माझ्या आवडीचे प्रेक्षणिय स्थळ
माझ्या आवडीचे प्रेक्षणिय स्थळ
माझ्या शाळेची सहल पाच वर्षांपुर्वी कोल्हापूर मधील सिध्दगिरी मठ पाहण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी गेल्यावर तेथे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे जिवंत असे देखावे पाहिल्यानंतर डोळे दिपून गेले मला तेथील सर्वच गोष्टी आवडल्या. नयनरम्य असे ते ठिकाण होते. तिथे पारंपारिक खेळ,बारा बलुतेदारांचे व्ययसाय,जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा या सर्व गोष्टीं मुलांना अनभिज्ञ होत्या. म्हणुन तेथील सर्व माहिती आम्ही मुलांनी दिली मला तेथील सर्वच गोष्टी खुपखुप आवडल्या असं वाटलं त्याक्षणी तिथेच राहावे.
त्याच्यानंतर गेल्या वर्षी माझ्या फॅमिली बरोबर पुन्हा त्याच ठिकाणाला भेट द्यायला गेले कारण ते ठिकाणच एवढे प्रेक्षणिय आहे की, तिथे पुन्हा पुन्हा जावसं वाटत. पहिल्यापेक्षा त्याठिकाणी खुप अदभुतमय बदल झाला आहे तेथील ग्रामजीवन, मायामहल ,भुतबंगला, गार्डन सायन्स पार्क,डिवाईन गार्डन धबधबा हे सर्व पाहिल्यावर माझे मन मोहुन गेले असं वाटत की तेथे पुन्हा पुन्हा जावं मन मोकळेपणाने तेथील विहंगम दृश्य पाहत राहावं. आणि हो हे सर्व माझ्या शाळेत सांगितले आणि माझ्या केलेल्या तेथील दृश्याचे वर्णनावरुन मुख्याध्यापिका तेथेच सहलीला आम्हां सर्वांना घेऊन जाणार आहेत .नऊ जानेवारी रोजी आम्ही सर्व मी पुन्हा पुन्हा पाहावसं वाटणार्या ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहे.
अशा या माझ्या आवडीच्या ठिकाणाला पुन्हा पुन्हा भेट द्यायला जावसं वाटतं.