Shraddha Kandalgaonkar

Abstract

4.3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract

सुपर पॉवर

सुपर पॉवर

2 mins
245


सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतचा तिचा प्रवास हा एक चमत्कार म्हणावा लागेल.गृहिणी या शब्दाचा अर्थ खर तर गृहस्थाची बायको असा होतो.पण लग्न झाल्यावर सगळ्या गृहाची जबाबदारी एकट्या तिच्यावर येऊन पडते.

लहानपणापासून तिला पाहिला खेळ खेळायला मिळतो तो 

भातुकली....जिथे ती स्वयंपाक करायला ,घर आवरायला आणि आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायला शिकते.

दुसरा खेळ सागरगोटे....जिथे तिला multi-tasking म्हणजेच अष्टावधानी कसे व्हायचे ते शिकवले जाते.वर गेलेला सागरगोट्यावरून नजर ना हटवता खालचे सागरगोटे एकमेकांना धक्का ना लावता उचलायचे.ह्यात तिच्या एकाग्रतेबरोबर दुसऱ्यांना न दुखावता आपले काम कसे करायचे हे शिकते.

तिसरा काचा पाणी...ज्यात काचेचा तुकडा धक्का न लावता उचलायचा .म्हणजेच संकटांशी सामना करायचा त्यांना न घाबरता जखम झाली तरी न डगमगता आपले कार्य पूर्ण करायचे.

झोका...एक झोका असे म्हणत वर जायचे अन् वर जरा कुठे मोकळा श्वास घेतला की झोका खाली जमिनीवर ..म्हणजेच तिने कितीही वर जायचा प्रयत्न केला तरी तिला परत जमिनीवर आणायचे.मोकळा श्वास फार वेळ घेऊ द्यायचा नाही.जबाबदारीच्या बेड्या तिच्या पायात अडकवून तिला परत खाली आणायचे.

पण मग ती मोठी झाली की आपल्या परीने त्या परिघातच राहून आपले स्वत्व जपते.जबाबदारीच्या जोखडातून तात्पुरता का होईना बाहेर पडून मोकळा श्वास घेते.हा श्वासच तिला पुढच्या वाटचालीसाठी प्राणवायू ठरतो.आता ती मुलीला भातुकलीचा खेळ आणून देते पण त्याच्या आजूबाजूला क्रिकेट ,फुटबॉल,आणि इतर खेळांचे चे मैदान आहे हेही दाखवते.ती तिला अष्टावधानी बनवते पण फक्त घरात नाही तर बाहेरही जगात कसे वागायचे ते शिकवते.काचा पाणी खेळताना जेवढे काचाना जपायचे त्यापेक्षा जास्त आपल्या जखमांना जपायचे.होता होईतो जखमा होऊनच द्यायच्या नाही ,पण झाल्याचं तर त्याची जबाबदारी उचलून त्या बऱ्या करायच्या हे ती शिकवते.उंच उंच आकाशात उडताना जमिनीचे भान ठेवायला शिकवते.त्यामुळे पडण्याची भीती नाही आणि वर जायला बळही मिळते.

काही नाही तर निदान तिला आपण एक शाबासकी पाठीवर हात ठेवून देऊ शकतो.ज्यामुळे तिच्या मधल्या सामर्थ्याची तिला जाणीव होईल आणि ती आपल्या पुढच्या पिढीला आपले सामर्थ्य देऊन पुढे जायला प्रवृत्त करेल.

मुख्य म्हणजे ती मुलीला आपला आवाज देईल ,तिला मन आहे ह्याची जाणीव करून देईल तिच्या इच्छांना मान देईल, मुलगा आणि मुलगी ह्यात फरक करत नाही हे ती त्यांना समजावेल .

गृहिणी ही फक्त एक घर नाही उभे करत तर ती घरातील प्रत्येकाच्या मनातली गृहिणी जागी करत असते.ज्या घरात ती जागी होते ते घर मंदिर होते .आणि जिथे जागी होत नाही त्या घराचे स्मशान होते.

मला तरी असे प्रामाणिकपणे वाटते की गृहिणी इतके सुपर पॉवर म्हणजेच सामर्थ्यवान कुणी हि नाही.तिच्या मदतीने घराची महासत्ता करायची की पानिपत हे तुम्हीच ठरवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract