STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract

3  

Author Sangieta Devkar

Abstract

प्राक्तन (भाग 2)

प्राक्तन (भाग 2)

2 mins
214

आज पर्यंत चा जीवन प्रवास नजरे समोर दिसू लागला. नलू दहा वर्षाची होती तेव्हा आई कसल्या तरी दुर्धर आजाराने तिला सोडून गेली. वर्षाच्या आत च तिच्या बाबांनी दुसरे लग्न केले आणि शांता घरी आली. तिला दोन वर्षाची मुलगी होती अर्चना. ती दिसायला नलू पेक्षा उजवी. शांता घरात आली तसे नलूचा जाच सुरू झाला. घरची बर्या पैकी काम नलू लाच करायला लागायची. सतत तिला घालून पाडून बोलणे अर्चना आणि तिची आई चे असायचे. तू दिसायला कशी सुमार कोण लग्न करणार तुज्याशी? माझी अरचु बघ किती देखणी हे सतत नलू ला ऐकावे लागायचे. कामात जरा जरी चूक झाली की शांता नको नको ते नलू ला बोलायची. नलू मुकाट्याने सगळं सहन करत होती. कारण आई पुढे वडिलां चे काही चालत नवहते. इतर नातेवाईक नावालाच होते.नलू चे लग्न व्हावे अस तिच्या आईला अजिबात वाटत नवहते कारण मग घरात काम कोण करणार? आणि नलू नोकरी पण करत होती तिचा पैसा पण होता. अर्चना ने मात्र शिक्षण मधूनच सोडून लव मॅरेंज केले. नलूचे वय वाढत चालले होते. यातच वडील आजारी पडले. चार पाच वर्षे राहिले मग ते ही नलू ला सोडून गेले. आता तर काय शांता ला मोकळे रान मिळाले नलू ला त्रास देणं काही कमी नाही झाले. नलू पण एकटी म्हणून घर सोडून राहू शकत नवहती आणि मरताना शेवटच्या क्षणी तिच्या वडिलांनी आई ला सांभाळ असे वचन नलू कडून घेतले होते. तसे ही शांता नलू ची दूरची मावशीच लागत होती. नलू चा स्वभाव चांगला म्हणून तिने वडीलांना शब्द दिला. हा भूतकाळ आठवतच नलू झोपी गेली. सकाळी उठली स्वहताचे आवरून घेतले. आई आई उठली आहेस का चहा देऊ का तुला? तिने आई ला आवाज दिला. पण आई कडून काहीच उत्तर आले नाही. नलू काम आवरत घाईत होती. आज आई ला आमरस खायचा होता. विमल येईल आता. तो पर्यंत स्वतःचा डबा ती बनवत होती. रोज उठल्यावर चहा साठी घाई करणारी आई अजून कशी झोपली आहे हे बघायला नलू दिवाणखान्यात आली. आई झोपूनच होती तिने आई ला हलवत आवाज दिला तर आई ची मान एका बाजूला कलंडली. आई म्हणत तिने तोंडावर हात ठेवला. तेवढ्यात विमल आत आली. काय झाले ताई म्हणत नलू जवळ आली. विमल आई गेली रात्री झोपेतच गेली असेल बहुतेक. पण ताई तूम्ही खूप त्रास सहन केला बघा. जाऊ दे विमल ते माझं प्राक्तन होत ते मी भोगलं. थोडे नातेवाईक होते ते आले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract