STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

आठवणी काही..

आठवणी काही..

2 mins
305

दवात भिजलेल्या फुलांच्या पाकड्यांना बिलगून आजचा दिवस उजाडला, धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सूर्यकिरणांना जसा आज मार्ग सापडला.सकाळी अंगणातला पारिजात फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रिते होण्यातल समृद्ध पण तो किती सहजपणे दाखवतो... आज हे थोड जाणवल...काही आठवणी मग त्यासोबत जणू धावून आल्या..

 साधी राहणी उच्च विचारसरणी नित्यनैमित्तिक ईश्वर भक्ती सुरेख अशा पद्धतीने घराची केली तिने बांधणी 

आजच्या तरुणाईला ही लाजवेल त्यांची योग्य व

 व्यवस्थितरित्या विचार करण्याची जीवनशैली व मांडणी ...अशी माझी निरागस,प्रेमळ मावशी.

 आपली आवड आणि काम नेहमीच वेगळं असत. परंतु आपण जर आपल्या आवडीच कामांमध्ये रूपांतर केलं तर, त्यातून मिळणारं सुख नक्कीच अधिक असतं ..बरोबर ना...मावशी पण तशीच...

 हौस दांडगी शिकण्याची

 धडपड नवीन बनविण्याची ..

 तिने केलेली कलाकृती ओळख करून देते तिच्या व्यक्तिमत्वाची....पण दैनंदिन जीवनात एकटेपणा रिकाम्या, खिन्न मनास कधी तरी हवाहवासा वाटतो...तुटून पडलेल्या हदययास मनाशी पुन्हा जोडून जातो..

जीवनात कधीकाळी जीवनाला आकार देऊन दुसऱ्यासाठी कार्य करण्याची ,जगण्याची नवी संधी देऊन जातो....

 आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवले की सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतात..

 कारण तिथे आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःचीच होतो ... आणि सांगायच झालं तर, 

जगणं ठाऊक असणाऱ्यांना, वागणं कसं असावं हा प्रश्नच पडत नाही...तिच वागण शालिन मनमिळाऊ...सर्व काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याची तिची सवय .. म्हणतात ना, व्यापता न येणारं अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व....तिनेही आपल्या कुटुंबासाठी अविरत प्रयत्न केले

 खरंच आहे आईसारखा खंबीर पाठीराखा कोणीच नसतो..तिनेही बघितले आपल्या मुलांबद्दल स्वप्न, व ते मनात उतरवले... आपल्या मुलांच्या सुखद क्षणांना प्रत्यक्षात उतरवले.... नेहमीच प्रयत्न करून ,

यशाची नवीन-नवीन शिखरे सर करायला शिकवले...आता तिचे वय ही झाले.. सुरवातीपासून कष्टात जीवन गेले.आता धकाधकीच्या जीवनात वेळ मिळणे हा तर खरा "सुखाचा सॅशा" अगदी खरआहे...

 ही धकाधकीची दुनिया  

प्रत्येक वेळी असते मनी एक नवी भावना बिझी शेड्युल असले तरी, मनन, चिंतन, नियमित वाचन करून आपण मोकळी करावी ज्ञानरूपी प्रकाशाकडे जाणारी वाट...

 ती ठरेल मग आशेची नवी पहाट... वाटत तिला ही 

 जीवन म्हणजे काय... घ्याव एकदा समजून

 कधी चांगलं कधी वाईट होणारच

 हे आपल्या कृतीवर असतं अवलंबून ...

 म्हणूनच तिने दिला चांगल्या कामाला नेहमी पाठिंबा ...त्यात अडथळा कधी आणला नाही.... नाउमेद होत असेल कोणी तर त्याला थोडं कौतुक करून प्रोत्साहित तर करून बघा... छान फील नाही झालं झाले तर बघा...तिनेही केल असं...तिचे लाडके नातवंड  

जणू काळजाचा तुकडा घगघमे घरामध्ये जसा सुगंधी केवडा ... घरातल्या एवढ्या खोल्या सोडून जिथे नातवंड असेल तिथेच वावराला तिला आवडतं, आणि असं आनंदमय घर खूप छान वाटतं असचं काहीतरी तिच्या वागण्यातून जाणवत... 

आयुष्य तसं असतं खूप छान  परमेश्वराचे आहे एक अद्भुत वरदान भूतकाळाच्या पाठीवर वर्तमानाचे लिखाण 

 भविष्य घडत असतं राखीत  या साऱ्यांचा मान...आयुष्य तसं असतं खरच खूप छान...तिनेही आयुष्य असच जगून संधीच सोन केल ...अश्या कितीतरी आठवणी...ह्रदयापरी जपलेल्या.. 

मावशी व तिच्या आठवणी काही आजही आठवतात ..व काही क्षण मनाला स्पर्शून जातात.. आठवणी ह्या अश्याच तर असतात...


Rate this content
Log in