आठवण
आठवण
माझ्या जन्मापासुन ते लग्न होईपर्यंतच्या कालावधी मध्ये माझ्या आजीने खुप सार्या गोष्टी शिकवल्या. आई वडिलांपेक्षा मी तिच्याच सान्निध्यात लहानाची मोठी झाले. अगदी लग्न झाल्यावरही ती माझ्या सासरी माझ्या सोबत राहिली. माझ्या दोन्ही मुलांचा पण सांभाळ केला. अगदी विणकामापासून स्वयंपाक घरातील सर्वकाही तिनेच मला शिकविले. त्यामुळे आता मला काहीच नडत नाही.
ज्यावेळेस माझ्या घराची वास्तुशांती होती. तेव्हा तिला ह्रदय विकाराचा झटका आला. माझे आईवडील माझ्या घरी होते माझ्या भावजयीचा फोन आला तसे आईवडील हाॅस्पिटला गेले. माझ्या आजीला घेऊन तिला तिथे भरती केले. दोन दिवसानंतर मी आजीला भेटायला गेले. तिची अवस्था पाहुन मी आत्याच्या गळ्यात पडून खूप ख
ूप रडले. आठ दिवसानंतर रात्री फोन आला की आजीला देवाज्ञा झाली. त्याचवेळी माझी पायाखालची जमीन सरकली.
मला खूप वाईट वाटले. मी धायमोकलून रडले. माझ्या जीवलग आजीचा मला विरह सहन झाला नाही. लाखात एक अशी माझी आजी होती. सासरी माहेरी सर्वांची लाडकी होती. तिची सहनशक्ती,शांतता हुशारी हे सर्व गुण तिच्याकडे होते. समाजप्रिय सुध्दा होती. ती तिच्या शिकवणीचा फायदा खूप झाला. मला आजही ती जरी नसली तरी तिच्या प्रत्येक गोष्टींची आठवण येते. स्वप्नात सुध्दा येते. कधी कधी ती कारण तिचा माझ्यावर व माझा तिच्यावर खूप जीव. त्यामुळे तिचा विरह आजही मला दुःख देऊन जातो. अशा या जीवलग आजीला गमावल्याचं दुःख सलते. खरंच कायम स्मरणात राहील अशी माझी आजी होती.