Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Classics

नजर

नजर

11 mins
198


अहो,ह्यावेळी मला पण यायचे आहे तुमच्या बरोबर सीमेवर,."

संगीताचा हा आग्रह आता नीरज च्यां अंगवळणी पडला होता.त्यानेही नेहमी प्रमाणे तिची समजूत घातली आणि तो निघाला.

अठ्ठावीस वर्षांचा तो आणि चोवीस वर्षांची ती.दोघांनी गेल्या वर्षीच लग्न केले होते.

सातारच्या गावात थोडी शेती होती,दोन म्हशी होत्या ,कोंबड्या होत्या.त्यामुळे अगदी श्रीमंत जरी नाही तरी सुखाने त्याचे लहानपण गेले होते.दोन भाऊ आणि त्यावर एक बहिण असे ते तिघेजण सतत एकत्र असायचे.

जेव्हा तो शाळेत एनसीसी मध्ये गेला ,तेव्हा त्याला सैन्याने भुरळ पाडली.त्यांची शिकवण,धैर्य,शिस्त सगळे सगळे त्याला खूप आवडले.नववीत असताना त्याने वडिलांना त्याचा निर्णय सांगितला आणि वडिलांना स्वर्ग दोन बोट उरला.कारण सातारची ही परंपरा होती की प्रत्येक घरातला एक तरी मुलगा देशाला अर्पण करणे.वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलेच पण त्यांच्या अनुभवाने त्यांनी त्याला शिकवायला सुद्धा सुरुवात केली.

सैन्यात सामील झाल्यावर तो भयंकर खूश झाला.आणि तनामानाने देशाची सेवा करायला तयार झाला.पाहिले वर्ष साधी पोस्टिंग मग नंतर हळूहळू थोडी कठीण पोस्टिंग आणि मग सीमेवर .तिथेही त्याने पराक्रम गाजवला.गेल्या वर्षी तो घरी आला आणि घरच्यांनी संगीताचे स्थळ आधीच ठरवले होते.मामाची मुलगी होती ती त्यामुळे काहीच अडचण ना येता लग्न झाले.पंधरा दिवसात तो जेव्हा परत निघाला तेव्हा तिने त्याच्या कडे हट्ट धरला.दर तीन महिन्यांनी येत जाईन असे प्रॉमिस दिल्यावर तिने त्याला सोडले.आता दीड वर्ष होऊन गेले अजूनही तिचा हा हट्ट चालूच असतो.ह्या वेळी त्याने तिला जवळ घेत विचारले..

"का ग माझी बाई ती,तू येऊन काय करणार माझ्याबरोबर"? 

"काय म्हणजे?मी तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेईन."

"अग त्याला आहे की आपले सरकार गंभीर.आमच्या मेस चे खाणे फार पौष्टिक असते.आणि जेवण करायला तुला घेऊन जाऊ होय."

"तुम्ही मला बी घेऊन चला ,मला लय भ्या वाटे तुम्ही इथ नसता तेव्हा.

"अग ,सैनिकाची बायको तू,आमच्या घरातल्या लोकांच्या खंबीर आधाराने तर आम्ही तिथे उभे राहतो लढाईच्या मैदानावर. आन तूच अशी घाबरली तर कास चालेल.ते काही नाही.आता तू हा प्रश्न मला विचारायचा नाही.देव आणि तुमचे आशीर्वाद आहेत माज्या माग.नको काळजी करू तू."

तिची समजूत घालत असताना तो स्वतः ची सुद्धा समजूत काढत होता.


छावणीत परत आल्यावर,केशव आणि हरविंदर यांच्याशी बोलताना..

"यार ये शादी करके पछताया मैं |

"क्यो भाई क्या हो गया? बाबिजीने कूच झगडा वागडा किया क्या ?क्या हुवा ,तू मैनु दस् |

"नही यार हरविंदर, तेरी भाभी तो सोला आना सोना है,अरे इसलीये तो उसे छदके आनेका मन नही करता ना"|

गप्पा मारत कधी रात्र झाली त्यांना कळले नाही.उद्यापासून रूटीन सुरू होणार होते त्यांचे.

सकाळी तीन वाजता जाग आल्यावर ते तिघेही तयार होऊन चार वाजता मैदानावर आले. सगळे जवान आल्यावर कॅप्टन भल्ला नी सुरुवात केली.

"जवानो, गुड्ड मोर्निंग,आज से हमे एक कठीन ट्रेनिंग पे जाना है|ये ट्रेनिंग तुम्हे ईसलिये दि जा रही है की तुम हिमालय के परबतोमे अपना और अपने साथियोंका खयाल रख सको |"

महिनाभर अगदी कडकं ट्रेनिंग नंतर त्यांची पोस्टिंग सियाचीन ल केली गेली.जायच्या आगोदर त्या पंधरा जणांच्या टीम ला आपल्या माणसांशी बोलायची परवानगी दिली गेली.

"हॅलो,आई बाबा कुठे आहेत,तुमच्या सगळ्यांशी बोलायचे आहे,.."

"आर बाबा बायकोशी बोलायचं हाय त्य बोल ना .थांब हा बोलावत्ये तिला."

"हॅलो,

"हॅलो..

"हॅलो..

"अग मी आहे .काय ऐकायला येईना व्हय."

"मुद्दाम छळत हाय तुमि.माहित हाय मला."

त्याचा जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकून तिचे काळीज सूपा एवढे झाले.काही न बोलता ती त्याचा आवाज कानात साठवत राहिली.

"अग संगीता ऐकते ना .मी तीन महिन्याच्या पोस्टिंग वर सियाचीन ला चाललो आहे .तिकडे मला तुमच्याशी बोलता येणार नाही.काही साधने नसणार ..आठवड्यात एकदा जर खाली येता आले तर कदाचित फोन होईल नाहीतर आता तीन महिन्यांनी बोलूया.आई बाबांची काळजी घे.तुझी पण काळजी घे.माम मामी कडे जाऊन ये म्हंजे मन रमलं तुज.काय म्हणतो आहे मी.ऐकतेस ना ."

"अव मला भ्या वाटे हाय,मी इकडं एकटी नाय राहणार.मला बी घेऊन चला की."

"अग काय नेहमी वेड्यासारखी बोलतेस ग.इथे मी काय सांगतोय अन् तुझ काय तरी भलतंच."

"रागवू नका ना.बर मी नाय हट्ट करनार.पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची हाय."

हॅलो हॅलो हॅलो हॅलो...

कट झाला वाटत.

उगीच ओरडलो आपण तिला.बिचारी लहान आहे भोळी आहे ,आपल्यावर जीवापाड प्रेम करते आहे.म्हणून असे बोलली. रागवायची गरजच नव्हती..आता बघू परत फोन लागला तर sorry बोलू तिला.


सियाचीन वाटले तेवढे सोपे नव्हते.त्याचे सरासरी तापमान -15 इतके कमी असते.आणि जरा बर्फाचे वादळ आले जे कधीही येऊ शकते तेव्हा हेच तापमान -57 इतके कमी होते.कितीही कपडे घातले तरी ते कमीच असतात.दिवसभर बंकर मध्ये शेगडी चालू असते.तहान लागत नाही पण थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे लागते ,तेही बर्फ पातेल्यात ठेवून गरम करायचा आणि मग ते पाणी प्यायचे.बंकर मध्ये थोडे तरी गरम असते.पण दर एक तासाने बाहेर फेरी मारावी लागते तेव्हा पायात काहीही असले तरी बर्फात पाय गुढघ्यापर्यंत बर्फात जातात..त्यामुळे सतत पाय दुखत राहतात.ओल असल्यामुळे पाय कुजतात ,शरीर बधीर होऊन जाते.कधी कधी खाण्यापिण्याचे ट्रक बर्फाच्या वादळामुळे बंकर पर्यंत येऊ शकत नाहीत तेव्हा किती तरी दिवस उपाशी राहावे लागते किंवा जे काही थोडे खाणे असेल ते खाऊन दिवस काढावे लागतात.हे झाले शारीरिक त्रासाचे.


पणं चोविस तास फक्त आणि फक्त बर्फ..आजूबाजूला फक्त पांढरा रंग..कुणी माणूस दिसत नाही.कसलीही चाहूल नाही.आणि जरा चाहूल लागली तर लगेच सावध होऊन बाहेर जाऊन फेरी मारावी लागते.सकाळचा बर्फ दुपारचा उन्हातला बर्फ,रात्रीचा बर्फ ह्यात इतका फरक असतो.की आपले शरीर आणि बुद्धी हे सगळे adjust करे पर्यंत थकून जाते.आणि मग भास व्हायला लागतात.किंवा डिप्रेशन येते.

त्यामुळे खूप कडक शारीरिक आणि मानसिक तयारी नंतरच इथे सैनिकांची पोस्टिंग होत असते.

नीरज आणि त्याचे साथीदार ह्या सगळ्या परिस्थितीत आनंदी राहायचा,एकमेकांस न सोडता एकत्र राहून जरा ह्या सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेत होते.कधी कधी संध्याकाळी नीरजला संगीताची आठवण यायची .आपण तिच्यावर रागावलो होतो ही बोच त्याला जाणवायची.पण मग तो आपण भेटू तेव्हा तिचा राग काढू असे म्हणून स्वतः ला समजवायचा.त्याने वरिष्ठांना सांगून ठेवलं होतं की मला आल्यावर सहा महिन्यांची सुट्टी हवी आहे .आणि त्यांनीही ते मान्य केले होते. आज त्यांना चार महिने झाले होते.आणि अजूनही त्यांच्या बदलीची बातमी येत नव्हती.सगळे जरा कंटाळले होते.पण जबाबदारी म्हणून कुणी बोलून दाखवत नव्हते..पण आज सकाळ पासून नीरज ला संगीताची खूप आठवण येत होती..दिवसभर तो तिच्याच विचारात होता.रात्री तिच्या आठवणीत झोपल्यावर सकाळी तो एकदम शांत झाला होता.

अचानक वादळाचे संकेत त्यांना मिळाले.गेल्या दोन महिन्यात अनेक छोटी मोठी वादळे येऊन गेली होती.पण हे जरा जास्त भयानक होते.सतत त्यांना संदेश मिळत होते.रात्री पर्यंत वादळं थांबले नव्हते.तापमान -62झाले होते.शरीर बधीर होऊन हात पाय हलतही नव्हते.सगळी बोट कुजल्यासरखी झाली होती.गरम पाणी घेताना त्यांना जाणवायचे की किती नुकसान झाले आहे ते.नाहीतर बर्फामुळे दुःख जखम वेदना काहीही समजत नव्हते.तीन दिवस झाले तरी वादळ शमत नव्हते.बँकरमधील सगळ्यांनी आता उपाशी रहायची आणि जिवंत राहायची अशी दोन्हीही मनाची तयारी केली होती .चौथा दिवस आणि सगळे वातावरण निवळले होते.पण वॉकी टोकी वर संदेश मिळाला की खाणे घेऊन येणारा ट्रक बर्फात फसला आहे.त्यांच्या बंकर पासून दोन किलोमीटर वर आहे.दोन किलोमीटर आपल्याला कमी वाटत आहेत पण बर्फातून तिथपर्यंत जाणे म्हणजे खरंच खूप कठीण होते.सर्वानुमते असे ठरले की आज वाट बघू उद्या जाऊ.दुसऱ्या दिवशी परत संदेश मिळाला की बर्फात ट्रक रुतून खाली खाली जात आहे ट्रक ड्रायव्हर चा जीव धोक्यात आहे.नीरज आणि हरविंदर आणि एक खान सामा असे तिघे जण निघाले.जाताना मित्रांचा निरोप घेऊनच निघाले कारण परत येऊ की नाही ही त्यांची भीती आणि परत येऊ तेव्हा हे असतील का ही मित्रांसाठी भीती.त्या बंकर मध्ये ते आठ जण होते.त्यातले दोघेजण जरा सीरियस होते,त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता.पण वादळामुळे त्यांच्या पर्यंत कुणी पोहोचू शकत नव्हते.कदाचित जेवण मॅगीचे सूप मिळाले तर त्यांच्या शरीराला उष्णता मिळून त्यांचे प्राण वाचू शकतात.हे कळल्यामुळे त्या तिघांनी जीवावर उदार होऊन बाहेर जायचे ठरवले.बँकरच्या बाहेर पडल्यावर त्यांना हाडे गोठविणारी थंडी या वाक्याचा अर्थ कळला. खांन सामा लगेचच कोसळला.पण त्याला तिथेच ठेऊन ते दोघे पुढे निघाले ,अचानक बर्फ एकदम वितळल्याला लागला.त्यांचे पाय त्यावरून घसरायला लागले.कसे बसे ते ट्रक पर्यंत पोहोचले.ट्रक ड्रायव्हर कसातरी जिवंत होता.त्याला आधी बाहेर काढला.आणि मग सामान काढायला सुरुवात केली पण इतके समान ते नेऊ शकणार नव्हते. त्यांनी शरीरात आत जॅकेट मध्ये जितकी मॅगी ची पाकीट घेता येतील तितकी घेतली.कारण ती हलकी होती आणि लगेच गरमी मिळाली असती.तिघांना जमेल तितकी पाकीट आणि थोडे समान घेऊन ते निघाले.ड्रायव्हर थोडे चालून बर्फात कोसळला.त्याला तिथेच टाकून ते दोघे निघाले.आपलीच माणसे अशी एक एक कोसळताना पाहणे घशात आलेले आवंढा गिळण्यासाठी लाळ पण नाही,छाती भरून आली तरी तिला डोळ्या वाटे बाहेर पडायला जमत नाही..सगळे कसे बर्फा सारखे थंड टणक..नीरज ला वाटते की आपल्या गोठलेल्या भावनाना पण उन मिळाले की अशाच स्फोट होऊन बाहेर पडतील.

हर्विंदरच्या खुणानी त्याला कळले की बंकर जवळ आला आहे. 

कसे बसे त्यांनी आत पाऊल टाकले.सगळे सामान उतरवून त्यांनी गॅस पेटवायचा प्रयत्न केला .खूप वेळानंतर इंधन मिळाल्यामुळे गॅस पेटला..बर्फ टाकून त्यात गरम करत ठेवला व मॅगी ची पाकीट एका मागोमाग एक त्यात टाकली.किती तरी दिवसांनी त्यांना खायला मिळत होत.उष्णता मिळाली होती.त्यांना जरा बर वाटायला लागले.पण अजूनही बर्फ होताच दारात आडवा.प्रत्येक वेळी बाहेर जाताना आधी बर्फ फोडावा लागायचा आणि मग बाहेर पडता यायचे.दोन दिवसानंतर त्यांची मॅगी कमी व्हायला लागल्यावर त्यांना लक्षात आले की ड्रायव्हरच्या कडे अजून मॅगी ची पाकीट आहेत.पण बाहेर जाण्याची कुणाचीही तयारी नव्हती.आज दहावा दिवस होता.गॅस सुद्धा सारखा पेटवून ठेवता येत नव्हता कारण बर्फ वितळायला वेळ लागे.इंधन संपले तर परत नवे संकट उभे राहील.थंडीत जणू काही त्यांचं शब्द ही गोठलेले होते.त्यामुळे बोलण्याचे श्रम न घेता ते आपली एनर्जी वाचवत होते.पण तिसऱ्या दिवशी जरा उन आले सूर्याचे दर्शन झाले .आज चौदा दिवसानंतर त्यांना सूर्य दर्शन झाले होते.ते सुखावले .नीरज म्हणाला ,

"मी बाहेर जाऊन ड्रायव्हर चा शोध घेतो आणि मॅगी पण आणतो.जरा थोडी ताकद आल्यावर मग आपण ट्रक चा शोध घेऊ.म्हणजे बाकीचे समान आणता येईल.."

सगळ्यांनी माना हलवल्या.नीरज बाहेर गेला ,आणि चौदा दिवसांच्या अंधारानंतर एकदम सूर्याचा प्रकाश त्याला सहन झाला नाही.बाहेर बर्फावर त्याची किरण पडून ती आणखी चमकत होती.अशा वादळानंतर डोळ्यावर गॉगल घालून बाहेर यायचे असते.ज्या मुळे डोळ्यांना इजा होत नाही.हे तो उत्साहाच्या भरात विसरला.असंख्य काटे एकत्र टोचल्यावर जसे होईल तशा वेदना त्याला झाल्या.आणि तो बेशुद्ध होऊन पडला..


तो शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या समोर फक्त अंधार होता..त्याची हालचाल बघून नर्स ने डॉक्टरांना बोलवले.त्या बरोबर त्याच्या आजूबाजूला झालेली हालचाल त्याला जाणवली. डोळे जरी बंद असले तरी आजूबाजूची चाहूल घेण्याचे त्याचे सैन्यातले प्रशिक्षण त्याच्या कामी आले.आई चा कुजबुजण्याचा आवाज त्याने ओळखला ."आई "क्षीण आवाजातली त्याची हाक ऐकून ती त्याच्या जवळ गेली.

"बोल र माज्या सोन्या,"

"मी कुठे आहे. आन इतका काळोख का आहे इथे.मला काहीच दिसत नाही आहे."

"डॉक्टर ,डॉक्टर इकडं या आव लेकरू बागा काय बोलतय"

"बाई तुम्ही बाहेर जाऊन बसा.मी तपासतो त्यांना आणि मग सविस्तर बोलू आपण".

डॉक्टरांनी बाहेर येऊन सगळ्यांना सांगितले की डोळ्याला इजा झाल्यामुळे तो आंधळा झाला आहे.सध्यातरी काही करू शकत नाही.पण एकदा तो आपल्या पायावर उभा राहिला की आपण बघू काय करता येईल ते.

दोन दिवसानंतर नीरज परत शुद्धीवर आला.आता मात्र डॉक्टरांनी त्याच्या जीवाला धोका नसल्याचे सांगितले .आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.शुद्धीवर आल्यापासून तो एकच प्रश्न विचारत होता..

"संगीता कुठे आहे?ती का नाही आली मला बघायला.

"आर माज्या सोन्या तुला तीन सांगितलें नाही का? आर तू बाप व्हनार हायस.तुला तर म्हाईत हाय किती नाजूक हाय ती .तू सियाचीन ला गेल्यावर ती जरा दुःखात होती.पण हळूहळू सावरली. आन अचानक आम्हाला बातमी कळली की ,बर्फाच्या वादळात तुम्ही सगळे हरवला आहात.तुम्हाला पाटवलेला ट्रक बी गायब झाला व्हता.

आन त्यात संगीता गरवार.ती तुला तर म्हाईत हाय किती हळवी हाय ते .मांग कशी बशी समजूत काडून तिला तिच्या आई कडे पाठवले आमी.आता तशी बरी हाय पन जरा तब्बेत नाजूक झाली हाय ना डॉक्टर म्हणाले इथाच राहू द्या तिला."

आपण बाप होणार हा एकच आशेचा किरण दिसत होता निरजला,आणि शेवटी तो सैन्यातला माणूस होता असे घाबरून आणि निराश होऊन कसे चालेल.पंधरा दिवसानंतर त्याला जेव्हा हर्विंदर भेटायला आला.तेव्हा त्याला कळले की आठ जणांमधले ते तिघेच वाचले आहेत.पण तिसरा त्यांचा साथीदार पाय बधीर झाल्यामुळे आणि लवकर औषध पाणी न झाल्यामुळे त्याला एक पाय कापून टाकावा लागला होता.सैन्याने सगळी मदत करून दिली आणि जयपूर फूट पण लावून दिला.आता तो हळूहळू recover होतो आहे. हार्विंदर पण जायबंदी झाला होता.पण पूर्ण बरा होऊन आठ दिवसात कामावर रुजू होणार होता. निरजच्या डोळ्यातले पाणी बघून हरविंदर पण हलला होता.पण आव आणत तो म्हणाला तुझे पण काम होईल काळजी करू नकोस.आणि तो बाहेर गेला तेव्हा त्याने कॉरिडॉर मध्ये उभा राहून मनसोक्त रडून घेतले त्याने.शेवटी जीवन आणि मरण सगळ्यामध्ये ते दोघे एकत्र होते.

संगीता ची पत्र अधून मधून येत होती पण बोलणे होत नव्हते.एक दिवस अचानक डॉक्टर आले आणि म्हणाले,

अभिनंदन तुम्हाला एक डोनर मिळाला आहे.तुमच्या डोळ्यांचे आता ऑपरेशन होईल आणि मग तुम्हाला नीट दिसायला लागेल.

"इतक्या लवकर कसा काय मिळालं दाता?आणि मग एवढी आनंदाची बातमी तुम्ही निराश होऊन का सांगताय."

त्याही परिस्थितीत त्याची ती हुशारी बघून डॉक्टर चकित झाले.सैन्यामध्ये असा हुशार माणूस हवाच हवा.हे मनाशी बोलत डॉक्टर तिथून निघून गेले.

लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे नेत्रारोपण चे ऑपरेशन झाले.दोन दिवसानंतर त्याच्या डोळ्यांवर ची पट्टी काढण्यात आली.आणि तो हळूहळू डोळे उघडू लागला.

"डॉक्टर डॉक्टर मला सगळे स्पष्ट दिसत आहे."

सगळेजण खूप खुश झाले .आनंदीआनंद पसरला.थोड्या वेळाने त्याला परत आठवले ..

"आई ,संगीता कशी नाही आली अजून.तिला तुम्ही कळवले का माझे ऑपरेशन झाले ते.नाहीतर आपण सगळे मामांकडे जाऊ आणि तिला सरप्राइज देऊ . चल चल."

"थांब नीरज,जरा शांत हो आई बाबांना बोलायचे आहे तुझ्याशी."

कुठेतरी आत तुटले त्याच्या ..काही तरी वाईट घडले आहे .पण काय? माझे बाळ....नाही नको देवा इतका निष्ठुर होऊ नकोस तू.माझी संगीता खूप नाजूक आहे .तिला हा धक्का सहन होणार नाही.. डोळे मिटून थरथरत्या पायाने तो पलंगावर बसला.त्याची बहीण त्याच्या जवळ येऊन बसली.बाबा आई समोर खुर्चीवर बसले.

"नीरज तू कणखर आहेस .तुझा तोल जाऊ देऊ नकोस .परिस्थिती समजुन घे..तुमच्या सगळ्यांच्या हरवण्याची बातमी जेव्हा आम्हाला आली तेव्हा संगीता तीन महिन्यांची गरोदर होती.आधी आम्ही थांबलो तिला काही कळवले नाही.पण नंतर आठ दिवसांनी आम्हाला निर्वाणीचा निरोप आला की त्यांचा काही थांगपत्ता मिळत नाही आहे.त्यामुळे आमचा नाईलाज झाला.तिला मामाकडे घेऊन गेलो आणि सगळ्यांनी मिळून तिला सांगितले.ऐकल्यावर ती एकदम बेशुद्ध पडली.हॉस्पिटल मध्ये डॉक्टरनी सांगितले की तिची प्रकृती खूप नाजूक झाली आहे .बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.खूप प्रयत्न करून सुद्धा बाळाला ते वाचवू शकले नाही.संगीता जणू दगड बनली होती.काही बोलत नव्हती खात नव्हती.सारखी एकच प्रश्न विचारायची,

"हे आले तर मी त्यांना काय उत्तर देऊ.माझ्यावर ते आधीच रागावले आहेत .आता आणखी चिडतील."

डोळ्यातले न थांबणारे अश्रू वाहत होते आणि नीरज ते थांबवण्याचा प्रयत्न ही करत नव्हता .

आणि मग तुम्ही सगळे मिळाल्याची बातमी आली.आम्ही सगळे परत खूश झालो.सगळे तुझ्या येण्याकडे डोळे लावून बसलो.हळूहळू संगीताही सावरत होती.पण तुला हॉस्पिटल मध्ये बघून तिला परत धक्का बसला.तुझे डोळे गेले हे कळल्यावर मात्र ती अगदी शांत पणे आत गेली देवासमोर बसली आणि मग उठून म्हणाली ,"मी आत जाऊन पडते."

सकाळी उठवायला गेलो तर ती गेली होती.जाण्याआधी ही चिठ्ठी लिहून गेली .

त्याच्या हातात चिठ्ठी देऊन आई बाबा बहीण सगळे बाहेर गेले.

"अहो,राग गेला ना माझ्यावरचा.मला ना तुम्हाला सोडून राहायला आवडत नव्हते हो.आणि आपला सहवास तरी कुठे जास्त झाला होता.पण तुमच्या माघारी मी घर ,माणसे,तुमचे बाळ.....हो आपले बाळ.....त्यादिवशी मी तेच सांगायचं प्रयत्न करत होते.पण आपले भांडण झाले आणि मला सुचलेच नाही.मग तुम्ही परत भेटला नाहीत.

तुम्हाला दिलेले वचन मी पाळले नाही मला माफ कराल ना .पण त्यादिवशी तुमच्या डोळ्याविषयी ऐकले आणि मी ठरवले आता आपण वेगळे व्हायचे नाही, कायम एकत्र राहायचे.माझी आस तुम्हाला पाहण्याची होती.श्वास तुमच्यासाठी जपून ठेवला होता.त्यामुळे तुम्ही बरे झालात पण डोळे नाही हे ऐकून मी देवाला सर्वस्व अर्पण करून मागणी मागितली.आता मी जाईन पण माझे डोळे मी तुम्हाला देऊन जाते..त्यामुळे आपण कायम एकत्र राहू.आणि लढाईवर गेल्यावर तुम्ही काय करता तेही मला कळेल.माफ कराल ना मला.तुमची बायको खंबीर नव्हती पण जिद्दी होती.म्हणून आता कायम तुमच्याबरोबर राहणार."


दोन महिन्यांनंतर बॉर्डर वर हर्विंदर बरोबर उभा असताना.तो मनात म्हणाला ,

"संगीता बघ तू आणि मी मिळून परत एकदा देशाची सेवा करायला तयार झालो आहोत.तुझ्या आयुष्यातला निराशेचा काळोख आणि माझ्या नजरेतला काळोख एकत्र आल्यामुळे कधीही न संपणारा एक प्रकाशाचा किरण तयार झाला आहे.आणि तो मी कधीही संपू देणार नाही.हा माझा शब्द आहे तुला."


डोळ्यातून एक अश्रू अचानक त्याच्या गालावर पडला आणि त्याला वाटले संगीता आपल्या गालावर हात ठेवून thank you म्हणत आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract