STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

2  

Sarika Jinturkar

Others

प्रेमास अंत नाही..

प्रेमास अंत नाही..

2 mins
95

अनुबंधातून फुलते अन् मायेतून रुजते आपुलकीने रुसते अन जिव्हाळ्याने हसते, श्रावणाच्या सरी सारखं बहरते आयुष्याची बाग फुलवते सतत हसते आणि या हृदयात बसते ते म्हणजे प्रेम... प्रेम जगातील सर्वात जिवंत, नितांत सुंदर गोष्ट. नात्यांच्या पडद्याआडून मानवी मनाला सतत सर्जनाची, सुखस्वप्नांची, वास्तव्याची इंद्रधनुची नगरी म्हणजे प्रेम. जगताना वाटेत साद घालत असते ती मानवतेच्या, नात्याच्या कधीच स्नेहाच्या बंधनातून या नितांत सुंदर गोष्टीला मिळवण्यासाठी, मिळवल्यावर टिकवण्यासाठी, जीवापाड जपून ठेवण्यासाठी व्यक्तिसापेक्ष आटापिटा हा सुरू असतो.

 कधीकधी कळसूत्री प्रमाणे तिच्या तालावर नकळत नर्तन ही सुरू असतं आपलं.कधी कधी तर यातून बाहेर पडणं ही अवघड होऊन जात.अशा आपल्याला सतत गुंतवून ठेवणाऱ्या गोष्टीची म्हणूनच तर दुसरी बाजू असते वेदना. वेदनेशिवाय प्रेमाची पूर्तता नसावी वेदनाच असते प्रेमाचे प्रतीक. जीवाला जीव देण, त्याग यातच समर्पित झालेले असते कुठेतरी प्रेमाची वाट. मग त्या वाटेवर गेलेल्यांना ओढ, आत्मियाता, उत्कटता, आतुरता, हळवेपणा ,हुरहूर या अवस्थांचे खडतर टप्पे पार करावेच लागतात. प्रेम टिकवण्यासाठी अंतकरण ही विशाल असावं लागतं जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नितांत सुंदर निरामय गोष्टीला मिळवण्यासाठी असावं लागतं सहृदय..  

'काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं

 तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं'. काळोखात प्रकाश दाखवणारं वाटेत असं कोणीतरी ज्यांच्यासाठी उभं असतं त्यांचं जगणं प्रकाशमय, सुगंधी व्हाव म्हणून कोणी धडपडत असत. अशा भाग्यवंतांना काय हवं असावं यापेक्षा? त्यांनी अशा वेळी एवढेच करावे ओंजळीत आलेल्या उत्कट क्षणांचे मोती करावे अन् ते जपून ठेवावे हृदयाच्या कप्प्यात. 

प्रेम म्हणजे नेमकं असतं तरी काय?'प्रेम म्हणजे आशा हृदयातला हृदयाला कळणारी भाषा

 प्रेम म्हणजे स्वप्न पापण्यांच्या झुल्यावर जिवलगाला जपणं'  

प्रेम! त्यातील धुंदी, बेचैनी, अडथळे, इतरांचा विरोध जीवाला जीव देण्याची तयारी या सर्व अवस्था पार करून विजय होतं ते प्रेम. प्रेमिकामध्ये एवढा बळ येतं कुठून? संकटावर मात करण्याचं, जगासी लढण्याचं, जात -पात, धर्म, भाषा यांच्या बळकट भिंती पार करून आपल्या प्रेममयी अस्तित्वाचं निशाण रोवण्याचं प्रचंड बळ देत तेच प्रेमच.  प्रेमात अहंकाराला धारा नसतोच. अहंमपणाचा भाव राहिला तर अपयशच पदरी येणार म्हणून समर्पण, त्याग हीच प्रेमाची कसोटी. माझ्यातला "मी" पण समर्पित करणे म्हणजे प्रेम! 

 'सोडून आले माझे 'मी' पण तुझ्या दिशेने कलताना

 दुःख देखणे होऊन गेले काट्याआडून फुलतांना  

अशी समरसता, एकरूपता तेव्हाच लाभते जेव्हा अहंकाराची पिसे गळून पडतात. प्रेम कोणत्याच मोजमापाने तोलता येत नाही, शब्दात बांधता येत नाही ते धरता येत नाही चिमटीत किंवा पकडता येत नाही ओंजळीत.. 

 प्रेम चंचल पात्यासारखं, स्वच्छ निर्मळ झऱ्यासारखं आभाळ मेघांची वाट पाहत नाचणाऱ्या मोरासारखं. बरोबर ना...शेवटी एवढेच

 'जगणे पुरेल इतके मरण्यात खंत नाही 

पावलो असे भरुनिया प्रेमास अंत नाही

 मागे कोणी नाही याची आता कशास चिंता

 विस्तारलो असे की काही उणीव नाही' असं दुःखाच फूल करत ते प्रेम...खरंच प्रेमास अंत नाही.


Rate this content
Log in