Deepali Rao

Abstract


4.5  

Deepali Rao

Abstract


प्राक्तन

प्राक्तन

1 min 269 1 min 269

     पाचवा दिवसही असाच गेल्यानंतर तिने बाकी बायकांसमोर त्याची खिल्ली उडवली. त्याच्या पुरूषत्वाबद्दलही शंका काढली. पैसे देऊन एकही रात्र 'वसूल' न करणारं गिर्‍हाईक पहिल्यांदाच अनुभवलं होतं. 

................ 

तिच्या सहवासासाठी ठरवून बुक केलेल्या रात्री 'कोरड्याच' घालवल्यानंतर अखेर त्याने #सरळ विचारलंच, 


 "कोण आहेस? इथे कशी? तुझा भुतकाळ...जाणण्याची इच्छा नाही. 


प्रेम करतो तुझ्यावर. 


हे प्राक्तन इथेच सोडून....


लग्न करून फक्त...फक्त माझीच होशील? "


'पुरूषाचं' हे रूप बघून भांबावलीच ती. अवेळी खुडलेल्या निर्माल्यातल्या कळीला पुन्हा नव्याने देव्हाऱ्यात ठेवू पाहत होता तो.


अन् त्या बाजारात.. 


फक्त नर आणि मादी एवढीच नाती जाणणार्या पैशांच्या झगमगाटी दुनियेत..


रोज शरीराचा व्यापार करणारी ती...


त्या रात्री मनाचा सौदा करून बसली.


Rate this content
Log in

More marathi story from Deepali Rao

Similar marathi story from Abstract