्रवृत्ती ही असायला हवी ना?हे सारे अनुभव, किंवा यापेक्षाही वाईट गंभीर, निरनिराळ्या अनुभंवाना कितितरी एकट्या रहाणारया स्री या रोज सामोरी जातच असतील. जग नाही बदलू शकत आपण बदलनयाची अपेक्षा ही नाही. आपलीच नजर बदला कोणी आपल्याकडे रोखून पहात असेल, तर खाली मान घालून लाजेने मुरडणया पेक्षा सरळ जाब विचारा अगदी नजरेच्या कटाक्षानेच. न बोलता! ते म्हणतात ना समजने वाले को ईशारा काफी है. पहा कोणिही वाट्याला नाही जाणार.वळूनही नाही पहाणार मग छळ,अन्याय,अत्याचार ही तर दूरची गोष्ट हे सारं विश्लेशन मी एकटी कशी रहाते? (प्रातिनिधिक ऊदाहरण फक्त) या सहज वाटणारया, परंतु काळजावर घाव घालणारया प्रश्नांचे उत्तर! त्या सारया शंकासुरामुळेच सुचलेल. त्यांचेच आभार ज्यांच्या संशयी, नजरांनी व प्रश्नांनी लिहायला व मला माझ्या बद्दलच, जास्त समजून घ्यायला मदत झाली! बाकी विचारांची,ईतकी बाजी लावण्या ईतके महत्त्वाचे नककीच नाही आहात तुम्ही लोक.जे दुसर्यांच्या आयुष्याकडून उत्तरांची अपेक्षा करताना स्वताच्याच आयुष्याची दीशा भरकटतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract