माझी आवडती मालिका
माझी आवडती मालिका
"झी मराठी" वाहिनीवर नुकतीच "माझी तुझी रेशीमगाठ" मालिका सुरू झाली ही मालिका सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.. अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका.. मालिकेचा पहिला दिवस आणि या मालिकेचं कथाकथन कसे असणार..? याची उत्सुकता लागली होती. मालिका सुरू झाली,पहिला दिवस मालिकेचा व दमदार सुरूवात झाली. हळूहळू त्याची आवड होऊ लागली, कथानक त्यातील पात्र व त्यांची पडद्यावरील विशिष्ट अशी भूमिका मनाला स्पर्शून गेली कारण ही मालिका आहे 'एक मुलीगी असलेल्या आईची आणि तिच्या नाजूक भावनांची'..
नेहा व परीची...नेहा एक हुशार, मनमिळाऊ गोड, उत्साही थोडी हळवी, प्रसंगी कणखर,सर्वसाधारण अशी.. जीवन संघर्षमय असूनही जीवनातले सगळे क्षण आनंदाने भरभरून जगणारी,साधी राहणी उच्च विचारसरणी असलेली. कोणालाही सरळ हाताने निस्वार्थपणे मदत करणारी अशी तिची व्यक्तिरेखा..पण नशिबाचे भोग आणि नियती हे कुणाला चुकत नाही, असं काही होतं. तिच सगळ आयुष्य पालटून जातं..ती आणि तिची मुलगी परी दोघी आपले जीवन एकमेकींसोबत आनंदाने जगत असतात. एकटी असूनही संसाराचा गाडा समर्थपणे पेलत आपल्या चिमुकलीला ती योग्य ती शिस्त, संस्कार देऊन तिचे व्यवस्थितरित्या पालन पोषण करते. नेहा आपल्या ऑफिसची आणि घरादाराची जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडतअसते...
जीवनात अनेक संकटे येतात, परंतु सहनशीलतेने परिपूर्ण अशी ती सुखदुःखात नेहमी हसत राहते. स्वतःचे प्रत्येक कर्तव्य पार पाडते,आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.. आयुष्यात असणारा खडतर प्रवास ती, दुःख सर्वांनाच असतात पण मला त्या दुःखांना कवटाळून बसायचं नाही त्या दुःखावर मात करत लढायच आहे तसेच अश्या जगण्याचा, लोकांच्या नको ते बोलण्याचा, मला नवरा नसलेली एकटी बाई म्हणून माझ्याकडे बघण्याचा, राग मलाही येतो खूपदा म्हणून मला द्वेषाला खत पाणी घालायचं नाही एक चांगली व्यक्ती बनायच आहे कारण स्वतःमधल्या स्वताला जिंकायच आहे असे सकारात्मकत विचार असलेली ती सदैव व हसतमुखाने आपले जीवन जगते, तिची ती भारदस्त भूमिका आणि संघर्षमय जीवनात ही सदैव ओठांवर असणार हसू बघूनच ही मालिका मला खरचं मनापासून आवडते..आपण ही आपल्या जीवनात एवढंच सकारात्मक राहायला पाहिजे असे तिच्याकडे बघून वाटते,मान्य आहे मालिका व प्रत्यक्ष जीवनात खूप अंतर असतं पण काही गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. सांगायच तात्पर्य एवढेच
मनाला योग्य वाटेल ते कराव अयोग्य वाटेल ते सोडून द्याव.न घाबरता, न डगमगता जीवन आपलं जगावं. हृदयातील प्रत्येक पान उलगडून बघावं. दुसऱ्यांवर आपुलकी प्रेम करायला शिकावं आणि स्वतःसाठी पण थोडं जगायला शिकावं.धागे आयुष्याचे वेगवेगळे विणले जातात सुखदुःखांच्या क्षणात आयुष्य हे क्षणभंगुर असत म्हणून मनमुराद जगायचं असतं जगतांना या जगात🤗आयुष्यात असतात चढ-उतार यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धीलाही मिळते मग धार येथे रडून केलेली सुरुवात इथेच रडूनच झालेला अंत आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास शांत 😊 बरोबर ना..
आयुष्यात अनेक वळण येतात. चांगले वाईट अनुभव येतात. पण परिस्थितीशी दोन हात करत जगायचं , कठीण प्रसंगी ही त्या वळणावर न थांबता योग्य ती गती घेऊन पुढे चालायच अन् एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःमधल्या स्वतःला जिंकायच कधीतरी असंही जगून बघायचं..
