STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

2  

Sarika Jinturkar

Others

शेवटी आत्महत्याच का..?

शेवटी आत्महत्याच का..?

3 mins
126

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी कित्येक शूरवीर, समाजसेवक,क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.. आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहे. संविधानाने आपल्याला काही अधिकार, हक्क दिले आहे. त्याचा उपयोग आपण करत आहे...बरोबर ना...एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. आपण आपलं आयुष्य मनसोक्त जगू शकतो..आणि आयुष्य खूप सुंदर आहे... सर्वांनी मनमुराद जगावं..  

एकमेकांची सुखदुःखे आपणच

 एकमेकांना कळवावी कधी 

आपल्या आवडत्या व्यक्तीकडे

 मन मोकळं करून बघावं...


 खरंच मन मोकळं करायलाच पाहिजे ... सध्या सभोवतालची परिस्थिती बघतांना कितीतरी दुखद बातम्या कानावर येतात.. नैराश्य, अपयश, भीती, मनावर झालेला एखादा आघात.इ. गोष्टी जीवनात घडल्या की आत्महत्या हेच एक टोकाच पाऊल उचलले जाते. आलेल्या परिस्थितीला तोंड न देता केवळ नैराश्य मुळे हे कार्य घडते व कितीतरी लोक आपला जीव गमवतात...व या घटना मनाला सुन्न करतात..आत्महत्याच का...? कशासाठी... काहीच मार्ग सापडला नसेल का सुचला नसेल..कोणी साथ दिली नसेल..हतबल झालात...असे कितीतरी प्रश्न पडतात..कुटुंबाची अवस्था बघून नकळत डोळ्यातून अश्रू ओघळतात... 


दैनंदिन जीवनात आपण अनेक लोकांच्या मध्ये राहतो, मग व्यक्ती आपल्या जीवनात इतका एकटा कसा काय असू शकतो..? का असं कोणी नसेल का? काही नसतं का? की ज्या व्यक्तीकडे आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकू... जीवनात काही समस्या, अडचणी आल्या तर त्यांना सांगू शकू.. असं कोणतं दुःख जे आपल्या सुंदर आयुष्याच्या पुढे येऊन उभे राहणार व आपले जीवनच संपवणार..

 

खूप काही शिकवून जातात ह्या घडलेल्या घटना...😢कुटुंबात आपल्याला भरभरून स्वातंत्र्य दिले जाते आपले बालपणापासून सर्व हट्ट लाड पुरविल्या जातात अगदी परिस्थिती नसेल तरी हि आई वडील आपल्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी अहोरात्र मेहनत करतात..पण वाढत्या आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता ही समाज व देशापुढील एक गंभीर समस्या दिसून येते.आत्महत्या हा शेवटाच उपाय म्हणून तरूण मुले ही हा पर्याय निवडतात..शेतीचे नुकसान झाले, कष्ट करून काही उपयोग नाही ...आता सर्व संपले...म्हणून कित्येक शेतकरी आत्महत्या करतात...


प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख दुःखाचे प्रसंग येतच असतात. काहीजण बोलून व्यक्त होतात. काहीजण आपल्या मनात साठवून ठेवतात. कितीही दुःख असले तरी दिसू देत नाही मनातील भाव मनातच ठेवतात.. ओठावर नेहमी हसू ठेवतात. मला एवढंच सांगावसं वाटतं. दुःखाची दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात... वेळ मिळेल तेव्हा हसत राहावं कारण आयुष्य प्रत्येक वेळेस स्वतःहून हसण्याची संधी देत नाही त्रास देणारया गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर चांगल्या गोष्टी आपोआप घडतात...

आपले विचार भावना व्यक्त कराव्यात आपल्या जवळच्या आपुलकीच्या व्यक्तीजवळ बसून मन मोकळं करावं नाही जमलं तर आपले विचार भावना कागदावर उतराव्यात कारण आपल्या मनातील भाव प्रत्येकाने व्यक्त केलेच पाहिजे..

 

व्यक्त झाल्यामुळे मनावरील विचार व भावनांचे ओझे नक्कीच कमी झाल्यासारखे वाटणार.. जगताना आपण कसे जगावे याचा पहावा थोडा विचार करून जीवन आहेच एक संघर्ष प्रयत्न केला तरच होईल उत्कर्ष मानव जन्म पुन्हा मिळणार नाही म्हणूनच निश्वास जगा जीवन आहे क्षणभंगुर त्याचा सदुउपयोग करून बघा व्यक्त व्हा मनातील भावना एकमेकांना नक्कीच कळवा जीवनाच्या वाटेवर न डगमगता न घाबरता अविरतपणे चालण्याचा प्रयत्न करा काही अडचणी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कदाचित योग्य मार्ग निघेल पण ...

 

जीवनात कधी हार मानू नका... प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळेल हसत रहा, मन व्यक्त करत रहा...परंतु आत्महत्या सारखे कठीण पाऊल उचलून आपले जीवन उध्वस्त करू नका..मानव जन्म अनमोल...पुन्हा मिळणे कठीण..जीवनात सुख असो वा दुःख येतील व निघून ही जातील पण आयुष्य पुन्हा मिळणार नाही..संधी मिळेल फक्त हार मानू नका..प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळेल...शेवटी प्रयत्नांती परमेश्वर...


Rate this content
Log in