STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

2  

Sarika Jinturkar

Others

माझा तिसरा कप्पा व सुखाचे सॅशे

माझा तिसरा कप्पा व सुखाचे सॅशे

2 mins
190

आयुष्यात धनवान होण्यासाठी एक एक कणाचा संग्रह करावा  लागतो आणि गुणवान होण्यासाठी एकेक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो ... 

आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी देत असतो नकळतपणे आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत पण असतो, म्हणूनच निश्वास जगा हे जीवन आहे क्षणभंगुर त्याचा सदुपयोग करून बघा...

 आपल्या हृदयातल्या कप्प्यातलं प्रत्येक पान उघडून बघा

 स्वतःसाठी पण कधीतरी थोडं जगून बघा...जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगून त्या क्षणांना आपल्या ह्रदयाच्या कप्पा साठवून बघा अन् छंद आपले जोपासून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका....


 आयुष्यात आपली विचारक्षमता, व्यक्तिमत्व, जीवन शैली.. पर्यायाने आपल्या आयुष्याची दिशा ठरवितात खरोखरच मनाला आनंद देणारे क्षण आयुष्यात नक्कीच असावे..

 आयुष्य आपलं असंच असतं  

पानावर तरंगणाऱ्या दवासारखं

 किती त्याला थोपवलं तरी 

हातून सुटलेल्या क्षणांसारखं...


म्हणूनच आपल्या आयुष्यात स्वतःच्या छंदाचा, त्यातून मिळालेल्या  

समाधानाचा तिसरा कप्पा हा असलाचं पाहिजे... त्यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यात 'सुखांचे सॅशे' मिळवता येईल ....


 आयुष्यात मला पटलेली एक गोष्ट,

 उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचे शिक्षण जरूर घेतले पाहिजे, पोटापाण्याचा उद्योग पण जिद्दीने करायचा...पण....

 एवढं करून झालं का? एवढ्यावरच थांबायचं का ?

नक्कीच नाही ....

 साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प,काव्य,लेख लिखाण, खेळ ह्यांतल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवलीचं पाहिजे ... शिक्षण, नोकरी उद्योग तुम्हाला नक्की जगवतील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं? हे सांगून जाईल....

 आपली आवड आणि छंद स्वतःला वेळ देऊन आपण जोपासल्यामुळे परम सुखाचा आनंद आपल्याला नक्कीच येईल...☺️


 म्हणूनच हरवलेल्या ज्या दिशा जीवनात कधी, गवसल्या नाही त्या दिशा स्वतःला वेळ दिला की मिळतात..

 आपल्या मधल्या स्वतःला ओळखून सुखद क्षणांचा आनंद , आपल्या मनाचा तिसरा कप्पा उघडा करून आपल्याला अनुभवता येतो...  

आयुष्य जगायचं असेल तर पाण्यासारखा जगायचं कुणाशीही मिळा -मिसळायचं, एकरूप व्हायचं, पण स्वतःचे महत्त्व, आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही आपल्याला मनाला जे वाटतं ते करायचं... कधी आपली आवडतं कधी आपले छंद जोपासून...


 आयुष्य जगताना दुनियेच्या गर्दीत स्वतःला शोधण्यात होते मी कधी गर्क...

 मग स्वतासाठी वेळ देत लावले जाते तर्कवितर्क...🤔

 चहूकडे दरवळलेला रातराणीचा सुगंध...

 त्यावरील काजळे भासती मज स्वच्छंद ...

बालपणी खेळण्याचा तो छंद  

जरी झाला त्याचा आता अंत...

 मनातील तिसऱ्या कप्प्यात, कधी भान हरवून मनसोक्त खेळण्याचा जोपासते मी माझा छंद...  


सुख वेचीन म्हणण्या आधी

 घन दुःखाचा गहिवरते 

अन दुःख सावरून जाता

 कवडसा सुखाचा घेते ,

या ऊन सावली संगे 

रमण्यात ही मौज म्हणून 

मी हसुनी हल्ली माझ्या

 जगण्याला श्रावण म्हणते,

 मज आवडलेले,गवसलेले 

साहित्य, विषय माझ्या

 लेखणीद्वारे कागदावर उतरवून 

माझ्या मनाच्या कप्प्यातील

 काव्य, लिखाणाचा माझा छंद मी जोपासते...

 मन नकळत भोवताली

कधी वारयासारखे भिरभिरून बघते,

 फुलांच्या सुगंधापरी कधी दरवळून बघते,

आवडीचे सुरेल गाणे ओठांवर आणून, 

जीवनात समाधानाचे गाणे गाऊन, 

मनाच्या तिसरया कप्पातील संगीताचा छंद मी जोपासते...


लहानपणीचं मनाला लागलेला (काटूॅन) चित्र

काढायचा छंद, आणि चित्र रेखाटतांना 

बेधूंद करणारा तो आनंद...

 सहसा असणारी मी निशब्द  

जेव्हा हातून घडतात असे काही हे चित्र

 भान हरपून जाते, चित्त...

 मनाच्या तिसरया कप्प्यातून जेव्हा

  रेखाटले जाते माझ्याकडून हे चित्र.... 


 असे गेलेले क्षण आणि येणारी वेळ

 दोघांचा हा तर न जुळणारा मेळ...

 विचारांचा चालतो असाच खेळ

 हा लपंडाव बघण्यात रमून जाते ही सांजवेळ ...

 एकांत तसा अनेकांना छळतो ,

परंतु त्यातील खरा गोडवा तर 

छंद जोपासला तरच कळतो...

 वाटलं पाहिजे मनाला छंद जोपासून 

आयुष्य आपलं सार्थ व्हाव ... आयुष्यात आपला छंद, आवड जोपासून आपल्याला "सुखांचे सॅशे" सहज मिळवता यावं.... बसं हेच तर आहे मग

 स्वतःसाठी मिळवलेलं अलौकिक असं परम सुख... 

म्हणूनचं निश्वास जगा हे जीवन आहे क्षणभंगुर त्याचा सदुपयोग नक्कीच करून बघा....


Rate this content
Log in