कुटुंबातील क्षण
कुटुंबातील क्षण
जीवन... एक अतिशय सुंदर शब्द...
जो याला जसे जमेल जेवढ्या कोमलतेने या शब्दाला हाताळेल तेवढ्याच अलवारतेने ते खुलेल,बहरेल....
मानव एक समाजशील व बुद्धीमान प्राणी...मानव ज्या समाजात राहतो तो समाज निरनिराळ्या नावरूपांच्या लोकांनी मिळून बनलेला आहे..
त्याप्रमाणेच "कुटुंब " हे प्रत्येक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..तो आपल्या कुटुंबाशी एका रेशमी बंधाने बांधलेला असतो.
हेच रेशमी बंद असतात जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेमाचे.. 'प्रेम' किती लहान शब्द केवळ अडीच अक्षरांचा पण किती खोल जीवनव्यापी आणि सुंदर वाटतो ना,
हा शब्द आपल्याला, आपल्या कुटुंबाशी पक्के राहण्यास मदत करतो, नाती, लोक यांना जोडण्यात कारणीभूत असतो. ही प्रेमाची नाती, त्याचे बंध प्रेमाच्या ओलाव्यानेच तर उमलतात नात्यांचे मखमली पदर.. प्रेमाने हळूवार उकलताना जेव्हा एका नात्याची दोर अधिक घट्ट बनते तेव्हा ती नाती अधिक जवळ येतात तेव्हा जीवन सुंदर, स्वर्गमय होतं...
या सर्वच नात्यात सर्वात महत्त्वाच आणि मूलभूत नातं ठरतं ते माता-पित्याच त्यांच्या पाल्याशी... हे एकच नात अस असतं ज्यामुळे जीवनाची एक नवीन कळी उमलते. याच नात्याच्या उबदार जागेत ती कळी फुलते, बहरते.. हे नात या जगात सर्वात दृढ आणि पवित्र मानले जात...
आजवर ज्या घरट्याच्या चार भिंतींनी आपल्याला जगाच्या तमाम संकटापासून सुरक्षित ठेवलं, चार दिवसांनी आपण पंख फुटले म्हणून घरट्याबाहेर झेपावतो परंतु या पंखात बळ देणार्या त्या शक्तीपीठाला विसरून कसे चालेल बरे?आज नात दुल॔भ होत चाललंय....असे दिसून येते...म्हणूनचं
आज कुटुंब बद्दल काही सांगावसं वाटतं...
चार-दोन दिवसांपूर्वी आणि तेवढ्यापूर्तीच अस्तित्व असणाऱ्या नात्यांची उंची आपल्या आई-वडिल आणि कुटुंबाच्या प्रेमा ऐवढी नक्कीच नसते.. किती झालं तरी नाती, त्यांच्यातलं प
्रेम जेवढ निखळ,
निर्मळ असतं तेवढं कशातच कुठल्याच नात्यात नसतं..
कुटूंब व नात्याचे ॠणानुबंध आपल्या प्रत्येक श्वासासोबत प्रत्येक रक्ताच्या थेंबासोबत बांधलेले असतात,कुटुंबासोबत घालवलेले क्षण अविस्मरणीय असतात...मग ते सुखाचे वा दुःखाचे..एकमेकांना दिलेली साथ महत्वाची ठरते..
खरेतर हीच नाती आपण जपावीत आणि त्या नात्याचा प्रत्येक पैलू प्रेमाने उलगडत न्यावा.. मग ऋणानुबंधाच जाळ एवढं सुलभ वाटायला लागतं की त्याबाहेर पडावं असंच वाटत नाही त्यातून जे स्वर्गीय सुख मिळतं त्यापुढे अमृताची गोडी फिक्की पडते..कारण केव्हा तरी कुठे तरी मन होत हळूवार
तेव्हा कुटुंबासोबत उघडतयं आपल्या भावनेचं दार....
म्हणूनच जोडा ही काहीशी दुरावली, दुखावलेली नाती साधा तो बंद जीवनाला बांधून ठेवेल.. रेशीमजाळ्यात... करा स्वर्ग निर्माण घरातच, मिळवा गंधोदकजलाच पावित्र्य त्या मातापित्यांच्या सेवेत आणि शेवटी पहा एकदा आपल्या आयुष्याकडे वळून नकळतच उमटतील शब्द
हो मी जगले कुटुंबासोबत आयुष्याला, ना तर केवळ वावरले या जगी...
कुटुंब आपल्यासाठी कधी कोवळ उन,
तर कधी थंडगार सावली आहे
कधी ओठावरचे हसू तर
कधी गालावर पडणारी खळी आहे
कुटुंबामुळे आपल्या जीवनात ,
प्रत्येक क्षणी आनंदाची सर आहे..
" कुटुंब" म्हणजे आयुष्यातल हळूवार असं कोडं ,
जमलं तर विश्वासाने अनुभवून बघा थोडं,
कुटुंब रंगलंय घरात, जस लाॅकडाउनच्या काळात , अगदी तसचं
लाॅकडाउन संपल्यावरही कुटुंब रंगवाचं प्रत्येक घराघरात...
कुटुंबाचं प्रेमच राहील एक नवा वाटणारा थरार, मृगजळाचा भास आणि आभासांचा करार....
गजर असतांना आपल्याला
कुटुंबचं तर देईल आधार... बरोबर ना..