Dipali Lokhande

Others

2  

Dipali Lokhande

Others

सवयीचे दुष्परिणाम

सवयीचे दुष्परिणाम

1 min
570


माझ्यामध्ये चांगले पण गुण आहेत आणि वाईटही गुण आहेत आणि हो माझ्यात असणारी सर्वात वाईट सवय म्हणजे मला पटकन राग येतो आणि रागाच्या भरात मी काहीबाही बोलून जाते मागचा पुढचा विचार मी करत नाही त्याचे काय परिणाम होतील हे मी पाहत नाही आणि हीच वाईट सवय सोडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. माझ्या मनात त्या व्यक्ती बाबत काही नसते पण राग आला की मी बोलते.


या सवयीबाबत मी माझा अनुभव सांगते.माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची खुप भांडण झाली .तुला जे येतं ते मला शिकव म्हटले ती काही मला शिकवत नसे मग मला राग आला आणि तिचे सर्व ब्लाऊज कात्रीने फाडून टाकले दोघी पण वापरायचो आम्ही ब्लाऊज पण माझी वाईट सवय राग येण्याची मला खूप नडली बहिण माझ्याबरोबर बोललीच नाही तिच्या मनातुन मी लहान पणी उतरलेच कारण त्या वस्तूचा वापर ती आणि मी करु शकले नाही. मला खूप वाईट वाटले मला रडू आले पण काय करणार उशीरा कळालेल शहाणपण काही कामाचं नसतं हे मला उमगलं.


अशा अनेक घटना आहेत केवळ आणि केवळ रागामुळे मला नडल्या आणि म्हणुनच माझी ही वाईट सवय मला मोडायची आहे आणि मी प्रयत्न करणार आहे. रागाने नुकसानच होते जितक शांत राहिल तितक आपण यश प्राप्त करु शकतो हे मला समजलं


Rate this content
Log in