माझ्या आवडीची कांदबरी
माझ्या आवडीची कांदबरी
"वाचन हे मनाचे औषध ,अन्न आहे." खरोखरच आहे जेव्हा मला वाचनाची आवड निर्माण झाली तेव्हाच मला कळले.
माझ्या काॅलेज जीवनापासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली. तेव्हा पासून मी खूप सार्या कांदबर्या वाचल्या. धिंड,अग्निपंख, दवबिंदू,अमृृतवेल सारांशशून्य, महाश्वेता. अशा कांदबर्या परंतु, मला सर्वात जास्त आवडली ती कांदबरी 'मन में है विश्वास' विश्वास नांगरे पाटलांची
का आवडली असेल मला ही कांदबरी असा प्रश्न उभा राहिला असेल तुमच्यापुढे? कारण ही कादंबरी विश्वास नांगरे पाटलांची आत्मकथा आहे. त्या
कादंबरीत त्यांनी अगदी लहानपणापासुन ते आजतागायतचा म्हणजे आयपीएस अधिकारी पर्यंतचा प्रवास कसा संघर्ष करत करत पूर्ण केला, यशाचा मार्ग कसा मिळवला याचे अगदी परखड शब्दात वर्णन केले आहे. या कांदबरीतील मला आवडले माणसाकडे हिंमत चिकाटी जिद्द असेल तर नक्कीच तो आकाशाला गवसणी घालु शकतो. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करुन पुढे जायचे आणि आपले स्वप्न सत्यात उतरावयाचे हे या कांदबरीतून मला शिकायला मिळाले.
म्हणूनच मी सर्वांना सांगू इच्छिते हे पुस्तक वाचा. नक्कीच त्यातून प्रत्येकाला चांगली प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही .