STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Abstract Fantasy

3  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Fantasy

अ ल क

अ ल क

1 min
154

Spiderman ची बायको म्हणाली," दिवाळी जवळ आली आहे जरा नख साफ करून ठेवा म्हणजे जाळीही स्वच्छ येईल


Superman च्या बाईनी युनिफॉर्म न घातल्या मुळे त्याला वर्गाबाहेर उभे केले.आणि मी चड्डी कपड्याच्या आत घालेन हे शंभर वेळा लिहायला सांगितले


न्यूटन वार्ताहरांशी बोलताना त्यांनी विचारले तुम्ही कधीच शी केली नाही का ?कारण तेव्हाही कळले असते की शी नेहमी खालीच पडते...


उन्हाची काहीली वाढली म्हणून सूर्य चंद्रामागे लपला आणि लोकांना वाटले सूर्य ग्रहण झाले


सुईच्या डोळ्याने आरपार बघितले अन् दोरा मुकाट तिच्या मागे निघाला.l


बशी कपाचा कान पकडून म्हणाली, "स्वतः मधली गरमी माझ्याकडे सोपवून तुम्ही मात्र थंड होता. "


नदीने समुद्राकडे धाव घेतली ,तिच्या प्रेमाने त्याच्या अंतरंगात आनंदाच्या लहरी उमटल्या आणि ती त्याच्या मध्ये सामावून गेली


लाथ मारल्यावर बॉल ला राग आला आणि तो बास्केट मध्ये जाऊन बसला


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi story from Abstract