मी तंत्रस्नेही
मी तंत्रस्नेही
मी जेव्हा शिक्षक म्हणुन नोकरीला लागले त्यावेळी राज्य शासनाने शिक्षकांना MHCIT हा कोर्स अनिवार्य केला त्यामुळे माझ्या शाळेतील आम्ही पाचजणींनी हा कोर्स पुर्ण करायचे ठरविले मी तेव्हा पहिल्या अपत्यावेळी प्रेगन्ट होते. तरीही अशा बिकट परिस्थितीत मी कोर्स पुर्ण केला. त्या कोर्सची परिक्षा देण्यासाठी सेंटरवर गेले परिक्षा दिली पण एका प्रश्नावरुन मी फेल झाले. मला खुप वाईट वाटले मी हिंमत हारली नाही फेल जरी झाले असली तरी मी विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरुन मुलांना वर्गात चांगल्या पध्दतीने शिकविते शाळेची आॉनलाईन कामे सुध्दा मॅम मला देतात चांगल्या पध्दतीने कामे पुर्ण करते मी. तेव्हा पासुन माझ्या जीवनात तंत्रज्ञानाला खुप महत्व देते कारण एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग आहे मग आपण या क्षेत्रात मागे का पडायचे असे मी ठरविले आणि त्याचदिशेने मी पुढे पुढे पावले टाकत गेले यशस्वी झाले. विविध प्रकारचे शैक्षणिक अँप्स वापरुन मी प्रभावीपणे मुलांपुढे अध्यापन करु शकते तंत्रज्ञानामुळे.