संकटाशी दोन हात
संकटाशी दोन हात
गेल्या वर्षीची गोष्ट आहे जुन मध्ये मला स्कुटी पेप ही गाडी घेतली. मी खुप छान पध्दतीने स्कुटी चालवायला शिकले आणि रोज शाळेत स्कुटी घेऊन जायचे ठरविले. पंधरा जुनला शाळा भरली त्यादिवशी मी स्कुटीवरुन शाळेत व्यवस्थित पोहोचले. शाळा सुटल्यावर पण घरी सुखरूप आले पुन्हा दोन दिवस सुट्टी असल्या कारणाने स्कुटी चालवली नाही तशी मी घाबरत घाबरतच शिकले होते स्कुटी चालवायला .
सोमवारी पुन्हा शाळेत स्कुटीवरुन जायचे ठरविले पार्किंग मधुन गाडी काढत असताना वेग कमी झाला. गाडी व्हायबल होऊन माझ्या डाव्या पायावर पडली पाण्याची टाकी व गाडी यामध्ये माझा पाय अडकला खुप रक्त गेले.. जखम खुप खोल झाली होती. तशीच मी गाडी चालवुन दवाखान्यात गेले जखम खुप खोल असल्या कारणाने डाॅक्टरांनी पाच टाके घालुन औषधे दिली आणि मी तशीच जखम घेऊन स्कुटीवर शाळेत गेले. पण मी त्यादिवशी माझ्या घरच्यांना सांगितले नाही घरी आल्यावरच समजले सर्वांना. अशा पध्दतीने मी सामोरे आलेल्या संकटाशी दोन हात केले. संकटाचा सामना केला. संकटाला सामोरे गेल्यामुळेच मी आज चांगल्या पध्दतीने गाडी चालवु शकते आहे.