Sarika Jinturkar

Others

4.0  

Sarika Jinturkar

Others

मी का...? लिहिते..

मी का...? लिहिते..

2 mins
233


आयुष्य हा एक प्रवास आहे.. अनिश्चित, विक्षिप्त असा प्रवास... वळणावळणाच्या वाटेने आयुष्य सुसाट वेगाने धावत सुटलयं. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व सगळ्यांचे हळुवारपणे हातातून सुटत चाललंय.. या प्रवासात अनेक सुख-दुःख चांगले-वाईट अनुभव यश- अपयश येतच राहतात. मनात अनेक भावनिक तरंग भरती आहोटी जणू आणत असतात... त्यांना व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं व्यक्त होण्याचं ठिकाण व्यासपीठ हवं असतं...लेखणीमुळे आपल्याला ते मिळत..

मलाही मिळाल... 

माझ्या मते ज्या गोष्टींची कमतरता आयुष्यात भासते त्याची सर शब्दांनी भरून काढावी ओंजळीतून निसटत चाललेल्या आयुष्याला कधीतरी लिहून बघावं ... आयुष्यातील प्रत्येक क्षण मनसोक्त जगावा व आठवणी सोबत कधी लिखाणातून तर कधी रमून जावून तो क्षण अनुभवावा... 


बालपणीचा रम्य आठवणींचा ठेवा इतरांना सांगण्यासाठी, तारुण्यातील अव्यक्त प्रेम, मित्र मैत्रीणी बरोबर वेचलेला वेळ आकाशाला गवसणी घालणाऱ्या आनंदाला, मलाही हे जग थोडंस समजलं उलगडलं आहे हे सांगण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच यशाला वाचा असते अपयश मात्र मुक असत त्या अपयशाला वाचा फोडण्यासाठी मी लिहिते. काही विलक्षण आनंदी क्षणांसोबत आजही मी जगते.

भावनांची व्याप्ती खूप दूर.. मनातील भावना प्रत्येक जण कागदावर नाही उतरवत आणि म्हणूनच ज्या क्षणी माझ्या भावना मी कागदावर उतरवल्या, मान्य आहे माझं वाचन कमी शब्दसंग्रह देखील कमी, पण मी एक विश्वच निर्माण करू शकते माझ्या सभोवताली.. मुख्य प्रश्नाचे उत्तर.... तर मी लिहिते माझ्या समाधानासाठी... माझं मन मोकळं करण्यासाठी...मनाच्या कप्प्यात साठवलेल्या आठवणींना कधी उजाळा देण्यासाठी...

 विचार मांडण्यासाठी नव्हे किंवा प्रबोधन करण्यासाठी सल्ला देण्यासाठी नाही किंवा कोणाला मार्गदर्शनही मला करायचे नाही. कारण सोशल मीडियावर विचारांपेक्षा अविचारांचे आदान-प्रदान जास्त होत असते आणि इथले विचार वाचून समाज सुधारला असता तर बाकीच्या कुठलाही गोष्टीची गरज पडली नसती असे माझे वैयक्तिक मत. मला जे जाणवत मला जे वाटतं ते माझ्या  लेखणीतून शब्दबद्ध करण्याचा माझा प्रयत्न असतो... बघायला गेलं, तर मी काही लेखन क्षेत्रातील व्यक्ती नाही साहित्य क्षेत्राशी माझा कुठलाही संबंध नाही फक्त वाचन आणि लिखाणाची असलेली आवड...बस्स एवढंच...

 मला वाटत सर्वांनीच कधीतरी

 लिहून बघावं 

 कधी स्वतःसाठी कधी स्वकीयांसाठी 

 सत्याला उजाळा देऊन 

असत्याला हरवण्यासाठी  

मनाची घालमेल थांबवण्यासाठी 

अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी

 माझ्यातला "मी हरवला" का....?त्याला शोधण्यासाठी... बरोबर ना....



Rate this content
Log in