Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Dipali Lokhande

Abstract

5.0  

Dipali Lokhande

Abstract

फोटोसोबतच्या जुनी आठवणी

फोटोसोबतच्या जुनी आठवणी

1 min
896


सुट्टीच्या दिवशी मी सर्व काम आटपून निवांत बसले होते. काय करावे मला समजेनासे झाले. मग लक्षात आले की कपाटात साड्या अस्ताव्यस्त झाल्या आहेत. त्या नीट लावून घेण्यासाठी मी माझे गोदरेज कपाट उघडले. त्याचवेळेस फोटोंचा अल्बम खाली पडला.


मग मी ठरविले की आपले जुने फोटो पाहायचे. त्या फोटोमध्ये माझ्या कुटुंबातील सर्वांचेच फोटो लावले होते. सासर माहेरचे सर्वच जणांचे फोटो होते. माझे लहानपणीचे फोटो पाहिल्यानंतर मला खुप हसायला आले. खरंच मी लहानपणी कशी होते, आता कशी आहे हे मला उमगले. त्याच्यानंतर तरुणपणीचे, लग्नाचे, डोहाळे जेवणाचे माझ्या मुलांच्या बारशाचे एवढे सारे फोटो लावलेले होते. त्यात पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या.


अगदी मुलांचे पालथे पडण्याचे, रांगण्याचे बसण्याचे पहिले पाऊल टाकण्याचे फोटोसुध्दा टिपलेले होते. हे सर्व पाहून असे वाटले, अरेच्चा! आपली मुले आता केवढी मोठी झाली आहेत. हो, आणखी आता कुटुंबात नसलेल्या व्यक्तींचे फोटो पाहिल्यानंतर खूप रडायला आले. मला विशेष करुन माझ्या वडिलांची आई म्हणजेच माझी लाडकी आजी मला पुन्हा फोटोच्या रूपाने पाहिला मिळाली. मनाला बरे वाटले मला आणि तो फोटो मी माझ्या स्टेटसला ठेवला मिस यू आजी असे सुध्दा लिहिले. खरोखरच फोटो जर अस्तित्वात नसते तर लहानपणी आपण कसे होतो दिसायला हे कळलेच नसते. तसेच आपण मरण पावल्यानंतर आपल्या पुढील पिढीला दाखवायला आपण फोटोत सुध्दा नसतो या फोटोंमुळेच आपले निशाण राहते आणि फोटोवरून आपल्या पिढीने आपल्या मित्रांना मैत्रिणींना आपली ओळख करुन दिली असती खरोखर फोटो आपले मित्र आहेत.


Rate this content
Log in

More marathi story from Dipali Lokhande

Similar marathi story from Abstract