Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

4.3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

पैशाशिवाय चे सुख..

पैशाशिवाय चे सुख..

1 min
143


"साहेब एकच पेन राहिले आहे .घेता का ?

धा रुपायाला.नको साहेब भीक नको.

पण पेन घ्या तेवढे.महाग नाही आहे हे ,

तुमच्या कुत्र्या मांजरांच्या जेवणापेक्षा स्वस्त आहे.

नाही नाही उलटून नाही मी बोलत आहे,

ना आगाऊपणा करत आहे.

घरी ना माझी बहिण आहे , वाट पाहत असेल ती .आज भाऊबीज आहे ना तिला आस आहे, आज मी काहीतरी देईन तिला.काय म्हणता?कशाला ह्या सगळ्याचा विचार करतो मी,स्वतःचा विचार करु आणि तुम्ही दिलेला वडापाव खाऊन घरी जाऊ.?पण मग घरी जाऊन तिला काय तोंड दाखवू? मान्य आहे ,मला ना घर ना दार ना पैसा ना अडका आहे .पण बहिणीच्या नजरेला नजर देतो अजूनही मी.आकाश भर स्वप्न आहेत ,टीचभर झोपडीत एकमेकांशी बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत आमच्या कडे,आणि एकाच वाटीत एकमेकांना भरण्यासाठी एक घासही आहे आमच्या कडे.

पाणी आले साहेब तुमच्या डोळ्यात.अचानक हेलावलात तुम्ही.म्हणून मी म्हंटले,की पेन घ्या ,माझ्या नावाच्या पैशांनी मी सगळी सुख विकत घेऊ शकतो.पण दुसऱ्याचे ओरबाडून सुख नाही मिळत कधी.काय म्हणता!!...वयाच्या मानाने खूप शहाणा आहे मी.परिस्थिती बनवते माणसाला शहाणा आणि वेडाही..आपण ठरवायचे काय बनायचे ते,.आपण सगळ्यांनी ठरवून जर शहाणे व्हायचे ठरवले ना तर ही सगळी भेदाभेद निघून जाईल..नाही हो मला नकोच आहे रामराज्य.मला हवे माणूस राज्य. सामंजस्याची राज्य घटना. फक्त पैशावर चालणारे राज्य नको आहे मला.खात्री आहे मला येईल एक दिवस ते येईल .त्याच आशेवर आहे मी.आताच बघा ना .माझ्या बरोबर तुम्ही ही थोडे शहाणे झालातच ना."

चला येतो साहेब ,पेन विकायची आहेत अजून."


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract