Sarika Jinturkar

Others

4.2  

Sarika Jinturkar

Others

न्युक्लिअर फॅमिली

न्युक्लिअर फॅमिली

4 mins
304


न्युक्लिअर फॅमिली.... प्रश्न..... व त्यावरील तोडगा...आज सभोवतालची परिस्थिती बघतांना स्वातंत्र्य उपभोगतांना ही समस्याच झाली आहे असे कुठेतरी जाणवते.व त्याचे चांगले वाईट अनुभव येतात या विषयाशी निगडित मला अशाच एका विषयावर लिहावे असे वाटले ते म्हणजे संयुक्त ते विभक्त कुटुंब  व आता असलेल्या विभक्त कुटुंबामुळे दुरावलेली नातीपूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती  कुटुंबातील सदस्यांची साथ होती  मायेची ऊब होती  घराला अंगणाची सवय होती  मातीची चूल होती  संसाराचा भार कसा सगळे मिळून उचलत होते  एकमेकांच्या आवडी-निवडी सगळे सांभाळून घेत होते  शेजारी पण लोकांमध्ये जिव्हाळा होता  परक्याचाही आपलेपणा होता  घरी आलेला प्रत्येक पाहुणा जेवल्याशिवाय जात नव्हता  हरवली ती माया हरवली ती नाती  आपलेच आपल्याला माहित नाही आपण जगतो आहोत कशासाठी  शोधावे ते जग कुठे...?


आपलेपणा घरातच नाही राहिला यातूनच विभक्त कुटुंब पद्धतीचा विस्तार झाला  विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली  जीवनाच्या वाटचालीवर अनेक प्रश्न निर्माण करू लागली या न्यूक्लियर फॅमिली मुळे अनेक नाते दूरावू लागली   सर्वत्र संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झालेला दिसू लागला

एकमेकांबद्दल पूर्वीसारखा जिव्हाळा व स्नेह नाही राहिला  कुटुंब फक्त घराण्याच्या नावासाठी एकत्र राहू लागली  ती अंतर्गत कलहाने पोखरली जाऊ लागली  त्यामुळे लहान मुले व एकूणच कुटुंबातील वृद्धाचे जीवन ही कुटुंब पद्धती दुर्लक्षित व अस्वस्थ करू लागली  आज अनेक विभक्त कुटुंबातील पती-पत्नी अर्थार्जनासाठी नोकरी करतात  कोणी उद्योग तर कोणी व्यवसाय करतात  आयुष्यभर सोबत असून एकमेकांच्या जवळ बसून कधी बोलत नाही  एकाच घरात राहून आम्ही एकमेकांना दिवसभर काही दिसत नाही  हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद  काही कारणांनी एकमेकांना दोष देऊन नित्य चाले वाद-विवाद  पहाट झाली की धाव, धाव धावतो आहे दिशा मात्र कळत नाही  हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही  जीवनाचा आनंद घ्यायला जीवन जगायला वेळ नाही  इथं कशासाठी कशालाच कशाचा मेळ नाही  एक क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास अर्ध्यावरच थांबलेला असेल

जीवन प्रवास म्हणून म्हणते अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या आयुष्य खूप सुंदर आहे अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या... खरंतर कुटुंब या शब्दा शिवायच आपले आयुष्य अपूर्ण आहे सुख असो वा दुख असो कुटूंब आहे तर आपण आहेप्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंसं वाटतं कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या आल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंबचं उभ राहतंस्वभाव वेगवेगळे असले कोणी थोड गंभीर, कोणी विनोदी कोणी शिस्तीचं  सगळी दुनिया जरी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमीच तुमच्या सोबत निस्वार्थपणे असतं  आयुष्यात मोठे आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं  आनंदात साथ तर दुःखात हात देतं  आयुष्यातील दुःख घालवणारी आई लहानपणासून समंजस होईपर्यंत सांभाळणारे वडील  जीवनातील संकटे आनंदाने सोडवायला शिकणारे बहिण-भाऊ  आपल्या आयुष्यातील अनुभवांनी सर्वांना सावरणारे आजोबा  आपल्या प्रेमाने माया लावणारी ती आजी या सर्वांनी मिळून कुटुंबाला एक वेगळीच व्याख्या प्राप्त होते आणि कुटुंबातील आईवडिलांची आजी-आजोबांची  सेवा करण नाहीतर काळजी घेणं, त्यांना हवं नको ते विचारणं, कुटुंबातील सदस्यांची सुख-दुःखाची देवाण-घेवाण करून मन मोकळं करणं, आपल्याला जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून राहणं, कमवलेली नाती आणि जिंकलेले मन सांभाळणं , काही झालं तर रुसवा-फुगवा सगळं काही क्षणात विसरून जाणं,  नाती अगदी मनापासून जपणं  तुझं माझं काही नसून सगळ्यांचं सारखं असं म्हणून निभावणं,  यातच खरं सुख आहे ...


ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु एकत्र कुटुंब हे जीवनाचे मूळ आहे, शेवटी कुटुंब हे कुटुंब असते त्यातले प्रेम शेवटपर्यंत असते, तसं तर कोणतीच फॅमिली परिपूर्ण नसते आपण वाद घालतो, भांडतो आपण काही वेळेसाठी एकमेकांशी बोलायचे सुद्धा थांबवतो पण शेवटी कुटुंब ते कुटुंबच असते .. घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही एकत्रित जगणं आणि सगळ्यांची परवा करण याला कुटुंब म्हणतात. कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यातील एक जुटीवरच अवलंबून असतो  सुखानंतर दुख आणि दुःखा नंतर सुख येत पण आपण सतत सुखाच्या शोधात असतो.. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जिवनात दुःख उरलं नसतं दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं सुख-दुःख असतातच वाटून घेण्यासाठी

यशापयश असतात पुढे जाण्यासाठी आई-वडील आजी-आजोबा असतात संस्कारासाठी एकत्र कुटुंब असतं जीवनभराच्या साठी साठी जीवनाचे ऋणानुबंध अलगत जपण्यासाठी मग कामाच्या व्यापामुळे दैनंदिन जीवनात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले तर कसे चालणार..? म्हणूनच  एकमेकांची सुखदुःखे एकमेकांना कळवा निस्वार्थ पणाचा दूर दृष्टिकोन आपल्याजवळ बाळगा हाच यावर असेल खरं तर तोडगा  एकत्र येऊन मिळून-मिसळून उचला संसाराचा गाडा  ठेवा आपसात थोडा आपुलकी आणि जिव्हाळा आपसातील वाद विवाद संपून थोडासा तरी संवाद साधा  दैनंदिन जीवनात धावताना एक तरी पाऊल हृदयाचे हृदयाकडे वळवा  आपुलकीच्या,आपल्या व्यक्तीकरिता थोडासा तरी वेळ मिळवा  


एकमेकांच्या आवडी-निवडी जपा जीवनाला आपल्या डोळे भरून बघा  कधी समजून सांगा कधी समजून घ्या पण आपल्या कुटुंबाला थोडासा तरी वेळ द्या  आपल्या कुटुंबाला मित्राप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना  सुख समृद्धी आनंद आपोआपच आपल्या दाराजवळ येईल  दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ बाळगाव्यवस्थित रित्या त्यांची पण जपवणूक करा  सुखाच्या प्रसंगी नाहीतर दुखाच्या प्रसंगात मात्र आवश्यक धावून त्यांचा मानसिक आधार बना  न्यूक्लियर फॅमिली चा ढाचा आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये बदलता येणार नाही. कदाचित परंतु  कठीण प्रसंगात सुख-दुःखात  विभक्त कुटुंब पद्धतीला संयुक्त कुटुंबा प्रमाणे मानून  नसलेल्या गोष्टीत असलेला आनंद शोधा आपण सुखी आहोत हे मानून नाती जपा  मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसेच शब्दातील गोडवा माणसातील नातच जपून ठेवतो  म्हणून जिभेवर खडीसाखर व डोक्‍यावर बर्फ ठेवा चूक झाली तर मान्य करा घरात प्रत्येक गोष्ट बोला  आपल्या कलागुणांना वेळ द्या दुसऱ्यांच्या कलागुणांचे कधीतरी कौतुक करा  कारण कोणी कोणाला काय द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते या धावत्या जगात चांगले विचार ,उत्तम ध्येय आणि जीव लावणारी माणसं कधीच बदलू नका... 


पैसा, प्रसिद्धी, घरदार, अहंभाव ,संपत्ती या पेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे जीवाला जीव लावा माणुसकी जपा..नात्यांना नसते गरज पैशांची, ओढ असते ती फक्त आपुलकी अन् प्रेमाची म्हणूनच  कुटुंब आणि कुटुंबातील नात्याचं सुंदर रोपटं प्रेमाने जपा  आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या जवळच्या, आपुलकीच्या व्यक्तीसोबत थोडासा वेळ काढून ते मनमुराद जगून बघा ..शब्दांपेक्षा भावनेचा अर्थ कधी तरी समजून बघा  कुटुंबातील मायेचा स्पर्श उबदार नेहमीच देत असतो आपल्याला आनंद ,उत्साह आणि आधार  नात्यात नसेल कुठला ताण हेवेदावे विसरून प्रत्येक जण जपेल जेव्हा सर्वांचा मनापासून मान  माझं माझं न करता नातं आपलं असेल एकमेकांना समजून घेत नातं पुन्हा तेव्हा खुलेल  नातं बनेल दूध सायेच  सदैव छत्र राहील आपल्यावर कुटुंबाच्या मायेचअजुनही वेळ आहे  थोडं तरी आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जगून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. स्वातंत्र्य मिळाले तर त्याचा सदुपयोग करा दुरावले असेल कदाचित नाते तर अलगदपणे त्याला सावरून घ्या जीवन आहे क्षणभंगुर मनमुराद जगून घ्या 


Rate this content
Log in