माझा संकल्प
माझा संकल्प
लहानपणी मला हार्मोनियम वाजवायला शिकायचे होते मला खुप आवडायचे हार्मोनियम वादन पण काय करणार? बेताची परिस्थिती असल्यामुळे मला छंद जोपासता आला नाही माझ्या मैत्रिणीचे वडील म्हणजेच वडिलांचे सख्खे मामा भजनी मंडळात होते त्यांच्याकडे हार्मोनियम होता मैत्रिण असल्यामुळे त्यांच्या घरी मी नेहमीच जायचे... मला वाजवायला शिकवा म्हणायचे त्यांना पण अनेक कारणे सांगुन त्यांनी मला शिकवायचे टाळले मला खुप वाईट वाटले. पण जाऊ द्या चाळीसाव्या वयात का होईना मी हार्मोनियम वाजवायला शिकलेच माझा संकल्प मी पुर्णत्वास नेला मला खुप आनंद झाला अगदी हार्मोनियमवर माझ्या शाळेत राष्ट्रगीत वाजविले म्हणतात ना "इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच."
उशीरा का होईना माझा संकल्प पुर्ण झाला आणि हो, हे सर्व माझी शिकण्याची जिद्द, चिकाटी,उ त्कट इच्छा या सर्व गोष्टींमुळे शक्य झाले.