Sarika Jinturkar

Abstract

4.3  

Sarika Jinturkar

Abstract

प्रश्न

प्रश्न

3 mins
138


मानव हा बुद्धीमान व प्रगतीशील प्राणीप्रश्न, उत्तरांची साथ तयास गात राहतो जीवनगाणीजगात लागणारे सर्व शोध आणि अविष्कार प्रश्नापासूनच सुरू होतात.. आपल्याला एखादा प्रश्न पडणं आणि  प्रश्न विचारता येणं हे तेवढेच आवश्यक आहे...  शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करीत असताना बघून आपल्याला असे लक्षात येते की त्यांचं सगळं लक्ष हे प्रश्नाच उत्तर शिकण्यावर असतं  खरंतर पाठ करण्यावर केंद्रित झालेलं असतं. शालेय शिक्षणाची कल्पना, अनुभव हे सगळे "उत्तर येणे" या एकाच गोष्टी भोवती फिरत आहे..पण... प्रश्नाचं काय....??? स्वातंत्र्य विचार करणे, विश्लेषण करणे, सर्जनशीलता नैतिक मुले या सर्व क्षमतांची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे प्रश्न विचारता येणे....? एखादी घडलेली गोष्ट, एखादी घटना का...? कसे...? त्यामागील तात्पर्य काय...? अशा अनेक गोष्टी... प्रश्न उद्भवल्यामुळे प्रश्न विचारल्यामुळे कळतात...समजतात... शालेय जीवनात तर प्रश्न विचारणे आवश्यकच आहे...  


पण प्रश्न पद्धतीचा शिक्षण पद्धतीमध्ये समावेश फार कमी प्रमाणात केल्याचे आपणास दिसून येते... नवीन काही शिकण्याची आवड, उत्सुकता या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये असतातच. त्यांच्या आवडीकडे नीट लक्ष देऊन मुलांना चांगले प्रश्न विचारण्याचं कौशल्य त्यांना काही त्याच्यापासून नवीन काही शिकता येईल, शंकेचे निरासन करता येईल. शंका विचारणार वेगळं( ते तर यायलाच हवं) आणि योग्य चांगले प्रश्न विचारता येण वेगळं... प्रश्न विचारण कौशल्य ... त्यासाठी सामूहीक गट वैचारिक चर्चा....विविध उपक्रम राबून चांगले योग्य प्रश्न विचारता येणार, अशी संधी त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, ही सध्या काळाची गरज आहे... असे मला वाटतं ...असो....दैनंदिन जीवनात आपण आपलाच बघितलं तर ...बघा ना...आपल्या जीवनात आपणा सर्वांना प्रत्येकी अनेक प्रश्न पडत असतात काही प्रश्नांची उत्तरे मिळवून जातात तर काही तसेच मनात दडून राहतात.. भविष्याचा विचार करावा तर प्रश्न येतोच माझ्याकडून सगळं सांभाळून घेणं होईल की नाही जबाबदारीचं ओझं माझ्याकडून उचलले जाईल की नाही  एक ना अनेक प्रश्न आपल्याला सतत पडत असतात  


कधी स्वतःलाच मनाला विचारून तर कधी संवाद साधून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतच असतो. प्रश्न सुटण्यासारखे असतील तर काळजी करण्यासारखं  काय... आणि ते सुटत नसतील तर विचार करून तरी काय...? नाही का... दिवस हे असेच निघून जातात नेमका आपण कशाचा विचार करतो काही कळत नाही... काही प्रश्न असे असतात ज्यांची कधी उत्तरे मिळत नाही.. पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता कधी प्रश्नच दिशाहीन भटकतात तसेच प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हल्ली समर्पक तरी कुठे मिळतात..... काही कारणास्तव निराश झालो,  पण मिळेल उमेद नवी या आशेत रात्र सरून जाते माझे अस्तित्व तरी काय...? या प्रश्‍नात सारे मी पण विरून जाते ... होतं ना कधी असं...फुलांनाही वाटत असेल कदाचित.... फुलांकडे बघितलं तर बघा ना..... मोगऱ्याला वाटतं मी का नाही गुलाबासारखे रंगानी भरलेला असेल...? गुलाबाला वाटतं मी का..? काट्यासोबत मिरवत असेल ...? रातराणीला वाटतं मी का नाही पहाटे उमलावं? मी का नाही देवाच्या चरणी पडावं? प्रश्नच प्रश्न???? उत्तर द्यावे की सोडून द्यावे या संभ्रमात प्रश्न बदलत राहतात. विचारपूर्वक उत्तर दिले की कधी काळी ते चुकीचे ठरतात आणि कित्येकदा उत्तर देणे हेच उत्तर असते.. 


प्रश्न उत्तरांचे चक्र अव्याहतपणे सुरूच असते  प्रश्न विचारणे, विचार करणे ,संभ्रम उत्तर देणे, पुन्हा संभ्रम या बदलत्या घटनाक्रमात कमी जास्त होतच राहते आयुष्यात हे चालतच राहते.... जसे प्रश्न विचारणे गरजेचे आवश्यक आणि एकाच प्रश्नाचे अनेक उत्तर असू शकतात तसेच एकाच उत्तरा मागे अनेक प्रश्नही कधी असू शकतात.... कधी कधी तर उत्तराच्या शोधात प्रश्नही येतात पायदळी  उत्तर राहते प्रतीक्षेत आणि नुसती शंकांची मांदियाळी  प्रश्न असंख्य,अगणित शब्दांपासून तर अस्तित्वापर्यंत प्रश्नच प्रश्न...??  शब्दांचे उत्पत्तीचे, कधी मनाच्या अल्याड, वास्तव्याच्या पल्लाड सहज विचार करत असताना... आज मनाला प्रश्न पडला खरच स्त्री-स्वातंत्र्य झाली का....? कोणतेही काम ती आज परवानगीशिवाय करते का.. मुक्तपणे भावना व्यक्त करते का...आहे का अधिकार तिला ....क्षणाक्षणाला ती आपले मन मारते समजून घेत का कोणी तिलाकरते आयुष्यात प्रत्येक अडथळ्यांवर मात खरंच मिळतं का स्वातंत्र्य तिला उभ्या आयुष्यात ... स्त्री शिकली प्रगती झाली असा म्हणतो समाज किती पुढारी स्त्री झाली, खरंच स्वतंत्र झाली का ती आज...? हा प्रश्न भेडसावतो मनास मूठभर स्त्रिया शिकल्या, स्वतंत्र झालेल्या... बाकी स्त्रियांचा काय....???असे कित्येक प्रश्न मनाला पडतात.. 

उत्तरे अनुत्तरित सृजन मन घालमेलीत विसावते थोडे समाधान ओंजळभर सुख पदरात रंग गंध गोजिरे स्मितहास्य घेऊन ये जीवन हे नटले  म्हणून मनाला कधी दिलासा ही देतात...मग वाटतं... खरंच आहे का माझा लेखणीला अर्थ...? हे शब्द करतील का माझे जीवन सार्थ...? आयुष्याचे कोरे पान लेखणी सप्तरंगी करेल का..? नेहमीच एक नवी उमेद लेखणी देईल का?????  


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract