Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

3.5  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Children

पक्ष्यांचा कोरोना

पक्ष्यांचा कोरोना

2 mins
134


पक्ष्यांनो कोरोनात तुम्ही कसे हो जगलात?सगळीकडे जगभर लॉकडाऊन त्यावेळी तुम्हाला कोणी खाऊ घातले? असे अनेक प्रश्न मनात येतात.त्यावेळी जगाला तुमचा काय उपदेश असेल?आपल्यासोबत इतरांना जगवा.कारण पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव हा जीवसृष्टीशी एकरुप आहे.प्रत्येकाचे एकमेकांशी देणेघेणे आहे हा संदेश तुम्ही मानवाला दिला. मानवहानी झाली,वित्तहानी झाली.सर्व अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली. उद्योगधंदे बुडाले, उपासमार झाली तरी तुमची जीवनशैली आहे तिच आहे.तुम्हांला ना लॉक डाऊनची भीती ना जगण्याची काळजी.सारे काही निसर्गाच्या चक्रावरच. प्रत्येक ऋतूमानाला कमी न लेखता त्याचे स्वागतच करतात.कारण प्रत्येक ऋतू तुमची जगण्याची काळजी घेत असतो.अन्न,पाणी देत असतो. म्हणूनच की काय साऱ्या जगावर महामारी आली तरी तुम्ही उपासी नाही दिसलात,कायआहे तुमचे सत्कार्य!ज्यात आजही तुम्ही निरोगी आहेत.आनंदी जीवन जगत आहेत.तुम्ही तर मानवापेक्षाही अनेक संकटांशी सामना करतात.तरी सुद्धा दु:ख झेलून तुमचे जीवन सरळमार्गी जगत असतात.तुम्ही कुणालाही दोष देत नाही.तुमची औषधे तुम्हांला माहीत असतात.औषधे सुद्धा गुणकारी,दर्जेदार असतात. निसर्गाची खूप कृपा आहे की

तुमच्या प्रत्येक आजारावर निसर्गात सर्व वनस्पती औषधोपचाराचे विनामूल्ये कार्य करतात.

सारे जग बंदिस्त झाले तरी तुम्ही मुक्त विहार करत आहेत. पृथ्वी,आकाश,पाताळ यात तुमच्यावर कोणतेही निर्बंध लादलेले दिसत नाही.तुम्ही सुद्धा कोरोना सारखे नियम पुर्वीपासूनच अंगीकारलेले दिसतात.त्यामुळे तुम्हांला कोरोना होईलच कसा?नियम,शिस्त कोणत्याही शाळेत न जाता बालपणापासूनच शिकतात.निसर्गाचे नियम पाळतात.सृष्टीचा आदर करतात.संस्कार सुद्धा तुम्ही अंगीकारले आहे.व्यसन नावाची तर गोष्टच नाही.तणाव घालवण्यासाठी तुम्ही सारे एकत्र येतात.सामाजिक बांधिलकी जपतात. पृथ्वीवरची संपतीचा तुम्हास लोभ दिसत नाही.धनाची हाव दिसत नाही.तुमच्यात भांडणे दिसत नाही.संपत्तीच नाही तेव्हा वाटणीच नाही.या जगात आपले काहीच नाही याची तुम्हांला खरोखर जाणीव आहे.स्पर्धा तर मुळीच नाही. समाधान,शांती,प्रसन्नाता ही तुमची जीवनशैली आहे.उद्याची चिंता नाही.तरी तुम्ही उपासी राहत नाही.चोचभर चारा तरी मिळतोच.तुम्ही दुसर्यावर बोजा म्हणून जगत नाही.सर्वांना कष्ट करण्याची प्रेरणा देतात.आळस हा तुमचा शत्रू असल्याने तुमची प्रगती झाली आहे. स्वाभिमान, चिकाटी, जिद्द हे गुण तुमच्यात खच्चून भरलेले आहेत.


      तुमच्या बुद्धीला जे पटेल तेच तुम्ही करतात.चांगले आणि वाईट यातील फरक तुम्हांला समजलेला आहे.जग काय करते या पेक्षा मी काय करतो याचा नेहमी तुम्ही विचार करत असतात.निसर्गाने तुम्हांला दु:ख पचविण्याची क्षमता दिलेली आहे.दया,क्षमा,शांती,तिथेच देवाची वस्ती हे

नियम तुम्हांला तंतोतंत लागू पडतात.आचरण,सदाचार हे जन्मताच तुमच्यात उपजद असतात.जगाच्या शाळेपेक्षा तुमची शाळा खरोखर ज्ञानगंगा आहे.जगण्याची शिकवण तुमच्या शाळेत शंभर टक्के मिळते.विशेष म्हणजे तुमचे ज्ञान हे विनामूल्य व प्रेरणादायी आहेत.निसर्गाच्या शाळेत सर्व गगनचुंबी शाळा सुद्धा कमजोर आहेत.निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्यक्ष अनुभव आहेत.प्रगल्भता आहेत.कमीवेळात जास्त शिक्षण मिळते.अनुभवाची शिदोरी म्हणजे तुमचे आदर्श जीवन होय.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract